करोना साथीच्या काळात लहान मुलांचं स्क्रीनकडे पाहण्याच्या वेळेत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे लहान मुलांना दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो, याबाबत त्यांचे पालकही चिंतेत आहेत. ऑप्टोमेट्री ऑस्ट्रेलियाचं २०२२ चं व्हिजन इंडेक्स सर्वेक्षण गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालं. या सर्वेक्षणानुसार, मुलांनी करोना काळात स्क्रीनकडे पाहण्यात जास्त वेळ घालवल्याने त्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो, याबाबत ६४ टक्के पालकांना चिंता होती. तर घराबाहेर मैदानात खेळायला गेल्यानं अशा प्रकारच्या दृष्टीदोषापासून संरक्षण मिळतं यांची जाणीव अर्ध्याहून कमी लोकांना होती.

जास्त वेळ स्क्रीनकडे पाहिल्यामुळे आपल्याला लांब अंतरावरील वस्तू व्यवस्थित दिसत नाहीत, पण जवळच्या वस्तू व्यवस्थित दिसतात, याला आपण मायोपिया (Myopia) असं म्हणतो. अलीकडच्या काळात लहान मुलांमध्ये मायोपियाचं प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, २०५० पर्यंत जगभरतील निम्म्या लोकांना मायोपिया झालेला असू शकतो.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

मायोपिया होण्याची संभाव्य कारणं कोणती आहेत?
पर्यावरणीय आणि अनुवांशिक घटकांच्या संयोजनातून मायोपिया होऊ शकतो. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर इयान मॉर्गन यांच्या मते, “२० वर्षांपुर्वी जेव्हा याचा विचार केला जायचा, तेव्हा मायोपिया हा आजार अनुवांशिक होता. पण आता पर्यावरणावरातील बदलामुळे मायोपिया होण्याचं प्रमाण वाढलं आहे, हे अगदी स्पष्ट झालं आहे. गेल्या अर्ध्या शतकात पूर्व आशियातील अनेकांना मायोपियाचा त्रास जाणवत आहे. हे केवळ आनुवंशिकतेमुळे झालंय, असं ठोसपणे म्हणता येत नाही. पर्यावरण आणि अनुवांशिक घटकांच्या संयोजनातून मायोपिया होतो.

मॉर्गन यांच्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, जी मुलं घराबाहेर जास्त वेळ घालवतात, त्या मुलांच्या पालकांना दृष्टीदोष असला तरीही त्यांना मायोपिया होण्याचा धोका फार कमी असतो. त्यामुळे ते किती वेळ कमी फोकल अंतरावरील क्रिया (वाचन, लेखनसारख्या क्रिया) करतात, याचा फारसा फरक पडत नाही.

घराबाहेर घालवलेला वेळ सूर्यप्रकाशाच्या विशिष्ट गुणधर्माशी जोडला जाऊ शकतो. सूर्यप्रकाशात गेल्याने आपल्या डोळ्यातील रिसेप्टर्स उत्तेजित होतात, त्यामुळे शरीरात डोपामाइन नावाचं द्रव्य तयार होतं. परिणामी आपल्याला दृष्टीदोषापासून संरक्षण मिळतं. जी मुलं पुस्तके वाचनात किंवा स्क्रीनवर जास्त लक्ष केंद्रित करतात, त्यांना मायोपिया होण्याचा धोका अधिक असतो. शिक्षणाचा वाढता स्तर आणि मायोपिया असलेले पालक हेही मायोपिया होण्याची संभाव्य कारणं आहेत.

मॉर्गन यांच्या मते “१९७० च्या दशकात तैवान आणि सिंगापूरमध्ये मायोपियाचा प्रादुर्भाव सर्वाधिक होता. त्यावेळी संगणकाचा वापर खूप मर्यादित होता आणि स्मार्टफोन तर अस्तित्वात देखील नव्हते. त्यामुळे मायोपिया होण्यास केवळ स्मार्टफोन कारणीभूत आहेत, असं म्हणायची गरज नाही. १० ते १५ वर्षांपूर्वीच स्मार्टफोन्स बाजारात आले आहेत. स्क्रीनच्या वापरामुळे मायोपिया होतो, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला अधिक पुराव्यांची आवश्यकता आहे.

साथीच्या रोगाचा मुलांच्या दृष्टीवर काय परिणाम झाला?
कोविड-१९ संसर्गाच्या काळात लहान मुलांना जास्तवेळ घराबाहेर पडता आलं नाही, याचा संबंध मुलांमध्ये दृष्टीदोष वाढण्याशी जोडला आहे. चीनमधील १ लाख २० हजारांहून अधिक शालेय वयातील मुलांवर केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं की, मागील पाच वर्षांच्या तुलनेत २०२० मध्ये मायोपियाचा प्रादुर्भाव १.४ ते तीन पटीने अधिक वाढला. करोनाकाळात लहान मुलं घरात कैद झाली, त्यामुळे हा आजार बळावला.

हाँगकाँगमधील लहान मुलांवर केलेल्या आणखी एका अभ्यासानुसार, २०२० मध्ये सहा ते आठ वर्षांच्या मुलांमध्ये दृष्टीदोष होण्याचं प्रमाण २६ ते २८ टक्के इतकं होतं.तर करोनापूर्व काळात हाच दर १५ ते १७ टक्के इतका होता.

मायोपियाला कसं रोखता येईल?
न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील संशोधक डॉ. अँजेलिका ली यांच्या मते, मुलांमधील मायोपिया रोखण्यासाठी एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे जास्तीत जास्त वेळ घराबाहेर घालवणं. सर्वसाधारणपणे मुलांनी दिवसातून दीड ते अडीच तास घराबाहेर घालवली पाहिजे. ही उष्णता केवळ एकाच वेळी मिळावी, असं नाही. पण शाळेत जाताना-येताना, सुट्टीच्या वेळी, दुपारी जेवणाच्या वेळी, अशा वेगवेगळ्या वेळी मुलांनी आपला वेळ उन्हात घालवला पाहिजे.

स्क्रीन टाइमचा प्रौढांवर काय परिणाम होतो?
ऑप्टोमेट्री ऑस्ट्रेलियानं केलेल्या सर्वेक्षणानुसार, मागील १२ महिन्यात ४२ टक्के ऑस्ट्रेलियन लोकांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. ज्या लोकांना खरोखरंच जास्त लक्ष देऊन स्क्रीनवरील काम करावं लागतं, अशा लोकांमध्ये मायोपिया वाढल्याचे पुरावे आढळले आहेत. पण स्क्रीनकडे पाहण्याचा वेळ वाढला तरी पौढांमध्ये मायोपियाचं प्रमाण खूपच कमी आहे. २५ वयोगटापुढील नागरिकांमध्ये मायोपिया होण्याचा धोका अगदी शुन्याजवळच आहे.