गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमासमध्ये संघर्ष सुरू आहे. या युद्धात हिजबूलच्या सहभागामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. २००६ मधील शेवटच्या हिजबूल-इस्रायल युद्धानंतर लेबनॉनमध्ये सोमवारी (२३ सप्टेंबर) सर्वात प्राणघातक हल्ला करण्यात आला. दक्षिण लेबनॉनवर इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत किमान ४९२ लोक मारले गेले आहेत आणि एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, लेबनॉनचीदेखील परिस्थिती गाझाप्रमाणे होऊ शकते. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील संघर्ष आता तीव्र झाला आहे. इस्रायलने लेबनॉनमध्ये गेल्या आठवड्यात पेजर आणि वॉकी-टॉकींचा स्फोट घडवून आणल्याचेही सांगितले जात आहे, त्यात ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमासने ७ ऑक्टोबर, २०२३ रोजी इस्रायलवर हल्ले सुरू केल्यापासून, लेबनॉन आधारित शिया अतिरेकी गट हिजबूल आणि इस्रायल यांच्यात किरकोळ सीमा चकमकी झाल्या आहेत. हिजबूल आणि हमास या दोघांनाही इराणचा पाठिंबा आहे. या दोन्ही गटांनी मध्यपूर्वेतील इस्रायल आणि त्याच्या लष्करी कारवाईला दीर्घकाळ विरोध केला आहे. परंतु, आता नक्की घडतंय तरी काय? प्रादेशिक संघर्षाची भीती का निर्माण झाली आहे? युद्ध आणखी चिघळणार का? त्याविषयी जाणून घेऊ.

Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
Prime Minister announces free elections in Syria
सीरियात असादपर्वाची अखेर सत्ता उलथवण्यात बंडखोरांना यश; पंतप्रधानांची मुक्त निवडणुकांची घोषणा
Syrian army withdrew from most of the country south on Saturday
सीरियात बंडखोरांची आगेकूच; देशाच्या दक्षिण भागातून लष्कराची माघार
Israel responds to Hezbollah rocket attack
हेजबोलावर इस्रायलचे पुन्हा हवाई हल्ले; शस्त्रसंधी करार झाल्यानंतर आठवड्यातच पुन्हा संघर्ष
Mohit Kamboj
“तुला उचलणार”, सत्ता येताच भाजपाच्या मोहित कंबोजांची सोशल मीडियावरून धमकी; ठाकरेंच्या शिवसेना नेत्यानं दिलं आव्हान
Loksatta anvyarth Israel and Lebanon Terror Ceasefire West Asia
अन्वयार्थ:थांबेल, हेही नसे थोडके!
गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमासमध्ये संघर्ष सुरू आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : डेंग्यूची प्रकरणे यावर्षी का वाढत आहेत? भारतातील परिस्थिती काय? डेंग्यू विरोधी लस उपलब्ध आहेत का?

लेबनॉन आणि इस्रायलमध्ये नक्की काय सुरू आहे?

ऑगस्टच्या उत्तरार्धात हिजबूलने इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले होते आणि ड्रोन सोडले, तर इस्रायलनेही प्रत्युत्तरात लेबनॉनच्या दिशेने १०० जेट्स पाठवले होते. इस्रायलने या वर्षी जुलैमध्ये हिजबूलचा वरिष्ठ कमांडर फुआद शुक्र याची हत्या केली. त्याचा बदला म्हणून हिजबूलने इस्रायलवर आक्रमण केले होते. इस्त्रायलने हिजबूलला क्षेपणास्त्राच्या हल्ल्यासाठी जबाबदार धरले; ज्यात इस्रायल-नियंत्रित गोलान हाइट्समधील १२ मुले आणि किशोरांचा मृत्यू झाला होता. आपण हा हल्ला केला असल्याचे हिजबूलने स्वीकार केले नाही, मात्र तेव्हापासून सीमापार हल्ले अधिक तीव्र झाले आहेत.

असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, “इस्रायली सैन्याला हिजबूलवर हवाई कारवाई करायची आहे, त्यामुळे आता इस्रायलने दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमधील रहिवाशांना त्यांची घरे रिकामी करण्याचा इशारा दिला आहे.” हजारो लेबनीज दक्षिणेतून पळून गेले आणि दक्षिणेकडील शहर सिडॉनचा मुख्य महामार्गही बेरूतच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे जाम झाला होता,” असे त्यात म्हटले आहे. २००६ च्या इस्रायल-हिजबूल युद्धानंतर लोकांचे हे सर्वात मोठे निर्गमन असल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले, “मी पुन्हा पुन्हा सांगतो की, इस्रायलला युद्ध करायचे नाही, पण आपल्या लोकांचे रक्षण करण्याचा अधिकार आम्हाला आहे.” इस्रायलने लेबनॉनमधील घरे आणि इमारतींमध्ये हिजबूल शस्त्रे साठवून ठेवत असल्याचा एक ॲनिमेटेड व्हिडीओही शेअर केला आहे. इस्रायलने म्हटले आहे, “लांब पल्ल्याची हजारो रॉकेट घरे, दिवाणखाने, शयनकक्ष आणि स्वयंपाकघरात ठेवली जात आहेत आणि आपल्या लोकांना ठार मारण्याच्या हेतूने प्रक्षेपित केली जात आहेत, कोणता देश याचा स्वीकार करेल.” रॉयटर्सच्या वृत्तात इस्रायली रीअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी म्हटले आहे, “दक्षिण लेबनॉनमध्ये प्रत्येक घरात शस्त्रे साठवून ठेवण्यात आली आहेत. ज्या घरांवर आम्ही हल्ला करत आहोत, त्या प्रत्येक घरांमध्ये स्फोट होत आहेत.” हिजबूलने मात्र इस्रायलच्या दाव्यावर भाष्य केलेले नाही.

हिजबूल आणि हमास या दोघांनाही इराणचा पाठिंबा आहे. या दोन्ही गटांनी मध्यपूर्वेतील इस्रायल आणि त्याच्या लष्करी कारवाईला दीर्घकाळ विरोध केला आहे. (छायाचित्र-एपी)

युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे का?

गाझा पट्टीच्या सततच्या विध्वंसानंतर व्यापक संघर्ष सुरू झाला आहे, ही चिंतेची बाब आहे. कोणत्याही बाजूने आतापर्यंत युद्धाची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी उत्तर इस्रायलमधील रहिवाशांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करण्याची शपथ घेतली आहे. ‘थिंक टँक चॅथम हाऊस’मधील मध्य पूर्व तज्ज्ञ लीना खतीब यांनी ‘एपी’ला सांगितले, “तणाव भडकत असला तरी दक्षिण लेबनॉनमधील परिस्थिती पूर्ण युद्धाची नाही, कारण हिजबूल आणि इस्रायल दोघेही एकमेकांवर दबाव आणण्यासाठी मर्यादित मार्ग वापरत आहेत.”

या हल्ल्यांकडे दबावाची रणनीती म्हणूनही पाहिले जात आहे. कारण इस्त्रायलने हमासशी करार करावा आणि गाझामधील लष्करी आक्रमण थांबवावे अशी हिजबूलची मागणी आहे. ७ ऑक्टोबरपासून गाझामध्ये ४२ हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दुसरीकडे, इस्रायलकडे हिजबूलपेक्षा श्रेष्ठ लष्करी क्षमता आहे आणि ही परिस्थिती चिघळल्यास हिजबूलला इस्रायलविरुद्ध बदला घेणे कठीण होईल.

हिजबूल काय आहे?

हिजबूलचा उल्लेख ‘देवाचा पक्ष’, असा केला जातो. ‘थिंक टँक सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अॅण्ड इंटरनॅशनल स्टडीज’ (सीएसआयएस)ने हिजबूलचे वर्णन जगातील सर्वांत मोठी सशस्त्र संघटना असे केले आहे. त्यामध्ये तोफखाना, रॉकेट्सचा वैविध्यपूर्ण साठा आहे, तसेच बॅलेस्टिक, अँटीएअर, अँटी टँक व अँटीशिप क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. हिजबूलची निर्मिती लेबनीज गृहयुद्ध (१९७५-१९९०) दरम्यान झाली. लेबनॉनच्या उत्तरेस इस्रायलची सीमा आहे. वांशिक आणि धार्मिक विभाजनांमध्ये १९४८ साली ज्यू लोकांसाठी एक राज्य म्हणून इस्रायलची निर्मिती झाली आणि त्या प्रदेशात तणाव वाढला. अनेक स्थलांतरित लेबनॉनमध्ये आले. इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनी गनिमी सैनिकांना काढण्यासाठी १९७८ मध्ये व पुन्हा १९८२ मध्ये दक्षिण लेबनॉनवर आक्रमण केले. १९७९ मध्ये इराणमध्ये ईश्वरशासित इस्लामिक सरकारच्या स्थापनेपासून प्रेरित होऊन, याच सुमारास हिजबूलचा उदय झाला.

हिजबूल संघटनेची उद्दिष्टे काय?

हिजबूल संघटनेचा मध्य पूर्वेतील इस्रायल आणि पाश्चात्य प्रभावाला विरोध आहे. सुन्नी मुस्लीम आणि शिया मुस्लीम यांचे संरक्षण करणारी शक्ती म्हणून ही संघटना उदयास आली आहे. इस्त्रायल आणि सौदी अरेबियाचा कट्टर मित्र असलेल्या अमेरिकेचा अंदाज आहे की, इराण हिजबूलला लाखो डॉलर्सचा निधी पुरवतो. हिजबूल २००० च्या दशकाच्या मध्यात लेबनीज राजकारणात उतरला आणि सध्या त्यांच्याकडे देशाच्या संसदेत १२८ पैकी १३ जागा आहेत. परंतु, अलीकडच्या वर्षांत, लेबनॉनमधील अनेकांनी गरिबी आणि बेरोजगारीच्या विरोधात निषेध केला आहे. अमेरिका आणि इस्रायलने हिजबूल ही दहशतवादी संघटना असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : काय आहे इस्रोचे ‘मिशन व्हीनस’? इस्रोला शुक्राचा अभ्यास का करायचा आहे? जाणून घ्या या मोहिमेचे उद्दिष्ट

‘सीएसआयएफ’च्या मते, “पक्षाच्या शस्त्रागारात प्रामुख्याने लहान रॉकेटचा समावेश आहे. इस्रायल आणि हिजबूल यांच्यात २००६ च्या युद्धात १५ हजार रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे डागली गेल्याचा इस्रायलचा अंदाज आहे. “हिजबूलने आपल्या रॉकेटच्या साठ्यात वाढ केली आहे. आज हिजबूलकडे अंदाजे १,३०,००० रॉकेट्स आहेत,” असे सांगण्यात आले आहे. संघटनेचे नेते हसन नसराल्लाह यांनी असेही म्हटले आहे की, २००६ पासून हिजबूलने अचूक मार्गदर्शन प्रणालीचा विस्तार केला आहे. हा त्यांच्या शस्त्रागारातील सर्वांत मोठा बदल आहे. यूएस सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सी (सीआयए)च्या वर्ल्ड फॅक्ट बुकमध्ये लिहिले आहे की, हिजबूलकडे ४५ हजार लढवय्ये असण्याबाबतचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Story img Loader