एखाद्या देशाची तरुण पिढी मद्यपान करत नाही, ही बाब संबंधित देशासाठी चिंतेचा विषय ठरू शकते का? हा प्रश्न कुणालाही विचारला तर बहुसंख्य लोकांचं उत्तर ‘नाही’ असंच असू शकतं. पण जपानमध्ये याउलट परिस्थिती आहे. येथील तरुण पिढी दारू पित नाही, म्हणून जपान सरकारची चिंता वाढली आहे. परिणामी जपानमधील तरुणांनी जास्तीत जास्त मद्यपान करावं, यासाठी सरकारने एक स्पर्धा आयोजित केली आहे.

जपान सरकारने दारूचा खप वाढवण्यासाठी तरुणांकडे सल्ला किंवा कल्पना सुचवण्याचं आवाहन केलं आहे. दारूच्या सेवनाला प्रोत्साहन देण्यासाठी जपानने “सेक व्हिवा” स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना दारूचा खप वाढवण्यासाठी व्यावसायिक आराखडा तयार करण्यास सांगितलं जात आहे. यातून सेक, शोचू, अवामोरी आणि बीअर यांसारख्या अमली पदार्थांचा प्रचार करणं, हा मुख्य हेतू आहे.

Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

दारूचा खप वाढवण्यासाठी प्रचाराची गरज का पडली?
मागील काही वर्षांपासून जपानमधील मद्य उद्योगात सातत्याने घट होत आहे. नॅशनल टॅक्स एजन्सीच्या अहवालानुसार, २०२० या आर्थिक वर्षात एकूण कर संकलनाच्या तुलनेत दारूतून मिळणारा महसूल हा १.९ टक्के इतका आहे. तर १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० मध्ये हाच वाटा ३.३ टक्के इतका होता. २००० मध्ये ३.६ टक्के आणि १९९४ मध्ये मद्य कर संकलन एकूण कर संकलनाच्या ४.१ टक्के होतं. २०२१ च्या एका अहवालानुसार, जपानमध्ये १९९९ साली दारूच्या खपातून सर्वाधिक महसूल गोळा झाला होता. तेव्हापासून आजतागायत दारूतून मिळणाऱ्या महसूलाला उतरती कळा लागली आहे.

‘या’ कारणांमुळे जपानमध्ये मद्य उद्योगाचं कंबरडं मोडले
सुरुवातीला बीअर हे जपानमधील सर्वाधिक विकले जाणारे करपात्र अमली पदार्थ होतं. परंतु नंतरच्या काळात ग्राहकांच्या पसंती बदल गेल्या. लोकं बीअरऐवजी कमी किमतीत मिळणारे स्पार्कलिंग मद्य किंवा चुहाई यासारख्या बीअर समान अमली पदार्थांना पसंती देऊ लागले.

करोना काळात मद्य उद्योगावर गंभीर परिणाम झाला. लॉकडाऊनच्या कालावधीत हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवर मर्यादा आल्या. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर दारूचा खप वाढला. पण दरम्यान मद्याच्या किमती वाढल्याने लॉकडाउननंतरही मद्याच्या खपावर परिणाम झाल्याचं दिसत आहे.

हेही वाचा- विश्लेषण : १००० कोटींचे गिफ्ट्स आणि ‘डोलो ६५०’ची तुफान विक्री; सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय?

‘Sake Viva’ च्या वेबसाइटनुसार, करोना साथीच्या काळात जन्मदरात झालेली घट आणि वृद्धांची वाढती संख्यादेखील दारू उद्योगासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. २०२० च्या IMF अहवालानुसार, जपान हा जगातील सर्वात म्हातारा देश बनला असून येथील लोकांचं सरासरी वय ४८.४ वर्षे इतकं आहे. तसेच जपानची सध्याची लोकसंख्या १२.७ कोटी इतकी आहे, २०६० पर्यंत ती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

‘सेक व्हिवा’ स्पर्धा नेमकी काय आहे?
तरुणांमध्ये दारू पिण्याचा कल वाढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सेक व्हिवा’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत २० ते ३९ वयोगटातील तरुण सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेअंतर्गत तरुणांना त्यांच्या पिढीत दारू पिण्याचे प्रमाण कसे वाढवता येईल? हे सांगावे लागेल. या स्पर्धेत जाहीरात (प्रमोशन), ब्रँडिंगसह अत्याधुनिक योजनांवरही रणनीती तयार करावी लागणार आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

दारूला प्रोत्साहन देण्याच्या आरोपांवर एजन्सीचे स्पष्टीकरण
ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, जपानच्या राष्ट्रीय कर एजन्सीने म्हटले आहे की, ते नागरिकांना जास्त प्रमाणात मद्यपान करण्यास सांगत नाहीत. तर केवळ आर्थिक विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा- विश्लेषण : औषधाची गोळी घेताना थोडं उजवीकडे झुकल्यास होतो फायदा; नेमकं काय आहे कारण? संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर!

जून महिन्यामध्ये, ‘द असाही शिम्बून’ या जपानी दैनिकाने क्योटो विद्यापीठाचे एक सर्वेक्षण सादर केले होते. या सर्वेक्षणानुसार करोना महामारीच्या काळात घरांमध्ये दारूचे सेवन वाढले होते. परिणामी दारूच्या सेवनाशी संबंधित आजारांमध्येही वाढ झाली होती. एप्रिल-जून २०२० मध्ये, करोना महामारीच्या आधीच्या तुलनेत १.२ पट अधिक लोकांना मद्यपान-संबंधित यकृत किंवा स्वादुपिंडाच्या आजारांमुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.