संतोष प्रधान

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करणारा अहवाल तमिळनाडू विधानसभेत सादर करण्यात आल्याने अण्णा द्रमुकमधील राजकीय संदर्भ बदलले आहेत. पलानीस्वामी आणि पेनीरसेल्वम या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये पक्षावर नियंत्रण ठेवण्यावरून वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पक्षाची सूत्रे हाती घेण्यासाठी संधीच्या शोधात असलेल्या शशिकला यांना मोठा धक्का बसला आहे. कारण चौकशी अहवालात जयललिता यांच्या मृत्यूबद्दल शशिकला यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर
Dilip Ghosh comments on Mamata TMC
दिलीप घोष यांच्या ममतांवरील स्त्रीद्वेष्टा टिप्पणीनंतर बंगालच्या राजकारणात वादळ, टीएमसीची थेट निवडणूक आयोगाकडे धाव

जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करणारा अहवाल वादग्रस्त का ठरला आहे ?

जयललिता यांचा डिसेंबर २०१६ मध्ये मृ्त्यू झाला. तेव्हा सत्तेत असणाऱ्या अण्णा द्रमुक सरकारने जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्याकरिता आयोग नेमला होता. या चौकशीचा अहवाल अलीकडेच तमिळनाडू विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांची जवळची मैत्रीण शशिकला यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. शशिकला यांनी माहिती दडवली असाही आक्षेप घेण्यात आला आहे. शशिकला यांच्याबरोबरच माजी आरोग्यमंत्री तसेच काही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. शशिकला यांच्यावर चौकशी आयोगाने थेट ठपका ठेवल्याने तमिळनाडूच्या राजकारणाचे संदर्भाच बदलले आहेत. आयोगाने शशिकला यांची अधिक चौकशी करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

अण्णा द्रमुकच्या राजकारणावर या अहवालाचा काय परिणाम होणार ?

जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये एकजिनसीपणा राहिला नाही. पक्षात फूट पडली. जयललिता या गंभीर आजारी असताना पेनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी मुख्यमंत्रीपद बळकविण्याचा प्रयत्न केला. पण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात त्यांना शिक्षा झाली आणि त्यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. शशिकला यांनी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली. शशिकला तुरुंगात गेल्या. पलानीस्वामी आणि पेनीरसेल्वम यांच्यात वाद सुरू झाला. शेवटी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी हस्तत्रेप करीत पलानीास्वामी आणि पेनीरसेल्वम यांच्यात समझोता घडवून आणला. पुढे विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकचा पराभव झाला आणि पलानीस्वामी यांना पेनीरसेल्वम यांनी विरोध सुरू केला.

विश्लेषण: पाकिस्तान FATF च्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर; पण म्हणजे नेमकं काय? भारताचा विरोध का?

पक्षात दोन सत्ताकेंद्रे नसावीत, अशी मोहीम उघडण्यात आली आणि पेनीरसेल्वम यांचे पक्षावरील नियंत्रण गेले. या दोन नेत्यांमध्ये सध्या न्यायालयानी वाद सुरू आहे. पलानीस्वामी गटाने पेनीरसेल्वम यांची पक्षातूनच हकालपट्टी केली. तुरुंगातून सुटल्यापासून शशिकला यांची राजकीय महत्त्वाकांक्षा बळावली आहे. त्यांना पक्षाची सूत्रे स्वत:च्या हाती हवी आहेत. शशिकला सध्या अधिकच सक्रिय झाल्या होत्या. या दोन नेत्यांच्या वादात अण्णा द्रमुकची सूत्रे स्वत:कडे घेण्याकरिता त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. पण जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी थेट त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याने अण्णा द्रमुकमध्ये त्यांना पाठिंबा मिळणे कठीण आहे. अण्णा द्रमुकमध्ये आधीच पक्षावर नियंत्रण ठेवण्यावरून दोन गट पडले आहेत. ही संधी साधून द्रमुक सरकारने जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीचा अहवाल विधानसभेत मांडून प्रतिस्पर्धी अण्णा द्रमुकवर कुरघोडी केली आहे.

अहवालानंतर अण्णा द्रमुकच्या राजकारणात कोणाचे पारडे अधिक जड झाले ?

चौकशी अहवालानंतर अण्णा द्रमुकमधील वादाला वेगळे वळण लागले आहे. शशिकला यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याने पक्षावर नियंत्रण मिळविण्याचा त्यांचा मार्ग खुंटल्याचे मानले जाते. पलानीस्वामी यांना शह देण्याकरिता शशिकला व पेनीरसेल्वम एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण जयललिता यांच्या निधनाबद्दल शशिकला यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आल्याने त्यांना पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळणे कठीण मानले जाते.

विश्लेषण: भारत-पाकिस्तान सामन्याला इतके महत्त्व का? राजकीय तणावाचे क्रिकेटच्या मैदानावरही पडसाद? आर्थिक गणिते काय?

या साऱ्या घडामोडींमध्ये पलानीस्वामी यांचे पक्षातील पारडे अधिक जड होईल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकचा इतरत्र धुव्वा उडाला, पण पलानीस्वामी हे प्रतिनिधित्व करीत असलेल्या पश्चिम तमिळनाडूमध्ये मात्र अण्णा द्रमुकला चांगले यश मिळाले होते. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये पलानीस्वामी अधिक लोकप्रिय आहेत. या साऱ्या घडामोडीत पलानीस्वामी हे अण्णा द्रमुकवरील आपली पकड अधिक घट्ट करतील अशी चिन्हे आहेत.