भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि माजी मंत्री रमेश जरकीहोली यांनी कर्नाटक काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे कर्नाटकातलं सेक्स सीडी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तसंच कर्नाटकात काँग्रेस विरूद्ध भाजपा असा सामना रंगताना दिसतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेक्स स्कँडल प्रकरणामुळे कर्नाटकाच्या मंत्रिमंडळातून भाजपाचे नेते रमेश जरकीहोली यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी सोमवारी हा आरोप केला की त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तसंच यामागे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा हात आहे. जाणून घेऊयात हे प्रकरण नेमकं काय आहे?

सेक्स सीडीमुळे रमेश जरकीहोली यांना द्यावा लागला राजीनामा

मार्च २०२१ मध्ये सेक्स सीडी प्रकरण हे कर्नाटकात चांगलं गाजलं होतं. त्यावरून कर्नाटकच्या राजकारणात हंगामा झाला होता. जलसंधारण मंत्री रमेश जरकीहोली यांच्यावर या प्रकरणात आरोप झाले होते. . त्यांना या प्रकरणात आपलं पद सोडावं लागलं. त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हा दावा केला होता की रमेश जरकीहोली यांनी सरकारी नोकरी देण्याच्या बदल्यात माझ्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि बलात्कारही केला.

भाजपाला हे प्रकरण पडलं महागात

रमेश जरकीहोली यांचं हे सीडी प्रकरण भाजपाला चांगलंच भोवलं. या सीडी प्रकरणामुळे भाजपाला निवडणुकीतही नुकसान झालं होतं. रमेश जरकीहोली यांनी या प्रकरणासाठी काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांना जबाबदार ठरवलं. डी. के शिवकुमार यांनी माझ्या बदनामी करण्यासाठी हे सगळं कुभांड रचलं असा आरोप त्यांनी केलं. हे सेक्स सीडी प्रकरण पश्चिम बंगाल निवडणूक होण्याआधी बाहेर आलं होतं. त्यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली.

या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा आमदार का करत आहेत?

रमेश जरकीहोली यांनी या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या टोळीचा पत्ता लावण्यासाठी या प्रकरणी CBI चौकशीची मागणी केली आहे. रमेश जरकीहोली यांची गणती कर्नाटकच्या वरिष्ठ आणि दिग्गज नेत्यांमध्ये केली जात होती. मात्र २०२१ मध्ये आरोप होणं आणि त्यानंतर राजीनामा द्यावा लागणं यामुळे त्यांच्या प्रतिमेलाही तडा गेला. रमेश जरकीहोली यांनी या सगळ्या प्रकरणात झालेले आरोप फेटाळले होते.

रमेश जरकीहोली यांचं म्हणणं काय?

रमेश जरकीहोली यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनी असं म्हटलं आहे की या प्रकरणाचं सत्य समोर आणण्यासाठी महिलेला आणि तिच्या सहकाऱ्यांना अटक केली गेली पाहिजे. मी ही मागणी करतो की या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत केली गेली पाहिजे. काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी माझं व्यक्तीगत आयुष्य धुळीला मिळवण्यासाठी माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.

डी. के. शिवकुमार यांच्यावर का आरोप होत आहेत?

रमेश जरकीहोली यांचं हे म्हणणं आहे की डी. के. शिवकुमार नेते म्हणवण्यासाठी योग्य नाहीत. कुठल्याही व्यक्तीचं खासगी आयुष्य धुळीला मिळवणं चुकीचं आहे. मी कधीही कुणावरही व्यक्तीगत नुकसान होईल अशा प्रकारची टीका किंवा आरोप केले नाहीत. या सगळ्या प्रकरणामागे डी. के. शिवकुमार यांचा हात आहे. रमेश जरकीहोली यांनी असंही म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होत आहेत.

रमेश जरकीहोली यांनी हे देखील आरोप लावले आहेत की काँग्रेस नेत्यांसह इतर पक्षाच्या नेत्यांना आणि काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये फसवलं जातं आहे. तसंच या आधारे त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka sex cd scandal why bjp mla ramesh jarkiholi seeks cbi inquiry scj
First published on: 02-02-2023 at 20:29 IST