अण्वस्त्रांचा अभिमान बाळगणाऱ्या देशांपैकी एक देश आहे उत्तर कोरिया. अमेरिकेसारख्या देशांना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने अनेकदा अण्वस्त्रांची धमकीही दिली आहे. ‘आर्म्स कंट्रोल असोसिएशन’च्या जुलैच्या अहवालानुसार, अमेरिका, रशिया, फ्रान्स, भारत, युनायटेड किंग्डम आणि इतर काही देशांकडे १२ हजारांपेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. त्यातील अंदाजे नऊ हजार अण्वस्त्रे सक्रिय आहेत. मात्र, अण्वस्त्रे असणाऱ्या देशांपैकी एक असणारा उत्तर कोरिया या देशांपेक्षा वेगळा आहे. कारण- उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रांचा छोटासा शस्त्रसाठा आहे. परंतु, हुकूमशहा किम जोंग उन यांनी अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याचा निर्धार केला आहे. ही जगासाठी चिंतेची बाब आहे. किम जोंग उन यांच्या या घोषणेने उत्तर कोरिया युद्धाची तयारी करीत आहे का, असादेखील प्रश्न निर्माण होत आहे.

किम जोंग उन यांनी उत्तर कोरियातील शस्त्रागाराचा दौरा केला आणि अधिक शस्त्रे तयार करण्याकरिता नवीन सेंट्रीफ्यूजेस (शस्त्रात वापरल्या जाणाऱ्या युरेनियमचे ठिकाण) तयार करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे उत्तर कोरियातील अणु शस्त्रागार जगभरात मोठा चर्चेचा विषय ठरले आहे. उत्तर कोरिया खरंच युद्धाची तयारी करीत आहे का? या देशाकडे एकूण किती अण्वस्त्रे आहेत? अण्वस्त्रे तयार करण्यासाठी उत्तर कोरियाला मदत कोण करते? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

china retierment age rising
चीनवर निवृत्तीचे वय वाढवण्याची वेळ का आली? ४० वर्षांनंतर का घ्यावा लागला एवढा मोठा निर्णय?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
typhoon yagi
‘Typhoon Yagi’चा ‘या’ देशांना तडाखा, विनाशकारी चक्रीवादळामुळे अनेकांचा मृत्यू; ही वादळं कशी तयार होतात?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
Putin warns NATO
विश्लेषण: … तर युक्रेन युद्ध रशिया विरुद्ध ‘नाटो’ असे बदलेल… पुतिन यांची धमकी किती गंभीर?
किम जोंग उन यांनी उत्तर कोरियातील शस्त्रागाराचा दौरा केला आणि अधिक शस्त्रे तयार करण्याकरिता नवीन सेंट्रीफ्यूजेस तयार करणार असल्याचे सांगितले. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : ‘Typhoon Yagi’चा ‘या’ देशांना तडाखा, विनाशकारी चक्रीवादळामुळे अनेकांचा मृत्यू; ही वादळं कशी तयार होतात?

उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम

उत्तर कोरियाने १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला अण्वस्त्र कार्यक्रम सुरू केला. डिसेंबर १९५२ मध्ये सरकारने अणुऊर्जा संशोधन संस्था आणि विज्ञान अकादमीची स्थापना केली. उत्तर कोरियाने जेव्हा सोविएत युनियनशी सहकार्य करार केला, तेव्हाच अणुऊर्जा कार्य प्रगतिपथावर येऊ लागले. सोविएत युनियन आणि काही प्रमाणात चीनच्या मदतीने उत्तर कोरियाने आपला आण्विक विस्तार सुरू ठेवला. देशाने युरेनियम मिलिंग सुविधा, फ्यूएल रॉड फॅब्रिकेशन कॉम्प्लेक्स आणि 5MW(e) अणुभट्टीची निर्मिती केली. सप्टेंबर १९९१ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांनी घोषणा केली की, अमेरिका दक्षिण कोरियामधून अण्वस्त्रे काढून घेईल. १८ डिसेंबर १९९१ रोजी राष्ट्राध्यक्ष रोह टे वू यांनी घोषित केले की, दक्षिण कोरिया अण्वस्त्रमुक्त आहे. तेव्हाच उत्तर आणि दक्षिण कोरियाने कोरियन द्वीपकल्पाच्या अण्वस्त्रमुक्तीकरणाच्या संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली; ज्याद्वारे दोन्ही बाजूंनी अण्वस्त्रांची चाचणी, उत्पादन, साठवण, तैनात किंवा वापर करणार नाही, असे वचन दिले गेले.

मात्र, २००३ मध्ये सर्व काही बदलले आणि उत्तर कोरियाने घोषित केले की, त्यांना यापुढे कराराचे बंधन राहणार नाही. त्यांनी त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरू केला. त्यानंतर उत्तर कोरियाने पुन्ग्ये-री चाचणी साइटवर (Punggye-ri test site) आपली पहिली अणुचाचणी घेतली. मे २००९ मध्ये हर्मिट साम्राज्याने त्याची दुसरी अणुचाचणी केली. त्यानंतर फेब्रुवारी २०१३, जानेवारी २०१६ व सप्टेंबर २०१६ मध्ये इतर अणुचाचण्या घेण्यात आल्या. २०१७ मध्ये उत्तर कोरियाने आपली शेवटची अणुबॉम्ब चाचणी केली होती. त्या स्फोटाची शक्ती १०० ते ३७० किलोटन यादरम्यान होती. अमेरिकेने १९४५ मध्ये हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा हा बॉम्ब सहा पट अधिक शक्तिशाली आहे.

२०१७ मध्ये उत्तर कोरियाने आपली शेवटची अणुबॉम्ब चाचणी केली होती. (छायाचित्र-रॉयटर्स)

अलीकडच्या वर्षांत किम जोंग उन यांनी देशाच्या आण्विक कार्यक्रमाला गती देण्याचे वचन दिले आहे. २०२१ मध्ये त्यांनी घोषित केले की, आपले लक्ष्य आपल्या देशाला सर्वांत शक्तिशाली आण्विक शक्ती ठरवणे आहे. त्यांनी असेही घोषित केले की, अण्वस्त्रधारी देश म्हणून देशाची स्थिती आता अपरिवर्तनीय ठरत आहे. सोमवारी त्यांच्या सरकारच्या ७६ व्या स्थापना वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भाषणात किम यांनी शत्रूंच्या शक्तींपासून देशाचे रक्षण करण्यासाठी देशाच्या अण्वस्त्रसाठ्याला लवकरात लवकर चालना देण्याचे वचन दिले. ते पुढे म्हणाले की, देश अण्वस्त्र दलासह राज्याच्या सर्व सशस्त्र दलांना लढाईसाठी पूर्णपणे तयार करण्यासाठी आपले प्रयत्न दुप्पट करील.

उत्तर कोरियाकडे किती अण्वस्त्रे आहेत?

उत्तर कोरिया आपली माहिती गुप्त ठेवतो. सर्व आशियाई देशांमध्ये हा देश एकटा पडला आहे. त्यामुळे या देशाकडे किती अण्वस्त्रे आहेत, हे सांगता येणे शक्य नाही. परंतु, तज्ज्ञांनी असा अंदाज केला आहे की, उत्तर कोरियाकडे ४० ते ५० अण्वस्त्रे आहेत. अण्वस्त्रे असलेल्या नऊ राष्ट्रांपैकी हा आकडा सर्वांत कमी आहे. तर दुसरीकडे, ‘रँड कॉर्प’ आणि एसन इन्स्टिट्यूटच्या विश्लेषणाचा अंदाज आहे की, किम जोंग उनकडे ११६ अण्वस्त्रे आहेत. दरम्यान, सिओल येथील कोरिया इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स ॲनालिसिसने २०२३ मध्ये ही संख्या ८० ते ९० असल्याचे सांगितले आहे आणि देशाला ही संख्या १००-३०० पर्यंत न्यायची असल्याचेही त्यात नमूद केले आहे.

उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे डागण्याची क्षमता असलेली पाणबुडीही आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स (एफएएस) च्या मते, बहुतेक शस्त्रे ही १० ते २० किलोटन वजनाची असून, ही सिंगल-स्टेज फिशन शस्त्रे आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियामध्ये विविध भू-आधारित क्षेपणास्त्र प्रणालींवरील क्षेपणास्त्रे आहेत. त्यामध्ये इंटरकाँटिनेन्टल बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे (ICBMs) समाविष्ट आहेत. ही क्षेपणास्त्रे दूर अंतरावरील अमेरिकेला लक्ष्य करण्यास सक्षम आहेत. उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे डागण्याची क्षमता असलेली पाणबुडीही आहे. ‘हिरो किम कुन ओके’ असे या पाणबुडीचे नाव आहे.

उत्तर कोरिया आपली अण्वस्त्रे कशी तयार करतो?

कोणत्याही देशाला अण्वस्त्रे तयार करायची असल्यास युरेनियम आणि प्लुटोनियमची आवश्यकता असते. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाकडे वर्षाला सहा बॉम्ब तयार करण्यासाठी पुरेसे युरेनियम आहे. उत्तर कोरियाने त्याच्या पुरातन ‘Yongbyon’ कॉम्प्लेक्समधील आण्विक अणुभट्टीमध्ये प्लुटोनियम-उत्पादन कार्य पुन्हा सुरू केले आहे. उत्तर कोरियाला ही आण्विक शस्त्रे तयार करण्यासाठी गुप्त पद्धतीने पैसा मिळतो. वृत्तात असे म्हटले आहे की, उत्तर कोरिया गुप्त हस्तांतरणाद्वारे आणि रॅन्समवेअर हल्ल्यांद्वारे (सायबर हल्ले) परकीय चलन मिळवतो.

हेही वाचा : सुनीता विल्यम्स अंतराळातून मतदान कसं करणार?

ब्लूमबर्गच्या वृत्तात असेही म्हटले आहे की, किमच्या राजवटीत सायबर गुन्ह्यांमधून तीन अब्ज डॉलर्सची कमाई केली गेली आहे आणि ते ही कमाई आणखी वाढवण्याच्या तयारीत आहेत. सिओलच्या एसन इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजचे सुरक्षा तज्ज्ञ यांग उक यांनी ‘एपी’ला सांगितले, “एकंदरीत, किम जोंग उन आपल्या घोषणेतून स्पष्टपणे सांगत आहेत की, ते सतत आण्विक शस्त्रांचे उत्पादन करीत आहे. हा संदेश एक तर त्यांना दक्षिण कोरियाला द्यायचा किंवा अमेरिकेला.”