– मंगल हनवते

म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीची मागील एक-दीड वर्षांपासून इच्छुकांना प्रतीक्षा आहे. आता मात्र कोकण मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे. कोकण मंडळाने ४७५२ घरांसाठीच्या सोडतीची घोषणा केली आहे. म्हाडाच्या माध्यमातून ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार आणि कल्याण अशा ठिकाणी परवडणाऱ्या दरात घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध झाली आहे.

Assistant police officers son succeeds in UPSC examination
पिंपरी : सहायक फौजदाराच्या मुलाची ‘यूपीएससी’ परीक्षेत यशाला गवसणी
System for one vote of disabled person in remote village
लोकशाहीची खरी ताकद! दिव्यांग व्यक्तीच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात
Controversy over opting out in recruitment process of Maharashtra Public Service Commission
‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….
akola registers highest temperature in Maharashtra
उन्हाच्या तडाख्यामुळे पारा ४१ अंशांवर, किती दिवस राहणार उष्णतेच्या झळा?

कुठे किती घरे?

या सोडतीत विरार-बोळीजमधील सर्वाधिक २०४८ घरांचा समावेश असून या घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेद्वारे केली जाणार आहे. कोकण मंडळाला राज्य सरकारच्या २० टक्के सर्वसमावेशक योजनेतून मिळालेल्या ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील १५५४ घरांचाही समावेश आहे. या घरांना सर्वाधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेतील ९८४ घरांचाही समावेश आहे. उर्वरित घरे म्हाडा गृहनिर्माण योजनेतील आहेत. यात पेण आणि रोह्यातील १४ भूखंडांचा समावेश आहे. या भूखंडांची विक्री साडेचार लाख ते साडेनऊ लाखात केली जाणार आहे. त्याच वेळी सोडतीत सात लाखांपासून थेट ६० लाखांपर्यंतच्या घरांचा समावेश आहे. बाळकुम येथील उच्च गटातील तीन घरांच्या किमती ६० लाख रुपये अशा आहेत.

महत्त्वाच्या तारखा कोणत्या?

म्हाडा सोडतीच्या नवीन बदलानुसार आता सोडतीसाठी कायमस्वरूपी एकच नोंदणी करावी लागते. म्हणजे एकदा नोंदणी केली की पुन्हा नोंदणी करण्याची गरज आता नाही. त्यानुसार आज नोंदणी केली तर अगदी दहा वर्षांनीही या नोंदणीद्वारे अर्ज करता येईल. त्यानुसार ५ जानेवारीपासून एकाच नोंदणीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सव्वा लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. आता कोकण मंडळाच्या सोडतीत सहभागी व्हायचे असेल तर लगेचच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. या सोडतीसाठी सोमवारपर्यंत (१२ मार्च) अर्ज केला आहे. त्यांनी आरटीजीएस-एनईएफटीद्वारे १२ एप्रिलपर्यंत अनामत रक्कम भरायची आहे. अर्जदारांची प्रारूप यादी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध होईल. अंतिम यादी ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध होईल. दरम्यान २८ एप्रिलला अर्जदारांना हरकती नोंदवता येतील. त्यानंतर १० मे रोजी सकाळी १० वाजता ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सोडत काढण्यात येणार आहे.

उत्पन्न गट कसे आहेत?

गरजू, गरीब आणि बेघरांना परवडणाऱ्या दरात घरे देणे हेच मुख्य उद्दिष्ट म्हाडाचे आहे. त्यामुळेच उत्पन्न गट तयार करत अत्यल्प आणि अल्प गटाला प्राधान्याने घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हाडाचा आहे. त्यानुसार अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गट असे चार उत्पन्न गट तयार करण्यात आले आहेत. पती आणि पत्नीचे मासिक उत्पन्न गृहीत धरले जाते. महत्त्वाचे म्हणजे २०२२मध्ये म्हाडाने उत्पन्न गटाच्या मर्यादेत बदल केले असून या बदलानुसार पहिल्यांदाच कोकण मंडळाची सोडत निघणार आहे. त्यानुसार आता कोकण मंडळातील अत्यल्प गटासाठी घरांसाठीच्या इच्छुक अर्जदारांसाठी वार्षिक ६ लाख रुपये (प्रति महिना ५० हजार रुपये) अशी उत्पन्न मर्यादा असणार आहे. अल्प गटासाठी ६,००,००१ ते ९,००,००० रुपये, मध्यम गटासाठी ९,००,००१ ते १२,००,००० रुपये आणि उच्च गटासाठी १२,००,००१ रुपये ते १८,००,००० रुपये असे उत्पन्नाचे निकष आहेत. आता अत्यल्प गटातील अर्जदार अल्प, मध्यम आणि उच्च गटातही अर्ज करू शकतील. अल्प गटातील अर्जदार मध्यम आणि उच्च गटात तसेच मध्यम गटातील अर्जदार उच्च गटातही अर्ज करू शकतील. मात्र त्याच वेळी उच्च गटासाठी केवळ उच्च गटातील घरांचाच पर्याय असणार आहे.

हेही वाचा : मुंबई मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपेना; अद्याप जाहिरातीची तयारी नाही, घरांची संख्याही अनिश्चित

अनामत रक्कम किती?

कोकण मंडळाने या सोडतीपासून अनामत रक्कमेत बदल केले आहेत. त्यामुळे आता इच्छुकांना अर्ज भरणे काहीसे महाग झाले आहे. नव्या बदलानुसार आता अत्यल्प गटाला १० हजार रुपये, अल्प गटासाठी २० हजार, मध्यम गटासाठी ३० हजार आणि उच्च गटासाठी ४० हजार रुपये अशी अनामत रक्कम असणार आहे. पंतप्रधान आवास योजना, २० टक्के योजना आणि म्हाडा गृहयोजनेसाठी ही अनामत रक्कम आहे. प्रथम प्राधान्यसाठी अनामत रक्कमेत भरमसाट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार प्रथम प्राधान्य योजनेतील अत्यल्प गटासाठी २५ हजार, अल्पसाठी ५० हजार, मध्यमसाठी ७५ आणि उच्चसाठी एक लाख रुपये अशी अनामत रक्कम आहे. या रक्कमेसह ५९० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागेल. दरम्यान सोडतीत अयशस्वी ठरल्यास अनामत रक्कम आठ दिवसात परत केली जाईल.