– ज्ञानेश भुरे

भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी चार दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंबाबत काही वक्तव्ये एका वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये केली. या वक्तव्यांनी खरे तर भारतीय क्रिकेट ढवळून निघणे अपेक्षित होते. पण, त्यावर फारशी कुणी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अचानक चार दिवसांनी चेतन शर्मा यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आले. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर चेतन शर्मांनी राजीनामा दिल्याने सर्व प्रश्न मिटतात का किंवा त्यांच्या राजीनाम्याने नेमके काय साधले, या बाबतचा घेतलेला हा परामर्श..

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
candidates tournament 2024 marathi news, candidates tournament 2024 chess marathi news
विदित, प्रज्ञानंद, गुकेश… यांच्यातील कोणी विश्वनाथन आनंद बनेल?
US statement despite India objection that the legal process should be fair and transparent
‘कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असावी’ ; भारताच्या आक्षेपानंतरही अमेरिकेचे वक्तव्य

चेतन शर्मांच्या वक्तव्यातील नेमके काय खटकले?

चेतन शर्मांनी एका वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट नियामक मंडळ यांबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यात खेळाडू तंदुरुस्त राहण्यासाठी इंजेक्शन्सचा वापर करतात आणि टी-२० संघाचा कर्णधार होण्यापूर्वी हार्दिक पांड्या सारखा आपल्या घरी येत होता, ही दोन वक्तव्ये शर्मांना चांगलीच महागात पडली.

चेतन शर्मांवर कारवाई अपेक्षित होती की त्यांचा राजीनामा?

भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट मंडळ यांच्याबाबत गंभीर वक्तव्ये केल्यानंतरही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पदाधिकारी गप्प होते. मंडळाचा एकही पदाधिकारी बोलत नव्हता. एक तर या वक्तव्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केले, नाही तर ही वादळापूर्वीची शांतता अशीच दोन कारणे पुढे येत होती. केवळ याबाबत सर्वाधिकार सचिव जय शहा यांना देण्यात आल्याचे समोर येत होते. असेही शर्मा क्रिकेट मंडळाला नकोच होते. ट्वेंन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर अचानक घडून आलेल्या नाट्यात चेतन शर्मा पुन्हा निवड समितीचे अध्यक्ष बनले. पुढे हे स्टिंग ऑपरेशन समोर आले. तेव्हा शर्मांवर तातडीने कारवाई होणार असेच वाटत होते. मात्र, यापैकी काहीच घडले नाही. तीन-चार दिवसांनंतर शर्मा रणजी अंतिम सामन्यासाठी उपस्थित असताना त्यांनी अचानक राजीनामा दिल्याचे आणि तो स्वीकारल्याचे जाहीर करण्यात आले. प्रसार माध्यमांशी बोलायचे नाही असा करार असतानाही शर्मांच्या वक्तव्यानंतर कारवाईच अपेक्षित होती.

शर्मांनी राजीनामा देण्यामागील नेमके कारण काय ?

रणजी सामना सुरू असताना अचानक शर्मांचा राजीनामा आल्यामुळे अनेक तर्कवितर्क समोर आले. कराराचा भंग करून प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यामुळे करारभंग किंवा आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे शर्मांचा राजीनामा घेण्यात आला असावा. राजीनामा देण्यासाठी शर्मांवर दडपण आणले गेले किंवा भाग पाडले असे मानले जात होते. मात्र, भारतीय खेळाडूंबाबत आणि संघातील वातावरणाबाबत थेट प्रसार माध्यमांशी विधाने केल्यामुळे संघ व्यवस्थापनही नाराज होते. निवड समिती अध्यक्ष म्हणून चेतन शर्मांनी विश्वास गमावला. संघ व्यवस्थापनानेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असे आता पुढे आले आहे.

बीसीसीआयची यामध्ये नेमकी काय भूमिका राहिली?

चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनमधील वक्तव्यानंतर बीसीसीआयने कुठलीही भूमिका स्पष्टपणे व्यक्त केली नाही. तटस्थपणे ते याकडे बघत राहिले. चेतन शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर मात्र, आम्ही कुठल्याही प्रकारचे दडपण शर्मांवर आणले नाही. शर्मांनी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा दिला. आम्ही त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देणार होतो. त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला अशी प्रतिक्रिया देऊन बीसीसीआय मोकळे झाले आहे. थोडक्यात, शर्मांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली नाही.

शर्मांच्या वक्तव्यानंतर पुढे काय? राजीनामा पुरेसा ठरतो का?

चेतन शर्मांनी केलेली वक्तव्यं अशीच सोडता येणार नाहीत. अर्थात, ही नवीन नाहीत. बीसीसीआयसमोर असलेली ही जुनीच कहाणी आहे. खासगीत चर्चेत येणाऱ्या गोष्टी शर्मांनी उघडपणे बोलून दाखवल्या हाच काय तो फरक आहे. शर्मांचा राजीनामा किंवा त्यांच्यावरील कारवाई हे या सगळ्याचे उत्तर असू शकत नाही. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आता चेतन शर्मा असे का म्हणाले किंवा त्यांना असे का बोलावे लागले याची उत्तरे शर्मांनी द्यायची आहेत आणि शर्मा यांनी केलेले आरोप खोटे किंवा तथ्यहीन आहेत हे बीसीसीआयने सिद्ध करावे. त्यामुळे नेहमीप्रमाणे चर्चेशिवाय वाद मिटवणे योग्य ठरणार नाही. शर्मांच्या वक्तव्यांनी खेळाडू आणि त्यांचे मतभेद, बीसीसीआयची भूमिका सारेच चव्हाट्यावर आले आहे. दोघांची प्रतिमा मलीन झाली आहे. ती स्वच्छ होणे गरजेचे आहे. बीसीसीआयला व्यवस्थापनात सुधारणा करावी लागणार यात शंका नाही.

हेही वाचा : चेतन शर्मांची गच्छंती! वादग्रस्त Video क्लिप भोवली, BCCIकडे राजीनामा सुपूर्द

या राजीनाम्याने काय साधले?

चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला म्हणून सगळे संपत नाही, तर अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. शर्मा यांच्या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ गप्प कसे बसले? ज्यांच्यावर आरोप केले ते खेळाडू काहीच बोलले नाहीत. संघ निवडीचा प्रश्न अनुत्तरितच राहणार.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला हे सगळे माहीत होते असा अर्थ घ्यायचा का? या राजीनाम्यामुळे एकच साधले, की क्रिकेट चाहते आणि अनेक खेळाडू कारकीर्द घडविण्यापूर्वी पुढे जायचे का, याचा जरुर विचार करतील. हे वाद, हा संघर्ष, मतभेद पूर्वीही होते. ते फक्त चेतन शर्मांच्या वक्तव्यांनी समोर आले आणि त्यांच्या राजीनाम्याने या सगळ्याला पुष्टी मिळाली. या सगळ्यात चेतन शर्मांचा खेळ झाला.