पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार आजपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरी नागरिकांना बूस्टर डोस (Corona Vaccine Booster Dose) देण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. कोविड-१९ लसीच्या बूस्टर डोससाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. राष्ट्रीय कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमाचे सध्याचे प्राधान्य सगळ्या पात्र लोकांना दोन डोससह संपूर्ण लसीकरणाला आहे, असं केंद्राने सांगितलं होतं.

बूस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. या बूस्टर डोससाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असेही केंद्राने म्हटले आहे. पात्र नागरिक, ज्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सहव्याधी असलेल्यांचा समावेश आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या पात्र व्यक्ती कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात. हा बूस्टर डोस घेण्यासाठी कोविनवर स्लॉट बुक करणे गरजेचे नाही. मात्र हे डोस कुठे मिळू शकतील याची माहिती कोविन अॅपवरच मिळू शकणार आहे. तिसरा डोस घेतल्यानंतर त्याची माहिती लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही दिसणार आहे.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

हेही वाचा – Deltacron : ओमायक्रॉननंतर, आता येत आहे डेल्टाक्रॉन! करोनाच्या नवीन प्रकाराचे आढळले २५ रुग्ण

ज्या ६० वर्षावरील व्यक्ती सहव्याधींनी ग्रस्त आहेत, त्यांनाच हा डोस देण्यात येणार आहे. या २२ व्याधींची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. हा डोस घेण्यासाठी डॉक्टरांकडून इतर कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने हा बूस्टर डोस घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या ६० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना ही लस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत देण्यात येणार आहे. मात्र खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी लसीकरण केंद्रांवर यासाठी पैसे मोजावे लागतील.

ज्यांचे दोन डोस घेऊन नऊ महिने म्हणजेच ३९ आठवडे झाले आहेत, त्यांनाच हा तिसरा बूस्टर डोस घेता येणार आहे. संबंधित व्यक्तीचा हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, त्यांना कोविनकडून तिसरा डोस घेण्याबाबतचा मेसेजही येणार आहे.