पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरतीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री पार्थ चटर्जी यांना अटक झाली. याशिवाय चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रुपयांची रोकड सापडली. यानंतर देशभरात पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याची चर्चा आहे. नेमका हा घोटाळा काय आहे? कशाप्रकारे हा घोटाळा झाला? यात कुणाचा सहभाग आहे? हा घोटाळा उघड कसा झाला? अशा अनेक प्रश्नांचं विश्लेषण…

पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पार्थ चटर्जी यांना अटक केली. तसेच चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात २० कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली ही रक्कम ‘स्कूल सर्व्हिस कमिशन’ (SSC) घोटाळ्याशी निगडित असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.

PSI Sanjay Sonawane, nagpur,
पीएसआय संजय सोनवणे म्हणतात, “मी पोलीस आयुक्तांना ओळखत नाही,” नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा काय आहे?

२०१४ मध्ये पश्चिम बंगाल सरकारने राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली. यासाठी राज्यस्तरीय निवड प्रक्रियेचं नोटिफिकेशनही जारी करण्यात आलं. प्रत्यक्षात भरतीला सुरुवात होता होता २०१६ साल उजाडलं. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी होते. भरती प्रक्रिया सुरू झाली आणि या भरतीविषयी कोलकाता उच्च न्यायालयात अनेक अनियमितता होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.

या तक्रारींनुसार, ज्या परीक्षार्थींना कमी गुण आहेत त्यांचंही नाव गुणवत्ता यादीत आलंय. याशिवाय ज्या परीक्षार्थींची नावं गुणवत्ता यादीत नाहीत, त्यांनाही नियुक्तीपत्र मिळाल्याच्याही तक्रारी समोर आल्या. कोलकाता न्यायालयात दाखल याचिकेत २५ नियुक्त्यांची उदाहरणं देत संपूर्ण भरतीत जवळपास ५०० बेकायदेशीर नियुक्ती झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सीबीआयने या भरतीच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांमध्येच घोळ झाल्याचा आरोप केलाय. परीक्षार्थींकडून केवळ त्यांचे व्यक्तिगत तपशील असलेले रिकाम्या उत्तर पत्रिका घेण्यात आल्याचाही आरोप होतोय.

हेही वाचा : Partha Chatterjee Arrest: ‘मला ममता बॅनर्जींना फोन करायचाय’, अधिकाऱ्यांची परवानगी, पण चार वेळा फोन करुनही मुख्यमंत्री फोन उचलेनात

या प्रकरणात सीबीआय भरती घोटाळ्याचा तपास करत आहे, तर ईडी बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. दुसरीकडे पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी माध्यमांशी बोलताना दोषी आढळल्यास चटर्जी यांच्यावर कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे.

चटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या डायमंड सिटी कॉम्पलेक्स येथील घरावर शुक्रवारी ईडीने धाड टाकली तेव्हा त्यांना धक्काच बसला. अर्पिता मुखर्जी यांच्याव्यतिरिक्त ईडीने शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी तसेच आमदार माणिक भट्टाचार्य तसेच अन्य काही व्यक्तींवरही केली आहे. तरीही आर्पिता यांच्या घरी सापडलेल्या दोन हजार आणि ५०० रुपयाच्या नोटांचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यासंदर्भातील बातम्या आणि माहिती शोधणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. समाजमाध्यमांवरही त्या चर्चेत आहेत.

अर्पिता कोण आहेत?

अर्पिता या पार्थ चटर्जींच्या निकटवर्तीय असून त्या पेशाने एक अभिनेत्री आणि मॉडेल आहेत. त्यांनी ओडिशी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केली आहेत. त्यांनी तामिळ चित्रपटांमध्येही कामं केली आहेत. बंगली चित्रपटांपैकी मामा-भांजे, पार्टरनसारख्या चित्रपटांमध्ये अर्पिता यांनी काम केलंय. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या पार्थ यांच्यासोबत बेहाला वेस्ट सेंट्रलमध्ये प्रचार करताना दिसून आल्या होत्या. मागील काही वर्षांपासून त्या दक्षिण कोलकात्यामधील एका आलिशान फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत.

हेही वाचा : ममता बॅनर्जींच्या सुरक्षेत मोठी चूक; अनोळखी व्यक्ती रात्रभर होता मुख्यमंत्री निवास परिसरात

अर्पिता आणि पार्थ मुखर्जी हे अनेकदा राजकीय कार्यक्रमांमध्येही एकत्र पहायला मिळाले. दक्षिण कोलकाता येथील लोकप्रिय दुर्गा पूजा समितीच्या समारंभात दोघांची पहिल्यांदा ओळख झाल्याचं सांगितलं जातं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्यानंतर नोटा मोजण्याच्या मशिनने ही रक्कम मोजण्यास सुरुवात केली. अनेक तास नोटा मोजण्याचं काम सुरु होतं. पार्थ यांच्याशी संबंधित एकूण १३ संपत्त्यांवर शुक्रवारपासून ईडीने छापेमारी सुरु केली आहे.