पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा निवृत्त होणार असून लवकरच नव्या लष्करप्रमुखांची घोषणा केली जाणार आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यांनी काढलेल्या रॅलीमुळे सध्या पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. असे असताना या देशाचे नवे लष्करप्रमुख कोण असतील याकडे समस्त जगाचे लक्ष लागलेले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये नव्या लष्करप्रमुखांची निवड कशी केली जाते? लष्करप्रमुखांना काय अधिकार असतात. तसेच पाकिस्तानमधील लष्कप्रमुख या पदाचे महत्त्व काय? यावर नजर टाकुया.

हेही वाचा >>> विश्लेषण : पैसा, संघाचा समोतल की अन्य काही, IPL मध्ये फ्रँचायझी खेळाडूंना संघमुक्त का करतात?

INDIA bloc parties manifestoes key issues against BJP
काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन; इंडिया आघाडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यांचे विश्लेषण
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!
Who are Majeed Brigade
माजीद ब्रिगेड कोण आहे? पाकिस्तानातल्या ग्वादर बंदरावर का केलं आक्रमण?

भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान हा देश उदयास आला. या देशात लष्करप्रमुखांचे विशेष महत्त्व आहे. मागील ७५ वर्षांमध्ये जवळपास तीन दशके पाकिस्तानवर लष्कराची सत्ता राहिलेली आहे. या काळात लष्काराने भारताविरोधात तीन युद्धे लढलेली आहेत. पाकिस्तानमध्ये सरकार अस्तित्वात असले तरी येथील निर्णयप्रक्रियेमध्ये लष्करप्रमुखांचा बराच हस्तक्षेप असतो. लष्करप्रमुख प्रामुख्याने सुरक्षा आणि परराष्ट्रविषयक धोरणांमध्ये हस्तक्षेप करतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अद्याप ताणलेलेच आहेत. याच कारणामुळे पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख कोण असतील तसेच त्यांचा भरत तसेच अन्य देशांप्रती दृष्टीकोन कसा असेल याला फार महत्त्व आले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : फेसबुक, ट्विटरनंतर आता अ‍ॅमेझॉन; जगप्रसिद्ध कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून का काढत आहेत?

विद्यमान लष्करप्रमुखांचा दृष्टीकोन आणि कामगिरी

जनरल कमर जावेद बाजवा यांची २०१६ साली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आपल्या काळात चीन आणि अमेरिकेशी पाकिस्तानचे संबंध सुधारण्याकडे भर दिलेला आहे. बाजवा यांनी पाकिस्तानच्या आर्थिक धोरणांमध्येही काही प्रमाणात दखल दिलेली आहे. पाकिस्तानसाठी आर्थिक मदत उभारण्यासाठी त्यांनी चीनसह मध्य पूर्वेतील देशांनी भेट दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माध्यमातून पाकिस्तानसाठी भांडवल उभे करण्यासाठी त्यांनी अमेरिकेशी चर्चादेखील केलेली आहे. तसेच लष्करप्रमुखपदी असताना बाजवा यांनी पाकिस्तानमधील उद्योगपतींची आपल्या कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी उद्योगपतींना अधिक कर भरण्यास प्रोत्साहित केले होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीत, पण कलम ३५४ नेमकं आहे तरी काय?

बाजवा यांच्या कार्यकाळातच २०१९ साली भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी बिघडले होते. याच वर्षात भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. मात्र बाजवा यांनी त्यावेळी वाद टाळण्यास प्राधान्य दिले होते. भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानी हद्दीत कोसळल्यानंतरही त्यांनी संयमी भूमिका घेतली होती.

बाजवा यांच्यावरही राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करण्यात आलेला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पंतप्रधान म्हणून निवडून येण्यास बाजवा यांनी मदत केली, असा आरोप राजकीय नेते करतात. तर माझ्या राजकीय अध:पतनासाठी बाजवा यांनी पभूमिका बजावली, असा आरोप इम्रान खान यांनी याच वर्षी केला होता.

हेही वाचा >>> विश्लेषण: भारताच्या परराष्ट्र खात्यापर्यंत पोहोचलं ‘हनीट्रॅप’चं जाळं; लोकांना कसं केलं जातं हनीट्रॅप? हेरगिरीसाठी कसा होतो वापर?

पाकिस्तानमध्ये लष्कप्रमुखांची निवड कशी केली जाते?

पाकिस्तानी लष्करप्रमुखाची निवड करण्यासाठी निश्चत प्रक्रिया असते. यामध्ये मावळते लष्करप्रमुख लष्करामधील सर्वात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचे नाव पंतप्रधानांकडे सोपवतात. लष्करामध्ये सर्वात वरिष्ठ असलेल्या चार अधिकाऱ्यांपैकीच एकाची लष्करप्रमुख म्हणून निवड केली जाते. पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो. मात्र अनेकवेळा ही मुदत वाढवली जाते. याच कारणामुळे पाकिस्तानमधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बाजवा यांनादेखील मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बाजवा यांच्यानंतर लष्करप्रमुखपदासाठी लेफ्टनंट जनरल असिम मुनीर, माजी गुप्तहेर विभाग प्रमुख साहीर शमशाद, कमांडर ऑफ दी रावळपिंडी कॉर्प्स अझहर अब्बास, आर्मी चिफ ऑफ जनरल स्टाफ नोमन महमूद ही चार नावं चर्चेत आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे नार्को चाचणीची चर्चा; देशातील परवानगीपूर्व पहिला प्रयोग कुठे, केव्हा आणि कसा झाला?

आगामी लष्करप्रमुख आणि पाकिस्तामधील अंतर्गत वाद

यााधीच्या लष्करप्रमुखांची पाकिस्तानमधील राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेच्या काळात महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. पाकिस्तानमधील एकूण ३० पंतप्रधानांपैकी १९ पंतप्रधान आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेले नाहीत. असे असतानाच विरोधी बाकावर असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून सरकावर दबाव टाकला जात आहे. मध्यावधी निवडणुका घ्याव्यात अशी मागणी इम्रान खान यांच्या पक्षाकडून केली जात आहे. याच अस्थिरतेच्या काळात आता नव्या लष्करप्रमुखांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.