जगभरात मागील काही काळात राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, न्यायाधीश, उद्योगपती, अधिकारी अशा अनेकांचे फोन हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी पेगॅससचा वापर झाल्याचे गंभीर आरोप झाले. मात्र, आता हेरगिरीसाठी काही देशांमधील सरकारं पेगॅसस नाही, तर हरमिट या स्पायवेअरचा वापर करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे पेगॅससऐवजी वापरलं जाणारं हरमिट स्पायवेअर काय आहे? ते कसं काम करतं? सध्या त्याचा उपयोग कोठे होतो? या सर्वच गोष्टीचं विश्लेषण…

हेरगिरीसाठी वापरलं जाणारं नवं स्पायवेअर सर्व प्रकारच्या अँड्रॉईड फोन्समध्ये चालतं. ज्या व्यक्तींची हेरगिरी करायची आहे त्यांच्या मोबाईलवर एक एसएमएस पाठवून संबंधितांच्या मोबाईलमध्ये या हरमिट स्पायवेअरचा प्रवेश होतो. याचा सर्वात आधी वापर कझाकिस्तानमध्ये झाल्याचं समोर आलंय. त्यानंतर सिरिया आणि इटलीमध्ये देखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या हेरगिरीचे प्रकार समोर आले आहेत.

Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
save hasdeo forest
हसदेव धुमसतंय, सरकार लक्ष देणार का?
enforcement directorate contact with apple to check kejriwal s mobile
केजरीवाल यांचा मोबाइल तपासण्यासाठी ‘अ‍ॅपल’शी संपर्क; मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे पुढचे पाऊल  

नव्या हेरगिरी हरमिट स्पायवेअरची निर्मिती कोठे?

हेरगिरीसाठी जगभरातील विविध देश आता पेगॅससऐवजी ज्या हरमिट स्पायवेअरचा वापर करत आहेत. त्याची निर्मिती इटलीमधील आरसीएस लॅब अँड टायकलॅबने (RCS Lab and Tykelab Srl) केली आहे, असा दावा संशोधक पॉल शंक यांनी केला आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हरमिटचा प्रथम वापर एप्रिलमध्ये कझाकिस्तानमध्ये झाला. कझाकिस्तान सरकारने सरकारविरोधातील एक आंदोलन दडपल्यानंतर काही महिन्यांनी हरमिट स्पायवेअरचा वापर झाल्याचं समोर आलं. या स्पायवेअरचा वापर करून सीरियातील कुर्दिश भागातील आणि इटलीतील काही महत्त्वाच्या लोकांची हेरगिरी करण्यात आली.

हेही वाचा : “मोदी सरकारने देशद्रोह केलाय, कारण सैन्य, न्यायपालिका…”, राहुल गांधींचा हल्लाबोल

विशेष म्हणजे हे मालवेअर जगातील कोणत्याही अँड्रॉईड फोनमध्ये चालतं. हे टेक्स्ट मेसेजच्या मदतीने मोबाईलमध्ये पेरलं जातं. सॅमसंग, ओपो सारख्या मोठ्या ब्रँडच्या अधिकृत मेसेजप्रमाणे हे मेसेज असतात. ते मेसेज कंपनीच्या मेसेजप्रमाणे इतके सारखे असतात की संबंधित व्यक्ती त्या मेसेजला फसून ते स्पायवेअर अॅप म्हणून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करते. यानंतर हे अॅप कंपनीच्या अधिकृत वेबासाईटवरच घेऊन जाते, मात्र समांतर पातळीवर हेरगिरीचंही काम करतं.