Supreme Court Same-Sex Marriage Judgement : सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाच्या कायदेशीर मान्यतेची मागणी करणाऱ्या याचिकेला आज (दि. १७ ऑक्टोबर) फेटाळून लावले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने तीन विरूद्ध दोन अशा बहुमताने हा निर्णय घेतला. याआधी या याचिका दिल्ली आणि केरळ उच्च न्यायालयाकडे प्रलंबित होत्या. वरिष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी या प्रलंबित याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वत:कडे वर्ग करून घ्याव्यात, अशी मागणी केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकारामुळे आता अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयाचा निकाल लागला आहे. याच पार्श्वभूमीवर कोणकोणत्या देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता आहे, हे जाणून घेऊया.

जगात अनेक देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता आहे. जगभरात जवळपास ३२ देशांत समलिंगी विवाहाला मान्यता आहे. बहुतांश देशांत कायदा करून ही मान्यता देण्यात आली आहे. तर १० देशांत न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर समलिंही विवाह मान्यतेसाठी कायदा करण्यात आलेला आहे.

Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
Loksatta explained North Korea also has a destructive hypersonic missile
उत्तर कोरियाच्या हाती लवकरच विध्वंसक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र… पण या छोट्या, मागास देशाकडे हे तंत्रज्ञान आले कसे?
disagreement between joe biden benjamin netanyahu marathi news
विश्लेषण: गाझावरून अमेरिका-इस्रायल मैत्री संपुष्टात येईल का? यूएन ठरावातून स्पष्ट संकेत?

हेही वाचा >>> विश्लेषण: ‘अलीबाबा’चं साम्राज्य उभं करणाऱ्या जॅक मा यांना कंपनीनं दाखवला बाहेरचा रस्ता; ANT ग्रुपमध्ये नेमकं घडतंय काय?

अमेरिका : अमेरिकेत २०१५ साली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाद्वारे समलिंगी विवाहाला मान्यता देण्यात आली. विवाह फक्त भिन्नलिंगी लोकांपर्यंतच मर्यादित ठेवणे म्हणजे समान सुरक्षा आणि हक्काची हमी देणाऱ्या कायद्याचे उल्लंघन होईल, असे न्यायालाने सांगितले होते.

न्यायालायाच्या या निर्णयानंतर देशभरात समलिंगी विवाहाला मान्यता देणारा कायदा करण्यात आला. मात्र या निर्णयाअगोदरच अमेरकेतील जवळपास ३२ राज्यांनी समलिंगी विवाहाला मान्यता दिली होती. २००३ साली अमेरिकेत मॅसॅच्युसेट्स राज्याने समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली होती.

हेही वाचा >>> विश्लेषण : २०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत उत्सुक, पण ते शक्य आहे का? जाणून घ्या

ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, स्वित्झर्लंड: समलिंगी विवाहास मान्यता देण्यासाठी ऑस्ट्रेलिया राज्यात लोकांचे मत जाणून घेण्यात आले होते. त्यानंतर लोकांच्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर २०१७ साली ऑस्ट्रेलियन संसदेने समलिंगी विवाहाचा कायदा समंत केला होता. ऑस्ट्रेलियातील ६२ टक्के लोकांनी समलिंगी विवाहास मान्यता द्यायला हवी, तर ३८ टक्के लोकांनी मान्यता नसावी अशी भूमिका घेतली होती. आयर्लंड, स्वित्झर्लंड या देशांतही लोकांचे मत जाणून घेऊन समलिंगी विवाहाला मान्यता देण्यात आली होती.

दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिका हा आफ्रिकन देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला देश ठरला. या देशाने २००६ साली समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. समान अधिकारांची हमी देणाऱ्या कायद्याचे उल्लंघन होत असून समलिंगी विवाहाला मान्यता द्यावी, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केल्यानंतर दक्षिण आफ्रिका सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता.

हेही वाचा >>> विश्लेषण : सिगारेट बनवताय तर थोटकाची विल्हेवाटही लावा; स्पेनचा सिगारेट कंपन्यांना दणका; जाणून घ्या नवीन कायदा

तैवान : आशियाई देशांत समिलिंगी विवाहाला मान्यता देणारा तैवान हा पहिला देश ठरला. न्यायालयाने २०१७ साली निर्णय दिल्यानंतर २०१९ साली याबाबतचा कायदा करण्यात आला.

निर्णय दिल्यानंतर २०१९ साली याबाबतचा कायदा करण्यात आला.

अर्जेंटिना : अर्जेंटिना देशाने २०१० साली समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवर कायदा लागू होण्याअगोदरच तेथील काही शहरांनी स्थानिकांना समलिंगी विवाह करण्यास मुभा दिली होती.

कॅनडा : कॅनडा देशाने २००५ साली समलिंगी विवाहासा मान्यता दिली.