– संदीप कदम

जागतिक बॅडमिंटनमधील सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाणारी ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकण्याचे सर्व बॅडमिंटनपटूंचे स्वप्न असते. मंगळवारपासून सुरू झालेल्या यंदाच्या स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटूही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. भारताचे कोणते खेळाडू यावेळी खेळत आहेत, त्यांच्यासमोर कोणाचे आव्हान असेल याचा हा आढावा.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
candidates tournament 2024 marathi news, candidates tournament 2024 chess marathi news
विदित, प्रज्ञानंद, गुकेश… यांच्यातील कोणी विश्वनाथन आनंद बनेल?

आजवर स्पर्धेत भारताची कामगिरी कशी राहिली आहे?

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचे पुरुष एकेरीचे दिग्गज खेळाडू प्रकाश पदुकोण (१९८०) आणि पुलेला गोपीचंद (२००१) यांनी विजेतेपद मिळवले आहेत. मात्र, गेल्या २० वर्षांत कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूला जेतेपद मिळवता आले नाही. गेल्या स्पर्धेत लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. तसेच गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली यांनी महिला दुहेरीची उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, यावेळी कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूला मानांकन मिळालेले नाही. परंतु भारताच्या काही आघाडीच्या खेळाडूंकडून अपेक्षा असतील.

पुरुष एकेरीत लक्ष्य, प्रणॉय, श्रीकांतवर भिस्त…

पुरुष एकेरीत भारताला सर्वाधिक अपेक्षा गतउपविजेता लक्ष्यकडून असतील. आतापर्यंत हंगामातील दोन स्पर्धेत त्याला पहिल्या फेरीत तर, गतविजेता असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्याला दुसऱ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. लक्ष्यला गेल्याच आठवड्यात आपल्याहून कमी क्रमवारी असलेल्या टोमा पोपोव्हकडून पराभूत व्हावे लागले. यावेळी लक्ष्यचा स्पर्धेतील प्रवास सोपा नसेल. पहिल्या फेरीत त्याच्यासमोर पाचव्या मानांकित चोउ टिएन शेनचे आव्हान असेल. हा सामना जिंकल्यास त्याची गाठ आंद्रेस अँटोन्सेन आणि रॅस्मस गेमकेशी पडू शकते. हा अडथळाही पार केल्यास तिसऱ्या मानांकित सिनिसुका गिंटिंगचा सामना त्याला करावा लागू शकतो. एचएस प्रणॉयही लक्ष्यच्या गटात आहे. प्रणॉयने पहिल्या फेरीत वॉंग झू वेईला नमवले. आता त्याचा सामना दुसऱ्या फेरीत गिंटिगशी होऊ शकतो. किदम्बी श्रीकांतला या हंगामात सामना जिंकता आलेला नाही. तो पोपोव्हविरुद्ध पहिला सामना खेळेल. हा सामना जिंकल्यास त्याची गाठ जपानच्या सातव्या मानांकित कोडाई नाराओकाशी होण्याची शक्यता आहे.

महिला एकेरीत सिंधूवर अधिक जबाबदारी का?

भारताची तारांकित बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही नेहमीच स्पर्धेत जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असते. पण, आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत तिला कधीही ऑल इंग्लंड बॅडमिंटनची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. तसेच दुखापतीतून सावरण्यासाठी तिने पाच महिन्यांचा कालावधी घेतला. पुनरागमन केल्यानंतरही तिला म्हणावी तशी लय सापडलेली नाही. सिंधूचा सामना पहिल्या फेरीत झँग यि मानशी होणार आहे. तिने या लढतीत विजय मिळवल्यास तिची गाठ पाचव्या मानांकित हे बिंग जिआओशी पडू शकते. जिआओविरुद्ध सिंधूची कामगिरी १०-९ अशी आहे. यासह सिंधूच्या गटात तिसऱ्या मानांकित ताय झू यिंगचाही समावेश आहे. स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका पाहिल्यास सिंधूची आगेकूच ही सोपी नसेल. २०१५च्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या सायना नेहवालने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे सिंधूवरच चांगल्या कामगिरीची मदार असेल.

पुरुष दुहेरीत सात्त्विक-चिराग जोडीवर नजर…

गेल्या काही काळात पुरुष दुहेरीत भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. इंडोनेशियाच्या केविन सुजामुलजो आणि मार्कस गिडेओनविरुद्ध भारताच्या सात्त्विक-चिराग जोडीचा सामना होणार होता. मात्र, केविन डेंग्युमधून पूर्णपणे सावरला नसल्याने इंडोनेशियाच्या जोडीने माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय जोडीकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. कृष्ण प्रसाद गार्गा-विष्णूवर्धन गौड पंजालाविरुद्धच सात्विक-चिरागचा सामना होईल. या फेरीत विजय मिळवल्यास सहाव्या मानांकित भारतीय जोडीचा सामना इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्या लिआंग वेइकेंग व वोन्ग चँग जोडीशी होऊ शकतो. भारताच्या जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठल्यास त्यांचा सामना दुसऱ्या मानांकित आरोन चिआ व सोह वोइ यिकशी होण्याची शक्यता आहे. सात्त्विक दुखापतीतून सावरला असून भारताला पुरुष दुहेरीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. यासह एमआर अर्जुन व ध्रुव कपिला जोडीचा सामना रेन झिआंग यू व टॅन किआंगशी सामना होईल.

हेही वाचा : All England Campaign: पी.व्ही. सिंधूला मदत करणार मलेशियाचा स्टार बॅडमिंटनपटू हाफिज हाशिम

गायत्री-ट्रीसावर महिला दुहेरीत मदार…

स्पर्धेच्या गेल्या सत्रात ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी उपांत्य फेरी गाठताना सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी ट्रीसा-गायत्री जोडीचा सामना सातव्या मानांकित थायलंडच्या जोंगकोल्फान कितिथाराकूल आणि राविंडा प्राजोंगजाइशी होईल. गेल्या महिन्याभरात ट्रीसा व गायत्री जोडीने चांगली कामगिरी केली आहे. ही जोडी आशियाई मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत अपराजित राहिली. त्यांनी आपल्याहून वरल्या मानांकित खेळाडूंना नमवले. तसेच राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपदही मिळवले. ट्रीसा-गायत्री जोडीसह अश्विनी भट आणि शिखा गाैतम जोडीही सहभागी होईल. पहिल्या फेरीत त्यांचा सामना बाएक हा ना व ली सो ही या जोडीशी होईल.