भारतात ओलासह अनेक इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांनी आपल्या सदोष इलेक्ट्रिक दुचाकी परत मागवल्या आहेत. त्यामुळे याची देशभरात चर्चा आहे. असं नेमकं काय घडलं की ज्यानंतर इलेक्ट्रिक वाहन निर्माण कंपन्यांनी या दुचाकी परत मागवण्याचा मोठा निर्णय घेतला? याचा आणि मध्यंतरी समोर आलेल्या इलेक्ट्रिक कारला लागलेल्या आगींचा संबंध काय? केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची याबाबत भूमिका काय या सर्वांवरील हे खास विश्लेषण…

देशात काही इलेक्ट्रिक वाहनांना आपोआप आग लागल्याच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच या घटनांची दखल थेट केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेत वाहन कंपन्यांना इशारा दिला. त्यानंतर सर्वच इलेक्ट्रिक स्कुटर निर्मात्या कंपन्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्यात. ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या १,४४१ स्कुटर परत मागवल्या आहेत. पुण्यात २६ मार्चला इलेक्ट्रिक स्कुटरला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे ओलाने या आगीच्या घटनेची अंतर्गत चौकशी सुरू असल्याचेही सांगितले.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
RBI Orders, Special Audit, Norm Violations IIFL Finance, JM Financial Products limited, finance,
आयआयएफल, जेएमएफपीएलचे रिझर्व्ह बँकेकडून विशेष लेखापरीक्षण
Instagram down funny memes viral
जगभरात पुन्हा Instagram बंद पडल्याने वापरकर्ते हैराण! मिमर्सने असा घेतला संधीचा फायदा…

इलेक्ट्रिक स्कुटर्सला लागत असलेल्या आगीच्या घटनांवर केंद्र सरकारची भूमिका काय?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक स्कुटर निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेत निष्काळजीपणा होत असल्याचं मत व्यक्त केलंय. तसेच तातडीने उपाययोजना न झाल्यास केंद्र सरकार सदोष इलेक्ट्रिक स्कुटर निर्माण करणाऱ्या कंपन्यांना मोठा दंड करेल आणि सर्व स्कुटर परत मागवेल, असा इशाराही गडकरी यांनी दिलाय. सरकार स्कुटर निर्मितीसाठी मार्गदर्शक सूचना तयार करत असल्याचंही गडकरींनी नमूद केलं.

विशेष म्हणजे नितीन गडकरी यांनी मागील काळात ज्या इलेक्ट्रिक स्कुटरला आग लागल्याच्या घटना घडल्यात त्यांच्या चौकशीचे आदेशही दिलेत.

इलेक्ट्रिक स्कुटरला लागलेल्या आगींवर ओलाचं म्हणणं काय?

इलेक्ट्रिक स्कुटरला लागत असलेल्या आगींच्या घटनांवर बोलताना ओलाने म्हटलं, “२६ मार्चला पुण्यात स्कुटरला लागलेल्या आगीची आम्ही कंपनी अंतर्गत चौकशी करत आहोत. प्राथमिक चौकशीत ही आगीची घटना अपवादात्मक असल्याचं समोर आलंय. तरीही खबरदारी म्हणून आम्ही त्या स्कुटरच्या बॅचमधील उत्पादित १४४१ स्कुटर्सची संपूर्ण तपासणी करणार आहोत. त्यासाठी आम्ही ग्राहकांकडून या १४४१ स्कुटर्स परत मागवल्या आहेत.”

स्कुटरला आग लागल्याच्या आतापर्यंत किती घटना घडल्या?

मागील काही आठवड्यात अनेक इलेक्ट्रिक स्कुटर्सला आग लागल्याच्या घटना घडल्या. यात ओला, ओकिनावा, पुअर ईव्ही आणि जितेंद्र ईव्ही या कंपन्यांच्या स्कुटर्सचा समावेश आहे. पुण्यातील ओला स्कुटरच्या घटनेशिवाय ओकिनावाच्या स्कुटरलाही आग लागली. त्यात १३ वर्षीय मुलीसह एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

हेही वाचा : Hero Maestro Edge 110 vs TVS Jupiter: जाणून घ्या, कमी किमतीत कोणती स्कूटर देईल जास्त मायलेज

याशिवाय मागील महिन्यात जितेंद्र ईव्हीच्या २० इलेक्ट्रिक स्कुटर्सला नाशिकमध्ये आग लागली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना आहे. बुधवारी तेलंगाणात पुअर ईव्हीच्या इलेक्ट्रिक स्कुटरलाही बॅटरीचा स्फोट होऊन आग लागली. यात एका ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

आतापर्यंत कोणी किती इलेक्ट्रिक स्कुटर परत मागवल्या?

पुअर ईव्हीने आपल्या २,००० इलेक्ट्रिक स्कुटर्स परत मागवल्या आहेत. याशिवाय ओकिनावाने सदोष असल्याचा संशय असलेल्या ३,००० स्कुटर्स परत मागवल्या आहेत.