– संजय जाधव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केरळमध्ये पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. केरळमधील ११ जिल्ह्यांतून ही गाडी धावत आहे. तिरुअनंतपूरमला दक्षिणेला टोकाशी असलेल्या कासारगोड जिल्ह्याशी या गाडीने जोडले आहे. हे अंतर ८ तास ५ मिनिटांत पार करण्यात येत आहे. केरळसाठी ही मोठी भेट असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. मात्र, या गाडीवरून वादंग निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष नव्हे तर भाजपमधूनही हा विरोध होत आहे. भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविलेले भारताचे `मेट्रोमॅनʼ अशी ओळख असलेले ई. श्रीधरन यांनी ही रेल्वे चालवणे मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे.

mamata banerjee
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
BJP agenda is polarisation K C Venugopal Congress Loksabha Election 2024
“ध्रुवीकरण हाच नरेंद्र मोदींचा अजेंडा”; भाजपा वास्तवातील प्रश्नांपासून दिशाभूल करत असल्याचा काँग्रेसचा आरोप
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
INDIA bloc collapse in Kashmir complete NC PDP fielded candidates against each other
काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे ‘तीनतेरा’; NC, PDP ने एकमेकांविरोधात दिले उमेदवार

श्रीधरन यांचा आक्षेप काय?

मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी वंदे भारतला आक्षेप घेतला आहे. केरळमध्ये वंदे भारत चालवली जाऊ शकते, परंतु, ती पूर्ण क्षमतेने चालवणे शक्य नाही. कारण केरळमधील सध्या असलेल्या लोहमार्गांवरून रेल्वे गाडी ८० ते १०० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकते. त्यामुळे १६० किलोमीटर प्रतितास वेग असलेली वंदे भारत जवळपास निम्म्या वेगाने चालवावी लागेल आणि अखेर ती इतर रेल्वे गाड्यांसारखीच ठरेल, असा श्रीधरन यांचा दावा आहे. वंदे भारत पूर्ण क्षमतेने चालवायची झाल्यास मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागेल. यासाठी वळणाकार असलेले लोहमार्ग सरळ करावे लागतील. त्यासाठी भूसंपादन करावे लागेल आणि त्यामुळे हा खर्च वाढत जाईल. याच वेळी आपल्याला रेल्वेची सेवा समजून घ्यावी लागेल. कारण लोहमार्ग सरळ करताना रेल्वे वाहतूक थांबवता येणार नाही. त्यामुळे या कामासाठी किमान १० वर्षांचा कालावधी लागेल. याउलट आपण सहा ते सात वर्षांत अतिजलद रेल्वे प्रकल्प कार्यान्वित करू शकतो, असे श्रीधरन यांचे म्हणणे आहे.

राज्य सरकारवर कुरघोडी?

केरळमध्ये मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या सरकारने महत्त्वाकांक्षी सिल्व्हरलाईन या मध्यम गती रेल्वे प्रकल्पाची तयारी मागील काही काळापासून केली आहे. आता केंद्र सरकारने वंदे भारत सुरू करून राज्य सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ठिकाणी विरोध सुरू असूनही राज्य सरकारकडून सिल्व्हरलाईन प्रकल्पाचे काम पुढे रेटले जात आहे. तिरुअनंतपूरमला कासारगोडशी जोडणारा हा प्रकल्प आहे. आता केंद्र सरकारने राज्य सरकारच्या आधी पावले उचलत वंदे भारतने या दोन ठिकाणांना जोडले आहे. विशेष म्हणजे, रेल्वे विभागाने १४ एप्रिलला वंदे भारतला हिरवा कंदील दिला आणि लगोलग ही गाडी केरळमध्ये दाखल झाली. याबाबत राज्य सरकारला अंधारात ठेवण्यात आले होते. वंदे भारत सुरू होताच भाजपकडून सिल्व्हरलाईन प्रकल्पाच्या आवश्यकतेबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

गाडीवर काँग्रेस खासदाराची पत्रके का?

वंदे भारत एक्स्प्रेस शोरानूर येथे पोहोचताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी खासदार व्ही. के. श्रीकंदन यांच्या कामाचे कौतुक करणारी पत्रके गाडीवर चिकटवली. श्रीकंदन हे पलक्कडचे खासदार आहेत. त्यांनी शोरानूर येथे वंदे भारतला थांबा मिळवून दिल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी करीत सगळ्या गाडीवर पत्रके चिकटवून तिला विद्रूप केले. विशेष म्हणजे, ही घटना घडली त्या वेळी खासदार स्वत: रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. रेल्वे सुरक्षा दलाने या प्रकरणी काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजपच्या नेत्यांनी या मुद्द्यावर काँग्रेसवर टीका केली आहे. श्रेयवादाची लढाई पहिल्याच गाडीपासून सुरू झाल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : भाजपच्या केरळ मोहिमेला बळ? नवा मित्र आघाडीत येण्याची चिन्हे!

भाजपकडून २०२४ ची तयारी?

भाजपचा एकही खासदार आणि आमदार नसलेल्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विकासकामांची पायाभरणी केली आहे. देशात काँग्रेसला सर्वाधिक खासदार मिळवून देणारे हे राज्य आहे. राज्यातील सत्ताधारी डावी आघाडी पायाभूत सुविधा आणि विकासकामांचा दावा करीत आहे. भाजपने विविध विकासकामांना हात घालत २०२४ची तयारी सुरू केली आहे. डावी आघाडी आणि काँग्रेसची ताकद कमी करण्याचे काम भाजपला येथूनच करावे लागेल. वंदे भारतमुळे भाजपला आता राज्यातील जनतेला दाखवण्यासाठी विकासाचा एक मुद्दा हाती आला आहे. एवढ्यावरच न थांबता रेल्वे मंत्रालयाने लोहमार्ग सरळ करण्याचे काम दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यानंतर ही गाडी ११० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे. परंतु, वंदे भारतमुळे राज्य सरकारच्या सिल्व्हरलाईन प्रकल्पावर अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारने फुली मारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीआधी राज्यात विकासकामांना शह अन् काटशह देण्याचे राजकारण रंगल्याचे चित्र आहे.

sanjay.jadhav@expressindia.com