– आसिफ बागवान

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देशात वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत गणिताचे शिक्षण सक्तीचे करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. आयझॅक न्यूटनपासून बर्ट्रांड रसेल यांच्यासारख्या जगप्रसिद्ध थोर गणितज्ञ, संशोधकांचा देश असलेल्या ब्रिटनमध्ये आजघडीला जवळपास ८० लाख प्रौढांचे गणिती ज्ञान प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्याइतके मर्यादित आहे. वयाच्या १६ व्या वर्षानंतर कोणत्याही प्रकारचे गणिती शिक्षण घेणाऱ्यांची संख्या २० टक्केही नाही. सुनक यांच्या घोषणेला ही पार्श्वभूमी लाभलेली आहे. मात्र, ब्रिटनचे हे गणिताचे कोडे केवळ सक्तीने सुटेल?

drowning to death
अमेरिकेपाठोपाठ स्कॉटलंडमधून वाईट बातमी, दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Haryana school bus accident,
VIDEO : शाळेच्या बसला भीषण अपघात; पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

ऋषी सुनक काय म्हणाले होते?

‘आजच्या जगात आकडे हे सगळीकडे असून प्रत्येक नोकरीत सांख्यिकीला महत्त्व आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत या ना त्या प्रकाराने गणित विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा आमचा विचार आहे,’ असे विधान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गेल्या आठवड्यात केले. आपल्याला पुढील आयुष्यात गणिताची अजिबात गरज पडणार नाही, असे वाटत असले तरी, गणिताचा फायदा नागरिकांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर होईल, असेही सुनक म्हणाले होते.

ब्रिटनमध्ये गणित हा विषय इतका गंभीर आहे?

ब्रिटिश नागरिकांच्या गणिती ज्ञानाबद्दल चिंंता व्यक्त करणारे सुनक हे पहिलेच नाहीत. याआधीही अनेक मंत्र्यांनी, अर्थतज्ज्ञांनी याबद्दल मते व्यक्त केली आहेत. देशातील गणिताच्या ज्ञानाबाबत पाहणी करणारा स्मिथ अहवाल २०१७मध्ये सरकारसमोर मांडण्यात आला होता. त्यानुसार उच्च शिक्षण घेणारे २० टक्के विद्यार्थीच १६व्या वर्षानंतर गणिताचा अभ्यास करतात. नुफिल्ड फाऊंडेशन नावाच्या संंस्थेच्या अहवालानुसार, जगातील २० विकसित देशांपैकी सहा देशांत वयाच्या १६ व्या वर्षानंतर गणिताच्या अभ्यासाची आवश्यकता नाही. त्यातील इंग्लंड, स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्स हे चार देश ब्रिटनचा भाग आहेत. गणित कच्चे असल्यामुळे दरवर्षी ब्रिटनला २० अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागते हे विशेष.

ब्रिटिश शिक्षणात गणिताचे स्थान काय?

ब्रिटिश शिक्षणपद्धतीत वयाच्या पाच ते १६ व्या वर्षापर्यंत अभ्यासक्रमात गणिताचा समावेश आहे. शालेय शिक्षणापासूनच कॅल्क्युलेटर, संगणकाच्या वापराला परवानगी असल्याने आकडेमोड करण्याचे कसब विद्यार्थ्यांना कमावताच येत नाही. १६ ते १८ वर्षांपर्यंत गणिताचे शिक्षण ऐच्छिक आहे. चौथ्या श्रेणीपर्यंत (ग्रेड) गणिताची परीक्षा दिली नसल्यास विद्यार्थ्यांना १४ ते १६ या वयोगटात गणिताची ‘जीसीएसई’ ही प्रमाणपत्र परीक्षा देता येते. मात्र, त्यानंतर ते गणित विषय पूर्णपणे टाळू शकतात.

परिस्थिती सुधारण्याची योजना काय?

गणिताची सरसकट सक्ती करण्याची इच्छा नसल्याचे पंतप्रधान सुनक यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मूलभूत गणितीय संकल्पना शिकवायला हव्यात, असा मतप्रवाह आहे. ब्रिटिश अभ्यासक्रमात ‘कोअर मॅथ्स’ हा विषय २०१५पासून शिकवण्यात येत आहे. त्यामध्ये गणितीय अभ्यासापेक्षा प्रत्यक्ष वापरातील गणित शिकवण्यावर भर देण्यात येतो. सुनक यांनी पुढील दोन वर्षांत शिक्षणव्यवस्थेत २.४ अब्ज डॉलर निधी ओतण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, त्याचा विनिमय कसा होणार, हे स्पष्ट केलेले नाही.

हेही वाचा : विश्लेषण : प्रिन्स हॅरीच्या आत्मचरित्रामुळे नवे वादळ? त्याचे खळबळजनक दावे कोणते?

आधी विद्यार्थी घडवायचे की आधी शिक्षक?

सुनक यांची योजना महत्त्वाकांक्षी आणि भविष्यातील ब्रिटनचे चित्र पालटणारी ठरू शकते. मात्र, त्याचा वर्तमानातील अडथळा फारच मोठा आहे. त्या देशात गणित शिकवणाऱ्या शिक्षकांचीच प्रचंड टंचाई आहे. यंदा सरकारने प्रशिक्षणार्थी गणित शिक्षकांच्या रिक्त पदांपैकी ९० टक्के पदे भरली. मात्र, नॅशनल फाऊंडेशनच्या पाहणीनुसार, अनेक शाळांमध्ये आजही गणित शिकवण्यासाठी भौतिकशास्त्र किंवा परदेशी भाषा शिकविणाऱ्या शिक्षकांना जुंपले जात आहे. कारण साहजिक आहे. शालेय शिक्षणात गणित हा विषय असला तरी त्याबाबत फारसे गांभीर्य नाही. त्यामुळे या विषयात गोडी असलेले, निष्णात शिक्षक तयारच होत नाहीत. त्यामुळे ‘आधी कोंबडी की आधी अंडे’, या पुरातन यक्षप्रश्नाप्रमाणेच ‘आधी शिक्षक तयार करायचे की विद्यार्थी घडवायचे’ असा प्रश्न ब्रिटनच्या शिक्षणव्यवस्थेसमोर उभा ठाकणार आहे.