जगभरात फूडी म्हणून भारतीयांची खासच ओळख आहे. मग पदार्थ कुठल्याही का देशाचे असेनात, ते चवीच्या बाबतीत सरस असतील तर भारतीय नक्कीच त्यांना दाद देतात. असेच काहीसे कोरियन खाद्य पदार्थांच्या बाबतीतही दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून के-पॉप, के-ड्रामा यांमुळे कोरियन संस्कृतीचा ठसा जनमानसावर उमटला आहे. कोरियन संगीत, ट्रेण्डसेटिंग फॅशन, आणि खाद्य पदार्थांनी लाखो लोकांना आपले चहाते केले आहे. विशेष म्हणजे कोरियन खाद्यपदार्थांच्या मसालेदार- ताज्या चवीची भारतीयांना भुरळच पडली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरियन पदार्थांची मागणी का वाढत आहे आणि ते पौष्टिक आहाराच्या दृष्टीने किती फायदेशीर आहेत, हे जाणून घेणे नक्कीच माहितीपूर्ण ठरणारे आहे.

भारतातील कोरियन खाद्यपदार्थांची मागणी

कोरियन खाद्यपदार्थांना संपूर्ण भारतात झपाट्याने मुख्य प्रवाहात स्वीकृती मिळाली. भारतातील के-ड्रामाच्या लोकप्रियतेमुळे कोरियन खाद्यपदार्थांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. या शोजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कोरियन खाद्य पदार्थांच्या चित्रणामुळे भारतीयांमध्ये या पदार्थांची मागणी वाढली आहे, असे मत गरिमा देव वर्मन (प्रमाणित पोषणतज्ज्ञ आणि द हेल्दी इंडियन प्रोजेक्ट (THIP) च्या वैद्यकीय कॉन्टेन्ट विश्लेषक) यांनी व्यक्त केले. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ‘रामेन’ या लोकप्रिय खाद्यपदार्थाने भारतीय मनाचा ताबा घेतला. त्यानंतर किमची, मसालेदार रामेन, बिबिंबाप, बुलडाक आणि त्तेओकबोक्की यांसारख्या कमी प्रसिद्ध पदार्थांच्या लोकप्रियतेतही लक्षणीय वाढ झाली आहे. के-पॉप संगीतासह कोरियन पॉप संस्कृतीमुळे सर्व कोरियन संस्कृतीशी संबंधित घटकांना अधिकच प्रसिद्धी मिळत आहे. त्यात त्यांच्या खाद्य संस्कृतीचाही समावेश आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Korean food trend in indian diet how did korean food become famous in india svs
First published on: 16-06-2024 at 08:33 IST