लेबनॉनच्या विविध भागांत कथित इस्रायली हल्ल्यात हिजबूलचे काही सैनिक ठार झाले. हे हल्ले इस्रायल आणि हिजबूल यांच्यातील संघर्षाला एक नवे वळण देईल, असे सांगितले जात आहे आणि ही घटना मध्यपूर्वेला प्रादेशिक युद्धाकडे नेणारी असल्याचे बोलले जात आहे. इराणच्या समर्थित अतिरेकी संघटना हिजबूलने पेजर हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरले असून त्यांना योग्य शिक्षा देऊ, अशी धमकीही दिली आहे. या हल्ल्यात हिजबूलच्या काही सैनिकांसह किमान ११ जणांचा मृत्यू झाला आणि तीन हजार लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा नक्की काय परिणाम होणार? इस्रायल आणि हिजबूल यांच्यातील संघर्ष वाढणार का? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

हा हल्ला इस्रायलने केला असल्याचे आणि या हल्ल्याचा उद्देश हिजबूलचे दळणवळणाचे साधन आणि लेबनानमधील कमांड आणि कंट्रोल सिस्टममध्ये व्यत्यय आणण्याचा होता, असे सांगितले जात आहे. इस्रायल हिजबूलला सहजपणे शोधू शकते, त्यामुळे हिजबूलच्या सैन्याने मोबाइल फोनचा वापर टाळून संवादासाठी पेजरचा वापर करण्यास सुरुवात केली. पेजर हे त्यांच्या गटातील पसंतीचे उपकरण ठरत आहेत. या हल्ल्याची रचना गटामध्ये आणि लेबनीज लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केली गेली असावी, असे विविध राजकीय नेत्यांनी आपले मत मांडले आहे.

tupperware
डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
one nation one election, modi government,
विश्लेषण : एक देश, एक निवडणुकीसाठी आव्हाने अधिक! आर्थिक गणितांपेक्षा राजकीय गणितेच अधिक?
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
pager blast lebanon reuters
Israel : मोसाद नव्हे ‘युनिट-८२००’ ने लेबनॉनमध्ये पेजर्स, वॉकी-टॉकीचे स्फोट घडवले; इस्रायलच्या नव्या गुप्तचर यंत्रणेबद्दल जाणून घ्या
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Indian-born entrepreneur linked to deadly pager blasts in Lebanon
Who is Rinson Jose: लेबनान पेजर स्फोटाचं केरळ कनेक्शन! भारतीय वंशाचा ‘हा’ नागरिक चर्चेत येण्याचं कारण काय?

हेही वाचा : Indus Water Treaty: भारताने सिंधू जलवाटप कराराबाबत पाकिस्तानला बजावली नोटीस ; नेमकं प्रकरण काय?

हमासने दक्षिण इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हल्ला केल्यापासून, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी वारंवार सांगितले आहे की, ते लवकरच हिजबूलला नष्ट करतील. पेजर हल्ल्याच्या काही तास आधी नेतान्याहू यांच्या सरकारने स्पष्ट केले होते की, उत्तर इस्रायलमधील रहिवाश्यांना घरी परत पाठवणे या युद्धातील प्रमुख उद्दिष्ट आहे. उत्तर इस्रायलमध्ये हिजबूलकडून सतत रॉकेट डागण्यात येत असल्याने, या लोकांना त्यांचे घर सोडावे लागले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट म्हणाले की, लष्करी कारवाई हा आमच्याकडील एकमेव मार्ग आहे; त्यामुळेच संदेशवहनासाठी वापरल्या जाणाऱ्या पेजर स्फोटासाठी इस्रायलला जबाबदार धरले जात आहे.

इराणच्या समर्थित अतिरेकी संघटना हिजबूलने पेजर हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हिजबूलबरोबर युद्धाचे काय परिणाम होऊ शकतात?

हिजबूलने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचे जाहीर केले आहे. आता नक्की हा संघर्ष काय रूप घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हिजबूल गटाकडे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी उत्तर इस्रायलवर हल्ला करण्याची प्रचंड लष्करी क्षमता आहे, तसेच तेल अवीवसारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या शहरांसह ज्यू राज्याच्या इतर भागांवरदेखील हल्ला करण्याची क्षमता आहे. हिजबूलने २००६ च्या इस्रायलबरोबरच्या युद्धात आपली लष्करी क्षमता दाखवली होती. हे युद्ध ३४ दिवस चालले. त्या दरम्यान १६५ इस्रायली ठार झाले (१२१ आयडीएफ सैनिक आणि ४४ नागरिक) आणि इस्रायलच्या अर्थव्यवस्थेचे आणि पर्यटन उद्योगाचे लक्षणीय नुकसान झाले. या युद्धात सर्वात मोठे नुकसान हिजबूल आणि लेबनीजचे झाले. त्यांच्याकडील मृतांची संख्या किमान १,१०० होती. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) या गटाला निष्प्रभ करण्यातही हिजबूल अयशस्वी ठरले.

हिजबूलचा नाश करण्याचा निर्धार…

इस्रायलच्या शहरांवर करण्यात आलेल्या अनेक हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याने हिजबूलचा नाश करण्याचा निर्धार इस्रायलने केला आहे. हिजबूलच्या मुख्य पाठीराख्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणवरही इस्रायलला कारवाई करायची आहे. या व्यापक संघर्षात, अमेरिका इस्रायलचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहे, तर इराण हिजबूलला आवश्यक त्या मार्गाने पाठिंबा देत आहे. इराण हिजबूलला लाखो डॉलर्सचा निधी पुरवतो आणि या संघटनेकडे हजारोंच्या संख्येने लढवय्ये आहेत. तसेच इराणने इतर प्रादेशिक सहयोगी म्हणजेच इराकी मिलिशिया, येमेनी हुथी आणि बशर अल-असद यांच्या सीरियन राजवटींसह मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या संघटनांचे मुख्य उद्दिष्ट इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात मजबूत प्रतिबंधक तयार करणे आणि सुन्नी मुस्लीम आणि शिया मुस्लीम यांचे संरक्षण करणे आहे.

हिजबूलने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचे जाहीर केले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

इराण आणि इस्रायल एकमेकांना त्यांच्या अस्तित्वासाठीचा धोका म्हणून पाहतात. यासाठी इराणने आपले परराष्ट्र संबंध अमेरिकेच्या प्रमुख शत्रूंकडे, विशेषतः रशिया आणि चीनकडे वळवले आहेत. रशिया-इराणी लष्करी सहकार्य अतिशय मजबूत झाले आहेत. तेहरानला इस्रायलच्या आण्विक सामर्थ्याची पूर्ण जाणीव आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी इराणने स्वत:चे शस्त्र विकसित करण्याच्या उंबरठ्यावर अण्वस्त्र कार्यक्रम विकसित केला आहे. इराणने अण्वस्त्रांचा वापर केल्यास इराणचे रक्षण करण्यास मदत होईल, असे रशियाचे आश्वासनदेखील इराणच्या नेत्यांना मिळाले असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : ५० वर्षांच्या संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी शोधला नवीन रक्तगट; याचे महत्त्व काय? रुग्णांना याचा कसा फायदा होणार?

दरम्यान, गाझापट्टीवर वारंवार हल्ले करून तेथील जनजीवन विस्कळीत करून सुमारे वर्षभर उलटूनही इस्रायल हमासला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकलेले नाही, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यांनी गाझातील नागरिकांना सतत स्थलांतरित होण्यास भाग पाडले आहे, जेणेकरून आयडीएफ सैनिक त्या भागात कार्य करू शकतील. हिजबूल आणि त्याच्या पाठिराख्यांना पराभूत करण्याचे कार्य साध्य करणे इस्रायलसाठी मोठे आव्हान आहे. त्यात युद्धाचा गंभीर धोका आहे, त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवू नये, असे जागतिक नेत्यांचे मत आहे. मात्र, तरीही त्यांच्या कारवाया सुरूच आहेत. पेजर हल्ला अगदी नवीनतम आहे, त्यामुळे गाझा युद्धविरामाच्या कोणत्याही शक्यता कायमस्वरूपी धोक्यात येऊ शकतात.