भारतात पहिल्यांदाच लिथियम (Lithium) साठ्याचा शोध लागला आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या बॅटरीतील महत्त्वाचा घटक म्हणून लिथियमकडे पाहिले जाते. जम्मू-काश्मीरमध्ये ५.९ दशलक्ष टन लिथियम साठा सापडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाला जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सालाल-हैमाना भागात लिथियमचे साठे सापडल्याचे केंद्रीय खणीकर्म मंत्रालयाने जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने घालून दिलेल्या खनिज वर्गीकरणाच्या रचनेनुसार घनस्वरुपातील इंधन आणि खनिज वस्तू (UNFC 1997) या स्वरुपात पूर्व सर्वेक्षण केले जाते. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पूर्वेक्षणात याठिकाणी लिथियमसह बॉक्साईट आणि काही महत्त्वाची खनिजे सापडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने (Geological Survey of India) दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील सालाल-हैमाना भूभागात लिथियमचा साठा सापडला आहे. देशात असे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहे. यापैकी ५ ब्लॉकमध्ये लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे साठे आहेत. २०१८ ते आतापर्यंत हे ब्लॉक्स शोधण्यात आले आहेत. याशिवाय १७ ब्लॉक्समध्ये कोळशाचा साठा आहे. लिथियमचे अनेक फायदे आहेत. परंतु याचा सर्वाधिक वापर रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी होतो.

loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
indus waters treaty
विश्लेषण : शहापूरकंडी धरणाद्वारे भारताने पाकिस्तानमध्ये जाणारा रावी नदीचा प्रवाह का रोखला? याचा जम्मू व काश्मीरला कसा फायदा होईल?
pimpri chinchwad marathi news, ncp both factions aggressive in pimpri chinchwad marathi news, rohit pawar sunil tatkare marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आक्रमक

लिथियमचा शोध लागला असला तरी याबाबत दोन शक्यता आहेत, ज्या लक्षात घ्याव्या लागतील. एक म्हणजे, या नवीन शोधाचे वर्गीकरण ‘अंदाजे’ असे करण्यात आले आहे. भूवैज्ञानिक त्यांच्या आत्मविश्वासानुसार खनिजाच्या शोधांना तीन वर्गामध्ये विभागतात. “अंदाजे” या वर्गवारीनुसार खनिजाची एकूण साठा, खनिजाचा दर्जा आणि कोणते खनिज आहे, याचा अंदाज प्राथमिक अभ्यासावर अवलंबून असतो. त्यासाठी खड्डे खणणे, ड्रिल करणे या पद्धतीद्वारे ही अंदाजे माहिती काढली जाते. दुसरी अशी की, जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथियम असल्याचा जो अंदाज व्यक्त करण्यात आला तो तुलनेने जगातील इतर लिथियम साठ्यांहून कमी आहे. याआधी बोलिव्हियामध्ये सर्वाधिक २१ दशलक्ष, अर्जेंटिनामध्ये १७ दशलक्ष टन, ऑस्ट्रेलियामध्ये ६.३ दशलक्ष टन आणि चीनमध्ये ४.५ दशलक्ष टन लिथियम साठा असल्याचे समोर आले आहे, त्यातुलनेत आपल्याकडे अंदाजित केलेला साठा लहान आहे.

भारत सध्या लिथियम आयात करत आहे. याशिवाय राजस्थान आणि गुजरातच्या भूगर्भातील जलाशयामधून लिथियम शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. असाच प्रयत्न ओडिशा आणि छत्तीसगढच्या अभ्रक पट्ट्यांमधून लिथियम काढण्यासाठी अन्वेषण करण्यात आलेले आहे. हे खनिज आणि त्याचा कच्चा माल मिळवण्यासाठी सध्या भारत जवळजवळ संपूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. लिथियमचा शोध लावण्यात तसा भारत इतर देशांपेक्षा थोडा मागेच राहिला होता. २०२३ हे वर्ष बॅटरी तंत्रज्ञानासाठी एक महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. अशावेळी लिथियम बॅटरी तंत्रज्ञानात अनेक संभाव्या सुधारणा होऊ शकतात. आर्थिक वर्ष २०१७ आणि २०२० मध्ये भारतात १६५ कोटींहून अधिक लिथियम बॅटऱ्या आयात केल्या गेल्या आहेत. ज्याची अंदाजे किंमत ३.३ अब्ज डॉलरच्याही पुढे आहे.

९ फेब्रुवारी रोजी झालेल्या ६२ व्या सेंट्रल जिओलॉजिकल प्रोग्रामिंग बोर्डाच्या (CGPB) बैठकीत केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी सांगितले की, भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाला पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथियमचे साठे सापडले आहेत. जम्मू-काश्मीरमधील रियाजी जिल्ह्यातील सलाल-हिमानामध्ये लिथियमचे अंदाजित जागा निश्चित करण्यात आली आहे.

याच बैठकीत १५ इतर संसाधन भूवैज्ञानिक अहवाल आणि ३५ भूवैज्ञानिक ज्ञापनांसह एक अहवाल संबंधित राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आला आहे. देशात एकूण ५१ खनिज ब्लॉक्स सापडले आहेत. यापैकी ५ ब्लॉकमध्ये लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे साठे आहेत. २०१८ ते आतापर्यंत हे ब्लॉक्स शोधण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा यासह ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे ५१ ब्लॉक्स आढळले आहेत. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने २०१८-१९ पासून ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हे ब्लॉक्स तयार करण्यात आले आहेत.

खणीकर्म मंत्रालयाने मंजूर केलेल्या वार्षिक फिल्ड सीझन प्रोग्राम (संभाव्य योजना) नुसार भूगर्भीय सर्वेक्षण विभाग खनिज उत्खननाचे वेगवेगळे टप्पे घेत असतो. टोही सर्वेक्षण (G4), प्राथमिक अन्वेषण (G3), सामान्य अन्वेषण (G2) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार UNFC आणि खनिजे (खनिज सामग्रीचे पुरावे) दुरुस्ती नियम, २०२१ (सुधारीत एमएमडीआर कायदा २०२१) याद्वारे लिथियमसह विविध खनिज वस्तूंसाठी खनिज स्त्रोत वाढवण्याचे काम केले जाते. मागच्या पाच वर्षांमध्ये भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने लिथियम आणि संबंधित घटकांवर १४ प्रकल्प राबवले आहेत. त्यापैकी २०२१-२२ मध्ये लिथियम आणि संबंधित खनिजांवर पाच प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

लिथियम कशाप्रकारे आहे, त्यानुसार ते काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. लिथियम हे कठीण खडक आणि भूगर्भातील जलाशयातून काढले जाते. राजस्थानमधील सांभर आणि पाचपदरा तसेच गुजरातमधील कच्छच्या रणमधील भूगर्भातील जलाशयातून लिथियम काढण्यात येते. भारतात सर्वाधिक अभ्रक बेल्ट हे राजस्थान, बिहार आणि आंध्रप्रदेश राज्यात आहेत. तर इतर खाणी ओडिशा, छत्तीसगढमध्ये आहेत. तसेच मंड्या, कर्नाटक येथे सुरू असलेल्या खडकाच्या खाणीसह देशातील इतर संभाव्य भूवैज्ञानिक क्षेत्रे आहेत.

लिथियमचे अनेक फायदे आहेत. परंतु याचा सर्वाधिक वापर रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी होतो. रिचार्जेबल बॅटरीत लिथियम हा महत्त्वाचा घटक असतो. स्मार्टफोन, लॅपटॉप सारखी अनेक उपकरणे तसेच विजेवरील मोटारींसाठी या ‘बॅटरी’ वापरल्या जातात. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून २०३० पर्यंत खासगी ‘इलेक्ट्रिक मोटारीं’ची संख्या ३० टक्क्यांनी वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना लिथियम साठय़ाच्या शोधामुळे चालना मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.