इतिहासातील तीव्र घसरणीचा बाजारकाळ सुरू असताना, धडकलेल्या नव्या पिढीच्या द्रुत व्यापारातील (क्यू-कॉमर्स) प्रबळ ‘स्विगी’च्या प्रारंभिक समभाग विक्रीकडे गुंतवणूकदारांनी कसे पाहावे, याविषयी…

‘स्विगी’च्या प्रारंभिक भागविक्रीचे तपशील काय?

‘स्विगी’ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून (६ नोव्हेंबर) सुरू झाली असून, ती शुक्रवार, ८ नोव्हेंबरपर्यंत चालेल. गुंतवणूकदारांकडून ही कंपनी अंदाजे ११,३२७ कोटी रुपयांचा निधी उभारू पाहत आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्रति समभाग ३७१ रुपये ते ३९० रुपये या किंमत श्रेणीत किमान ३८ समभाग आणि त्यानंतर ३८ समभागांच्या पटीत बोली लावता येऊ शकेल. ११ नोव्हेंबरला समभाग वाटपाला अंतिम रूप दिले जाईल आणि १२ नोव्हेंबरपर्यंत समभाग यशस्वी बोलीदारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील. तर १३ नोव्हेंबरला समभाग बाजारात सूचिबद्ध होतील. अपेक्षेप्रमाणे, विक्रीस खुल्या झालेल्या समभागांचा ७५ टक्के हिस्सा हा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव आहे. तर अनुक्रमे १५ टक्के आणि १० टक्के हिस्सा गैर-संस्थात्मक बोलीदार आणि किरकोळ वैयक्तिक खरेदीदारांसाठी आहे.

The Golden Road: How Ancient India
China Silk Road weapon: चीनकडून ‘सिल्क रोड’ या ऐतिहासिक संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर; भारतीय इतिहासकार कुठे चुकले?
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
William Dalrymple Golden Road
RSS Marxist Historians India: अतिउजव्यांना आवडेल म्हणून संस्कृत व हिंदू संस्कृतीचा प्रसार सांगायचा नाही का?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
donald trump latest marathi news
विश्लेषण: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अनपेक्षित मुसंडी कशी?

हे ही वाचा… RSS Marxist Historians India: अतिउजव्यांना आवडेल म्हणून संस्कृत व हिंदू संस्कृतीचा प्रसार सांगायचा नाही का?

सध्याच्या बाजारस्थितीचा परिणाम काय?

गेल्या काही महिन्यांत अतिभव्य आयपीओ आणि त्याला गुंतवणूकदारांकडून दणकेबाज प्रतिसाद मिळवीत अनेक नवीन कंपन्यांचे समभाग बाजारात सूचिबद्ध झाले. परंतु ताज्या पडझडीत या कंपन्यांच्या समभागांना आता वाली उरला नाही, अशी मोठी घसरण त्यात सुरू आहे. यातील काही कंपन्यांचे समभाग हे गुंतवणूकदारांनी ‘आयपीओ’तून मिळविलेल्या किमतीपेक्षा म्हणजेच इश्यू प्राइसपेक्षा खाली आले आहेत. ताजा मासला द्यायचा तर ऑक्टोबरमध्ये दाखल आठ ‘आयपीओ’पैकी केवळ तीन कंपन्यांचे समभाग सध्या फायद्यात आहेत. ह्युंदाई मोटर इंडिया, दीपक बिल्डर्स, गरुडा कन्स्ट्रक्शन, केआरएन हीट एक्स्चेंजर हे समभाग तर ७ ते २३ टक्क्यांपर्यंत नुकसानीत आहेत. अर्थात या स्थितीतही वारी एनर्जीज आणि डिफ्युजन इंजिनीयर्स यांसारख्या कंपन्यांनी अगदी काही दिवसांत मिळवून दिलेला अनुक्रमे ८६ टक्के व ८८ टक्के परतावाही डोळे दिपवणाराच.

नफाक्षमता, व्यवसाय कामगिरी कशी?

स्विगीचा व्यवसाय निरंतर तोट्यात आहे, हे सुस्पष्टपणे लक्षात घेतले पाहिजे. २०२३-२४ या सरलेल्या आर्थिक वर्षातील २,३५० कोटी रुपयांचा तोटा, पण तो त्याआधीच्या (२०२२-२३) वर्षातील ४,१७९.३ कोटी रुपयांच्या तोट्यापेक्षा ४४ टक्क्यांनी घटला हीच काय ती स्विगीची जमेची बाब. तथापि चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा वार्षिक तुलनेत पुन्हा ८ टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजे मागील वर्षातील याच तिमाहीतील ५६४ कोटी रुपयांच्या तुलनेत तो यंदा जूनअखेर ६११ कोटी रुपयांवर गेला आहे. खाद्य पदार्थांच्या घरपोच बटवड्याचा कंपनीचा मूळ व्यवसाय तोट्यात आहे. तरी आता तिच्या सध्याच्या महसुलात ४० टक्के वाटा हा वाण-सामानाच्या झटपट घरपोच वितरणाच्या क्यू-कॉमर्सचा आहे. या नव्या व्यवसायाने अल्पावधीत केलेल्या प्रगतीबद्दल कंपनीच्या मोठ्या आशाही आहेत. अर्थात त्यानेही झटपट नफा दाखविणे इतक्यात तरी शक्य दिसून येत नाही.

मूल्यांकनाबाबत चिंता काय?

स्विगीचे विद्यमान गुंतवणूकदार या ‘आयपीओ’तून जवळपास ३५ पटीने नफा कमावतील. आयपीओद्वारे उभारल्या जाणाऱ्या ११,३२७ कोटी रुपयांपैकी ६,८२८ कोटी रुपये हे स्विगीतील विद्यमान गुंतवणूकदार त्यांच्या मालकीचे १७.५ कोटी समभाग विकून स्वतःच्या खिशात घालतील. कंपनीच्या विस्तार कार्यक्रमासाठी केवळ ४,४९९ कोटी रुपयेच वापरात येतील. अलिकडे दाखल झालेल्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित कंपन्यांच्या ‘आयपीओं’बाबत असाच अनुभव राहिला आहे. परिणामी या कंपन्यांच्या समभागांबाबत सूचिबद्धतेपूर्वी दिसून येणारा जोश हा समभाग सूचिबद्ध झाल्यासरशी निवळत जात निराशेत बदलल्याचा कटू अनुभव अनेक गुंतवणूकदारांच्या वाट्याला आला. स्विगीने या अंगाने तिच्या प्रस्तावपत्रात खुलासा केला आहे. त्यात म्हटले आहे की, विद्यमान गुंतवणूकदारांकडील प्रति समभाग सरासरी भारित किंमत (वेटेड अॅव्हरेज कॉस्ट ऑफ अक्विझिशन) १७८.९० रुपये आहे. तर आयपीओसाठी निर्धारित ३९० रुपये या किमतीशी तुलना करता ते २.१८ पटीने लाभ मिळवतील. अलीकडील आयपीओमध्ये विक्री करून नामानिराळे होणारे बहुतांश गुंतवणूकदार/भागधारकांनी प्रत्यक्षात तीन पटीपेक्षा अधिक लाभ मिळविला आहे. हे पाहता, स्विगीच्या आयपीओसाठी प्रति समभाग ३९० रुपये नव्हे तर ५३७ रुपये किंमत योग्य ठरली असती. अर्थात किंमत महाग नसल्याचेच कंपनीला सूचित करायचे आहे.

हे ही वाचा… Ancient India Egypt connection: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?

झोमॅटो की स्विगी, काय खरेदी करावे?

स्विगीची तिचा स्पर्धक आणि सध्या सूचिबद्ध असलेल्या झोमॅटोशी तुलना स्वाभाविकच ठरते. जुलै २०२१ मध्ये ७६ रुपयांना आयपीओद्वारे गुंतवणूकदारांनी मिळविलेला झोमॅटोचा समभाग सध्या तिपटीहून अधिक वाढून २४४ रुपयांवर (४ नोव्हेंबर) पोहोचला आहे. झोमॅटोचे बाजारपेठेवर प्रस्थापित वर्चस्व आहे आणि ती कंपनी नफाक्षम देखील बनली आहे. तुलनात्मक मूल्यमापन करायचे तर, सरासरी ऑर्डर मूल्य, सकल ऑर्डर मूल्य आणि खाद्यान्न वितरण विभागातील नफा या सर्वांमध्ये झोमॅटोची कामगिरी उजवी आहे. व्यवसायाचा आकार, नफा आणि उत्तम वाढ निर्देशकांचा झोमॅटोला स्पर्धात्मक फायदा जरूरच आहे. तथापि द्रुत व्यापारात (क्यू-कॉमर्स) स्विगीचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि मजबूत बांधलेला ग्राहक हे घटक तिला या व्यवसायातील प्रबळ दावेदार निश्चितच बनवतात.

sachin.rohekar@expressindia.com

Story img Loader