इस्रायलने शनिवारी पहाटे इराणच्या काही ठिकाणांवर हवाई हल्ले केले. यात इराणची राजधानी तेहरानच्या आसपासच्या परिसरालाही लक्ष्य करण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या इस्रायली हल्ल्यास प्रत्युत्तर दिले जाईल, असे इराणने आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील दोन सर्वांत प्रबळ लष्करी सत्तांमध्ये युद्धभडका उडण्याची भीती असून त्याचे दूरगामी आणि गंभीर परिणाम संभवतात.

नक्की काय घडले?

इराणच्या काही लष्करी महत्त्वाच्या लक्ष्यांवर स्थानिक वेळेनुसार शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी पहाटे २.३० वाजता हल्ले सुरू केल्याचे इस्रायलने जाहीर केले. हे हल्ले सकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते. एकूण २० ठिकाणांवर हल्ले झाले. तेहरान या इराणच्या राजधानीच्या शहरातील नागरिकांनी परिसरात स्फोटांचे आवाज ऐकले. इस्रायलने दुसऱ्यांदा इराणला लक्ष्य केले आहे. परंतु एप्रिलमधील हल्ल्यांपेक्षा या हल्ल्यांची व्याप्ती अधिक होती. हल्ल्यांमुळे फारसे नुकसान झाले नसल्याचे इराणने त्वरित जाहीर केले. पण या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न इराण करणार हे नक्की.

silver coins
विश्लेषण: इंग्लंडमध्ये सापडला आजवरचा सर्वांत मौल्यवान गुप्त खजिना…१००० वर्षांपूर्वीची २५०० चांदीची नाणी… किंमत अवघी ५६ लाख डॉलर!
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
israel mosquito protocol targeting palestian
इस्रायली सैन्य पॅलेस्टिनी नागरिकांना ढाल म्हणून कसे वापरत आहे? काय आहे ‘मॉस्किटो प्रोटोकॉल’?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
thomas tuchel, German coach, England football team
विश्लेषण : इंग्लंड फुटबॉल संघाचे जर्मन प्रशिक्षक! थेट नाझी युगाची चर्चा का? नियुक्तीस विरोध का?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

हे ही वाचा… विश्लेषण : इंग्लंड फुटबॉल संघाचे जर्मन प्रशिक्षक! थेट नाझी युगाची चर्चा का? नियुक्तीस विरोध का?

हल्ल्यांसाठी विलंब का?

एप्रिलमध्ये ज्यावेळी इराणकडून इस्रायलवर पहिल्यांदा ड्रोन व क्षेपणास्त्रे हल्ले झाले, त्यांस प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने पाच दिवसच घेतले होते. पण यंदा १ ऑक्टोबर रोजी इराणकडून त्या देशावर जवळपास १८० बहुतांश बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव झाला, त्यानंतर तब्बल २५ दिवस इस्रायलने प्रत्युत्तरासाठी घेतले. याची कारणे अनेक सांगितली जातात. अमेरिकेने इराणवर हल्ले करू नयेत, यासाठी इस्रायलवर दबाव आणल्याचे सांगितले जात होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यासंदर्भात इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहूंच्या संपर्कात होते. दरम्यानच्या काळात अमेरिकेने इस्रायलला क्षेपणास्त्र बचाव प्रणालीदेखील धाडली. गेले काही दिवस इस्रायलमध्ये सार्वजनिक सुटीही होती. शिवाय लेबनॉनमधील हेझबोलाविरोधी मोहिमेवर त्या देशाने प्राधान्याने लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे इस्रायलच्या ताज्या कारवाईस विलंब झाला. पण ती करण्याविषयी इस्रायल राजकीय आणि लष्करी नेतृत्व ठाम होते.

कोणत्या ठिकाणांवर हल्ले?

इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर आणि तेल प्रकल्पांवर हल्ले करू नये, असे अमेरिकेने बजावले होते. त्याची दखल घेऊन इस्रायलने या लक्ष्यांवर हल्ले करण्याचे टाळले. त्याऐवजी इस्रायली लढाऊ विमानांनी इराणचे क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प, हवाई हल्ले बचाव प्रणाली आणि इतर सामरिक महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य केले. यास इराणच्या हवाई हल्ले बचाव विभागाने दुजोरा दिला आहे. अणुऊर्जा प्रकल्प आणि तेल प्रकल्पांवर हल्ले करण्याचे टाळून इस्रायलने इराणला टोकाची चिथावणी देण्याचेही टाळलेले दिसते.

हे ही वाचा… Digital condom: डिजिटल कंडोमची सोशल मीडियावर चर्चा, काय आहे हा प्रकार?

इस्रायलची मारक क्षमता किती?

दूरवरील लक्ष्यांवर हल्ले करण्याची क्षमता इस्रायलच्या हवाई दलाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. यापूर्वी येमेनमध्ये हुथी बंडखोरांच्या तळांवर इस्रायलने हल्ले केले होते. ती बहुधा इराणवरील कारवाईची रंगीत तालीम होती. जवळपास दीड ते दोन हजार किलोमीटरवर लक्ष्यांवरील या कारवायांसाठी टेहेळणी विमाने, लढाऊ विमाने, हवेत या विमानांना इंधन पुरवतील अशी तेलवाहू विमाने असा ताफा इस्रायलने यशस्वीरीत्या वापरून दाखवला. लेबनॉन किंवा येमेनच्या तुलनेत इराणकडे अर्थातच अधिक सुसज्ज आणि बलाढ्य अशी हवाई हल्ले बचाव प्रणाली आहे. पण त्यांना टाळून इस्रायल इराणपर्यंत पोहोचू शकतो आणि तेथील यंत्रणा खिळखिळी करू शकतो हे यानिमित्ताने दिसून आले. याशिवाय २५०० किलोमीटर पल्ल्याचे जेरिको – टू आणि ४५०० किलोमीटर पल्ल्याचे जेरिको – थ्री ही क्षेपणास्त्रे इस्रायलकडे आहेत. तरी त्यांचा पुरवठा मर्यादित असून, अणुयुद्धाची शक्यता निर्माण झाल्यासच त्यांचा वापर करावा, असे इस्रायलचे धोरण आहे.

अमेरिकेची भूमिका काय?

या हल्ल्यापूर्वी इस्रायलने बायडेन प्रसासनाला अवगत केले होते. बायडेन प्रशासनाच्या सूचनेबरहुकूम इस्रायलने इराणच्या संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्याचे टाळले. त्याच वेळी, इराणकडून कधीही हल्ला होऊ शकतो याची अटकळ बांधूनच अमेरिकेने इस्रायलकडे ‘थाड’ ही क्षेपणास्त्र बचाव प्रणाली सुपूर्द केली आहे. बायडेन यांचे लक्ष अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीकडे लागल्यामुळे आणि त्यामुळे इस्रायलला पाठिंबा किंवा विरोध या बाबी राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरत असल्यामुळे सध्या तरी अमेरिकेची भूमिका तटस्थच राहील, असे दिसते.

हे ही वाचा… Israel used Smart bomb: लेबनॉनमधील इमारती जमिनदोस्त करण्यासाठी इस्रायलने वापरला स्मार्ट बॉम्ब; नक्की काय आहे स्मार्ट बॉम्ब?

इराणचे प्रत्युत्तर काय राहील?

इराण पुन्हा एकदा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची दाट शक्यता आहे. इराणकडे इस्रायलपेक्षा अधिक संख्येने आणि वैविध्यपूर्ण क्षेपणास्त्रे, तसेच ड्रोन आहेत. १ ऑक्टोबरच्या माऱ्यानंतर आणि लेबनॉनकडून होणाऱ्या मर्यादित क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देऊन इस्रायलची क्षेपणास्त्र बचाव प्रणाली काहीशी निष्क्रिय बनली असू शकते. याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न इराणकडून होईल. पण या भानगडीत इस्रायलही आपल्या देशात सहज मारा करू शकतो याची जाणीव झालेले इराणचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व कदाचित तूर्त काही काळ नमते घेऊ शकतो. पण ही शक्यता खूप धूसर आहे.

युद्धभडक्याची शक्यता किती?

या दोन्ही देशांतील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. दोन देशांनी परस्परांवर लुटुपुटीचे आणि प्रतीकात्मक हल्ले केल्याचे सुरुवातीस वाटत होते. पण इराणची ताकद असलेल्या हमास आणि हेझबोला या संघटनांचे कंबरडे इस्रायलने मोडल्यामुळे आता हा मुद्दा इराणसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. दुसरीकडे, इस्रायलही बऱ्यापैकी युद्धाच्या खुमखुमीत आहे. उद्या अमेरिकेचा सल्ला डावलून इस्रायलने इराणच्या तेल प्रकल्पांना लक्ष्य केले तर हाहाकार उडेल. या टापूतील तेल आणि व्यापारवाहतूक युद्धजन्य स्थितीत ठप्प होऊ शकते. तसे झाल्यास जगाच्याच व्यापार आणि ऊर्जा ‘धमन्या’ थिजून जातील आणि आर्थिक अरिष्ट ओढवेल.

Story img Loader