सचिन रोहेकर sachin.rohekar@expressindia.com
एक ना अनेक डोकी असणारा अवाढव्य-अविनाशी व्यवसाय समूह. हे आणि असेच ‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस (आयएल अ‍ॅण्ड एफएस)’चे वर्णन केले जात असे. मात्र संस्थेची महत्ता जितकी मोठी, तितकेच अधिक नुकसान तिच्या पतनाने होत असते. आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या बाबतीत तर तिला महत्ता मिळवून देणारे हातच तिला भस्म करण्यास कारणीभूत ठरले. अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अशक्यप्राय वाटणारे तह, सहयोग, सौदे लीलया जमवून आणण्याची हातोटी असणारे रवी पार्थसारथी यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतला तो कारागृहातच. ते ज्या तऱ्हेने तोंडात पाइप धरत ती लकबच त्यांचा सरंजाम आणि रुबाबाची छाप समोरच्यावर पाडत असे आणि निम्मे काम फत्ते होत असे. स्थापनेपासून आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या घडणीत हातभार लावला, तिचे अध्यक्ष या नात्याने तिला उत्कर्षिबदूपर्यंत नेले आणि जवळपास ३५० उपकंपन्यांचा हा डोलारा त्यांच्याच कुकर्माचा भार असह्य ठरल्याने भुईसपाट झाला. पांढरपेशा मंडळींचे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळय़ांचा पर्दापाश होतो, सूत्रधारांना गजाआड केले जाते, पण आरोप सिद्ध होऊन शिक्षेचे टोक गाठले जाण्यापूर्वीच आरोपीच जग सोडून जातो. हे असे प्रसंग आजवरच्या घोटाळय़ांच्या मालिकेइतकेच लांबलचक आहेत.. का? कसे? कशामुळे?

आर्थिक घोटाळेबाजांना शासन झाल्याची उदाहरणे अपवादानेच..

UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

चेन्नई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा ते गंभीर घोटाळ्यांच्या तपासाची सर्वोच्च यंत्रणा असलेल्या ‘एसएफआयओ’र्पयच्या तपासांचा पाठलाग सुरू असताना रवी पार्थसारथी यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. विविध तपास यंत्रणांकडून दाखल शेकडो खटल्यांतील मुख्य आरोपीच अशा तऱ्हेने नाहीसा झाला. न्यायालयाकडून गुन्हेगार ठरविला जाण्याआधीच हर्षद मेहता या कुख्यात शेअर घोटाळ्याच्या आरोपीचे निधन झाले. एकूणच ‘घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे,’ असे नाही म्हटले तरी आर्थिक गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. त्या तुलनेत शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र थोडेबहुतही वाढलेले नाही. गैरमार्गाने ज्या पैशाची लूट केली गेली तो परत मिळविण्याचे कामही अभावानेच घडले आहे. एनएसईएल घोटाळा, पेण-अर्बन, रूपी, सीकेपी, पीएमसी वगैरे बँकबुडीची प्रकरणे अशी की त्यात अद्याप आरोपीही निश्चित झालेले नाहीत. बँकांकडून कोटय़वधींचे कर्ज घेऊन विजय मल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीसारख्या मंडळींचा विदेशात आरामात पुख्खा झोडत जीवनक्रम सुरू आहे.

होमट्रेड घोटाळा, केतन पारिखचे काय?

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलीवूड तारे शाहरुख खान, हृतिक रोशन, मलायका अरोरा यांच्यासह कोटय़वधी रुपये जाहिरातबाजीवर खर्च करून नवी मुंबईस्थित होम ट्रेड लिमिटेडने २००० सालात जन्म घेतला. वित्तीय व्यवहारांचे संकेतस्थळ हा होमट्रेडचा जगापुढे असलेला तोंडवळा. सरकारी रोख्यांमध्ये (गिल्ट्स) व्यवहार करणारी एक व्यावसायिक पेढी असल्याचा तिचा दावा होता. गिल्ट्समध्ये व्यवहार करणाऱ्या सामान्य गुंतवणूकदार, काही ‘भाबडय़ा’ सहकारी बँकांना, दलालांना, सब-ब्रोकर्सना तिने आकर्षितही केले होते. पण असे सरकारी रोखे कंपनीकडे कधीच नव्हते आणि संपूर्ण व्यवहार म्हणजे धूळफेक, केवळ कागदावरचा दिखावा होता. नागपूर जिल्हा बँकेने होम ट्रेडद्वारे खरेदी केलेल्या १२४ कोटी रुपये मूल्याचे गिल्ट्स प्रत्यक्षात मिळालेच नसल्याची तक्रार केल्यानंतर हा घोटाळा उजेडात आला. तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. गुंतवणूकदारांची अब्जावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी होम ट्रेडचे मुख्य कार्यकारी संजय अगरवाल यांना मे २००२ मध्ये त्यांचे सहकारी केतन सेठ, सुबोध भंडारी यांच्यासह अटक करण्यात आली. ऑगस्ट महिना उजाडला आणि त्यांची जामिनावरही मुक्तता झाली. घोटाळय़ाची चौकशी सुरूच आहे, न्यायालयीन निवाडा प्रलंबित आहे आणि या प्रकरणातील एक सहआरोपी आज राज्याच्या मंत्रिपदी आहेत. हर्षद मेहता घोटाळय़ाचाच ‘आदर्श’ डोळय़ापुढे ठेवून झालेला सनदी लेखापाल केतन पारिखने केलेल्या त्याच्या के-१० समभागांचा बुडबुडाही फुटला आणि तपभराचा काळ लोटल्यानंतर २०१७ मध्ये केतन पारिख याला दोन वर्षांची शिक्षा झाली. तोवर त्याने भरपूर पैसा विदेशात पाठविला, त्यामुळे लुटलेला पैसा कधी परत आलाच नाही.

साटेलोटय़ाच्या कुजकट व्यवस्थेतून संघटित लूटशाही?

सल्लागार संस्था ‘ग्रँट थॉर्नटन’ने २०१९ मध्ये तयार केलेल्या गोपनीय अहवालातून असे दिसून आले की, आयएल अ‍ॅण्ड एफएसने नावाजलेल्या व निष्पक्ष म्हणून मान्यताप्राप्त पतमानांकन संस्थांकडून चांगले मानांकन (रेटिंग) मिळवण्यासाठी आणि कंपनीची निराशाजनक आर्थिक परिस्थिती लपवण्यासाठी अनेक शंकास्पद क्ऌप्त्या-कुलंगडी केल्या. पतमानांकन संस्थांच्या वरिष्ठांना विदेशात माद्रिदमध्ये घरे आणि फुटबॉल सामन्याची तिकिटे खरेदी करण्यापासून ते उच्च व्यवस्थापनाशी निगडित धर्मादाय संस्थांना पैसे देण्यापर्यंतची आतिथ्य व कृपामर्जी दाखविण्यात आली. नोकरशाहीत कामे उरकण्यासाठी, सनदी अधिकाऱ्यांना स्वत:च अथवा त्यांच्या मुलाबाळांना गलेलठ्ठ पगारासह सेवेत सामावून घेण्याचे प्रकारही झाले. राजकीय पदाधिकारी, मंत्री-संत्री, प्रशासन, नियामक अशा सर्वाच्या संगनमतासह सुरू राहिलेल्या या संघटित लूटशाहीचे नमुने सर्वच घोटाळ्यांमध्ये सामाईकपणे दिसून येतात. अशा साखळ्यांमुळे गैरव्यवहारांचा शोध घेणे अवघड बनते हेही तितकेच खरे.

जिग्नेश शहाचे काय, चित्रा रामकृष्णचे काय होणार?

सुमारे ५६०० कोटींचा एनएसईएलमधील घोटाळय़ाप्रकरणी, त्या बाजारमंचाचा संस्थापक जिग्नेश शहा गजाआड गेला आणि जामिनावर मुक्त होऊन आता दुसऱ्या इिनगची तयारीही त्याने सुरू केली आहे. त्यानेच केलेल्या दाव्याप्रमाणे, नव्या पिढीच्या ‘स्टार्टअप परिसंस्थे’त १०० पट अधिक संधी त्याला खुणावत आहे. ‘सेबी’च्या दृष्टीआड २००६ पासून शिजलेल्या राष्ट्रीय शेअर बाजारातील सह-स्थान घोटाळ्यातील आरोपी रवी नारायण, चित्रा रामकृष्ण, आनंद सुब्रमणियन या माजी प्रमुखांना अटक झाली २०२२ सालात. एकूणच तपासाच्या कूर्मगतीवर खुद्द न्यायालयाला टिप्पणी करावी लागून, तपास यंत्रणांची कानउघाडणी करावी लागली आहे. आरोपपत्राला विलंब म्हणून ही मंडळी कारागृहाबाहेर पडलेली दिसल्यास नवल ठरू नये.