राखी चव्हाण

प्रजनन शास्त्र तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे उत्तरेकडील पांढऱ्या गेंड्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्याची आशा निर्माण झाली आहे. पृथ्वीवर सध्या केवळ दोन पांढरे गेंडे शिल्लक आहेत. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत तयार केलेल्या गेंड्याच्या गर्भाचे प्रतिस्थापित मातेमध्ये (सरोगेट मदर) यशस्वीपणे आरोपण करून जगातील पहिली गेंड्याची कृत्रिम गर्भधारणा साध्य केली आहे. 

पांढऱ्या गेंड्याची सध्याची स्थिती काय?

जगातील शेवटच्या पांढऱ्या नर गेंड्याचा मृत्यू केनियातील ओल पेजेटा वन्यजीव अभयारण्यात १९ मार्च २०१८ रोजी झाला. २००९ साली ‘फाटू’ आणि ‘नाजिन’ दोन माद्यांसह त्याला ‘झेक रिपब्लिक’ येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणण्यात आले होते. तो ४५ वर्षांचा होता आणि त्याचे नाव ‘सूदान’ असे ठेवण्यात आले होते. सूदानचे वय ४५ वर्ष होते आणि तो वृद्ध झाला होता. त्याचप्रमाणे त्याच्या पायातली ताकदही हळूहळू क्षीण होत गेली होती. आपल्या पायावर उभे राहण्यास त्याला त्रास होत होता. 

हेही वाचा >>>जरांगे पाटलांचा ‘सगेसोयरे’ शब्दावर भर का? मराठा आरक्षणाच्या लढ्यात यामुळे काय बदल होणार? वाचा…

प्राण्यांमध्ये कृत्रिम गर्भधारणेचा प्रयोग कुणावर?

माणसांमध्ये कृत्रिम गर्भधारणेबद्दल तर सर्वांनी ऐकलेच आहे, पण आता प्राण्यांमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर यशस्वीपणे करण्याची आशा बळावली आहे. कृत्रिम गर्भधारणेच्या तंत्रज्ञानामुळे नामशेष होण्याच्या मार्गावरील प्राण्यांना वाचवता येऊ शकते. एकशिंगी गेंड्यावर या तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात आला आहे आणि त्यात यशदेखील आले. गेंड्यांमध्ये कृत्रिम गर्भधारणेच्या तंत्रज्ञानाला आपण यशस्वी मानू शकतो, असे बर्लिनमधील ‘लेबनीज इन्स्टिट्यूट फॉर झू अँड वाइल्डलाइफ रिसर्च’साठी काम करणाऱ्या सुसैन होल्ज यांचे म्हणणे. येणाऱ्या काळात पांढऱ्या गेंड्यांना वाचवता येऊ शकेल. काही वर्षांपूर्वी पांढरे गेंडे मध्य अफ्रिकेच्या जंगलात आढळून येत होते. गेंड्यांच्या समूहात ते कमी हिंसक मानले जातात. मात्र, या भागात जेव्हा शिकारी वाढल्या, तेव्हा त्याचा परिणाम यांच्या संख्येवरदेखील झाला.

दक्षिणेत प्रयोग यशस्वी, उत्तरेकडे होणार का?

कृत्रिम गर्भधारणेचा प्रयोग दक्षिणेकडील पांढऱ्या गेंड्यावर यशस्वीपणे पार पाडला. उत्तरेकडील पांढऱ्या गेंड्यांमध्ये हा प्रयोग यशस्वी होईल का, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, जर दक्षिणेकडील पांढऱ्या गेंड्यांमध्ये कृत्रिम गर्भधारणेचा प्रयोग यशस्वीरित्या केल्या जाऊ शकतो, तर गंभीरपणे धोक्यात असलेल्या प्रजातींना वाचवण्यासाठी उत्तरेकडील भागांमध्ये हाच प्रयोग केला जाऊ शकतो, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये केलेल्या प्रयोगाचा एक भाग म्हणून, ओल पेजेटा कंझर्व्हेटरीमध्ये दोन दक्षिणेकडील पांढऱ्या गेंड्याच्या भ्रूणांचे सरोगेट मातेमध्ये आरोपण करण्यात आले. त्यांपैकी एकच गर्भवती राहिली. 

हेही वाचा >>>उत्तराखंडमध्ये फेब्रुवारी महिन्यात समान नागरी कायदा लागू होणार? जाणून घ्या तरतुदी काय…

उत्तरेकडील पांढऱ्या गेंड्यांना वाचवण्यासाठी पुढे काय?

‘बायोरेस्क्यू’चे उद्दिष्ट लवकरच उत्तरेकडील पांढऱ्या गेंड्याच्या भ्रुणाचे दक्षिणेकडील पांढऱ्या गेंड्याच्या सरोगेट मातेमध्ये आरोपण करण्याचे उद्दिष्ट आहे आणि दोन्ही उपप्रजाती पुरेशा सारख्याच असल्याने भ्रूण विकसित होण्याची शक्यता आहे, असे संशोधकांनी म्हटले. सततच्या शिकारीमुळे आणि उत्तरेकडील पांढऱ्या गेंड्याच्या शिंगांना कथित औषधी उपयोगासाठी आणि कोरीव कामासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ही प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. ‘बायोरेस्क्यू’ने संरक्षित शुक्राणू आणि उरलेल्या दोन मादींमधून काढलेली अंडी सुमारे ३० संरक्षित भ्रूण तयार करण्यासाठी वापरली. कृत्रिम गर्भधारणा यशस्वी झाल्यास अनेक वर्षांनंतर उत्तरेकडील पांढऱ्या गेंड्यांना पुन्हा जंगलात आणण्याचे तज्ज्ञांचे उद्दिष्ट आहे.

पुढील प्रक्रिया काय असणार?

बर्लिन, जर्मनी आणि क्रेमोना, इटली येथे अंडी द्रव नायट्रोजनच्या आत उणे १९६ अंश सेल्सिअस तापमानात संरक्षित केली गेली आहेत. दक्षिणेकडील पांढऱ्या गेंड्याची सरोगेट मादी, जिच्या गर्भाशयात भ्रूण टोचले जाईल तिचीदेखील निवड करण्यात आली आहे. जेव्हा मादी सोबतीसाठी तयार असेल तेव्हा तिच्या गुदद्वारातून गर्भ तिच्या शरीरात सोडला जाईल. जर १६ महिन्यांची गर्भधारणा यशस्वी झाली, तर पिल्लू हा पहिला उत्तरी पांढरा गेंडा असेल. उत्तरेकडील पांढऱ्या गेंड्याचे पहिले भ्रूण आरोपण या वर्षी मे किंवा जूनमध्ये केले जाईल. जर आरोपण यशस्वी झाले आणि गर्भधारणा चांगली झाल्याचे दिसून आले, तर तज्ज्ञ अधिक भ्रूण आरोपण करतील.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rakhi.chavhan@expressindia.com