केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी रविवारी (१८ सप्टेंबर) आंबेडकर सर्किटच्या पर्यटनासाठी एका विशेष पर्यटन ट्रेनची घोषणा केली. असं असलं तरी तारीख, तिकिटाची किंमत, प्रवाशांची संख्या हे तपशील अद्याप जाहीर होणं बाकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंबेडकर सर्किट काय आहे?

केंद्र सरकारने आंबेडकर सर्किट म्हणजेच पंचतीर्थची सर्वात आधी घोषणा २०१६ मध्ये केली होती. पंचतीर्थमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं मध्य प्रदेशमधील जन्मस्थळ महू, शिक्षा भूमी, युरोपमध्ये शिक्षणासाठी गेले असताना लंडनमध्ये राहिले ते ठिकाण, नागपूरमधील दीक्षाभूमी, दिल्लीतील महापरिनिर्वाण भूमी आणि मुंबईत जेथे अंत्यसंस्कार झाले ती चैत्यभूमी या स्थळांचा समावेश असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं.

यापैकी भारतातील चार स्थळांचा संपर्क अधिक मजबूत करून केंद्र सरकार या ठिकाणी पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. ही सर्व ठिकाण दलित समुहासाठी तीर्थक्षेत्राप्रमाणे आहेत. मात्र, या ठिकाणी दलित समाजाशिवाय इतर पर्यटकही यावे यासाठीही प्रयत्न होत आहेत. पर्यटन मंत्रालयाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये जेवण, प्रवास आणि संबंधित पर्यटन स्थळावरील प्रवेशिका या सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे.

देशात पर्यटनावर भर देण्याचा प्रयत्न

सरकारने २०१४-१५ च्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत १५ पर्यटन सर्किट निश्चित केले आहेत. यात रामायण, बुद्धिस्ट, कोस्टल, डेझर्ट, इको, हेरिटेज, ईशान्य भारत, हिमालय, सुफी, कृष्ण, ग्रामीण, आदिवासी आणि तिर्थंकर इत्यादी सर्किटचा समावेश आहे. यापैकी रामायण, बुद्धिस्ट आणि ईशान्य भारताचे सर्किट आधापासून सुरू आहेत. आता आंबेडकर सर्किट चौथं सक्रीय सर्किट असेल.

पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मार्च २०२२ पर्यंत एकूण ७६ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. १५ सर्किटच्या विकासासाठी अंदाजे ५ हजार ४४५ कोटी रुपये खर्च येणार आहे. यात पर्यटन स्थळांच्या थीम, पायाभूत सुविधा, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि पर्यटकांसाठी सोयीसुविधा यांचाही विकास केला जाणार आहे. प्रत्येक सर्किटमध्ये एकापेक्षा अधिक राज्याचा समावेश असल्याने पर्यटक वेळोवेळी कोणत्या पर्यटनस्थळांना भेट देतात याचाही अभ्यास केला जाणार आहे.

रेल्वेची भूमिका काय असणार?

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने एकूण ३ हजार विशेष रेल्वेचे कोच आरक्षित केले आहेत. यंदा आयआरसीटीने रामायण सर्किटसाठी १४ विशेष थ्री टायर कोच आरक्षित होते. यात पँट्री कार, रेस्टॉरंट कार आणि ट्रेन स्टाफसाठी वेगळा कोच होता. या संपूर्ण पॅकेजची किंमत एका व्यक्तीसाठी ६२ हजार रुपये इतकी आहे. १७ दिवसांच्या सहलीसाठी ५०० लोकांना बुकिंग करता येते.

हेही वाचा : ‘रामायण’ आणि ‘बुद्धिस्ट’ सर्किट प्रमाणेच ‘आंबेडकर सर्किट’वर विशेष पर्यटक रेल्वे धावणार : जी किशन रेड्डी

दरम्यान, मोदी सरकार या प्रयत्नांमधून समाजातील विविध घटकांमध्ये आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधकांकडून मोदींच्या या योजनांमागे राजकारण दडल्याचीही टीका होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on ambedkar circuit of tourism know what are facilities pbs
First published on: 24-09-2022 at 08:30 IST