दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी (३१ ऑगस्ट) ‘देशातील पहिली व्हर्चुअल शाळा‘ सुरू केल्याची घोषणा केली. या शाळेत देशभरातील विद्यार्थी इयत्ता नववी ते बारावीसाठी प्रवेश घेऊ शकणार आहेत. मात्र, केजरीवालांच्या ज्या व्हर्चुअल शाळेचं इतकं कौतुक होत आहे ती व्हर्चुअल शाळा नेमकी कशी आहे? या शाळेत विद्यार्थी नेमकं कशाप्रकारे शिक्षण घेणार आहेत? या प्रश्नांचा आढावा घेणारं हे विश्लेषण…

दिल्ली सरकारच्या व्हर्चुअल शाळेशी संबंधित १३ प्रश्नांच्या उत्तरातून ही शाळा कशी चालणार याचं उत्तर समजून घेता येईल.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…

१. व्हर्चुअल शाळेत कोणता अभ्यासक्रम असणार?

दिल्ली आदर्श व्हर्चुअल शाळा (Delhi Model Virtual School – DMVS) दिल्ली शिक्षण मंडळाशी संलग्न असून त्यांचाच अभ्यासक्रम या शाळेत शिकवला जाणार आहे. गुणपत्रक आणि प्रमाणपत्रही दिल्ली शिक्षण मंडळाचेच मिळणार आहे.

२. या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पात्र असतील का?

या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळणार आहे आणि हे प्रमाणपत्र इतर कोणत्याही बोर्डाप्रमाणेच आहे. त्यामुळे येथून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पात्र असतील.

३. या शाळेचं शुल्क किती असणार?

दिल्ली सरकारच्या या व्हर्चुअल शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क असणार नाही.

४. पहिल्या बॅचमध्ये किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?

सध्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येची कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. ही संख्या किती विद्यार्थ्यांची नोंदणी होते त्यावरच ठरणार आहे.

५. ही शाळा ऑनलाईन क्लासेस घेण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म वापरणार?

या शाळेचे क्लासेस घेण्यासाठी स्कुलनेट आणि गुगलने तयार केलेल्या खास प्लॅटफॉर्मचा वापर होणार आहे.

६. ऑनलाईन क्लासेस असल्याने विद्यार्थ्यांची हजेरी कशी घेणार?

या वर्गांची हजेरी घेण्यासाठी या शाळांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्येच व्यवस्था करण्यात आली आहे.

७. परीक्षा कशी होणार? ऑनलाईन परिक्षा झाल्यास पारदर्शकता कशी ठेवणार?

या शाळेत विद्यार्थी विषय किंवा संकल्पना निवडून अभ्यासक्रमाची निवड करू शकतात. त्यावर क्षमता-आधारित मूल्यांकन करण्यात येणार आहे. वर्षभरात याच्या दिल्लीत दोन परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना दिल्लीत यावं लागणार आहे. ही परीक्षा दिल्लीतील विविध शाळांमध्ये घेतली जाईल.

८. व्हर्चुअल शाळेसाठी स्वतंत्र शिक्षक भरती होणार का?

सुरुवातीच्या चाचणी वर्षात व्हर्चुअल शाळेसाठी दिल्ली सरकारच्या शाळांमधूनच शिक्षकांची निवड केली जाणार आहे. निवडीनंतर या शिक्षकांना प्रशिक्षणाच्या मालिकेतून तयार केलं जाईल.

९. ऑनलाईन क्लासेसमध्ये सायबर क्राईमचा सामना कसा करणार?

ऑनलाईन व्यवहारांमध्ये सायबर क्राईम हा मोठा अडथळा असतो. हाच अडथळा दिल्लीच्या व्हर्चुअल क्लासमध्येही येऊ शकतो. त्यामुळे या क्लासेसमध्ये सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकाला स्वतंत्र आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल. त्याद्वारेच संबंधित व्यक्ती व्हर्चुअल क्लासमध्ये येऊ शकेल.

१०. कोणते विषय असणार?

या क्लासमध्ये इयत्ता नववीसाठी एकूण पाच विषय असणार आहेत. यात इंग्लिश, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि संगणक विज्ञान यांचा समावेश आहे.

११. दिवसभरात विद्यार्थ्यांचा दिनक्रम काय असणार?

या क्लासमध्ये दिवसभरात विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लाससह काही टुटोरियल आणि इतर कृतीही कराव्या लागतील. याशिवाय समुपदेशनही उपलब्ध असेल.

१२. प्रात्यक्षिक कसं होणार?

विषयानुरुप जशी गरज असेल तसे व्हर्चुअल प्रात्यक्षिकं देखील घेतली जाणार आहेत. त्याची व्यवस्था व्हर्चुअल शाळेच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे.

हेही वाचा : विश्लेषण : मुलांना शारीरिक शिक्षा दिल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास, ५ लाखांचा दंड, जाणून घ्या कायदा…

१३. व्हर्चुअल शाळेत संवादाचं माध्यम काय असेल?

या शाळेत संवादासाठी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांचा वापर केला जाणार आहे.