विश्लेषण : उज्जैनमधील १८ व्या शतकातील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचा ७०५ कोटींचा विकास प्रकल्प काय? वाचा... | Loksatta Explained on redevelopment plan of Mahakaleshwar temple in Ujjain Madhya Pradesh | Loksatta

विश्लेषण : उज्जैनमधील १८ व्या शतकातील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचा ७०५ कोटींचा विकास प्रकल्प काय? वाचा…

महाकालेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य काय? याचं महत्त्व काय? पुर्विकासात नेमकं काय होत आहे? या सर्व प्रश्नांचा आढावा घेणारं हे विश्लेषण…

विश्लेषण : उज्जैनमधील १८ व्या शतकातील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचा ७०५ कोटींचा विकास प्रकल्प काय? वाचा…
महाकालेश्वर मंदिर पुनर्विकास आराखडा

मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे असलेल्या पुरातन महाकालेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार आहे. या मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील पुनर्विकासाचं काम पूर्ण झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ ऑक्टोबरला त्याचं लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाकालेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य काय? याचं महत्त्व काय? पुर्विकासात नेमकं काय होत आहे? या सर्व प्रश्नांचा आढावा घेणारं हे विश्लेषण…

मंदिराची कथा काय?

उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे. हे भगवान शंकरांचं सर्वात पवित्र देवस्थान मानलं जातं. हे मंदिर पुरात उज्जैन शहरामध्ये क्षीप्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे. हिंदू पौराणिक कथांनुसार, हे मंदीर भगवान ब्रह्मांनी निर्माण केलं. महाकाल लिंग स्वयंभू असल्याचं मानलं जातं. महाकालेश्वर मंदिरातील मूर्ती दक्षिणमुखी आहे.

मंदिर पुनर्विकास आराखडा काय आहे?

२०१७ मध्ये मध्य प्रदेश सरकारने महाकाल परिसराचा पुर्विकास करण्याची घोषणा केली. यात मंदिरासह आजूबाजूच्या परिसराचाही समावेश आहे. हा मंदिर परिसर जवळपास अडीच हेक्टरमध्ये पसरलेला आहे. आता पुनर्विकासात हे क्षेत्र ४० हेक्टरपर्यंत वाढणार आहे. यात रुद्रसागर तलावाचाही समावेश आहे. या पुर्विकासासाठी ७०५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या पुनर्विकास प्रकल्पाला महाकाल महाराज मंदिर परिसर विस्तार योजना असं नाव देण्यात आलं. या प्रकल्पाचे दोन टप्पे आहेत. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. याला ३५० कोटी रुपये खर्च आला आहे.

महाकालेश्वर परिसर

पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पहिल्या टप्प्यातील कामाचं उद्घाटन होईल. मुख्यमंत्री चौहान यांनी केलेल्या घोषणेनुसार विकसित करण्यात आलेल्या परिसराला महाकाल लोक असं नाव देण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात महाकाल मंदिर परिसरासह रुद्रसागर तलावाचाही विकास करण्यात आला आहे. तलावाच्या किनाऱ्यावर एका पुलाचं बांधकामही करण्यात आलं. याशिवाय महाकालेश्वर वाटिका, धर्मशाळा, अन्नक्षेत्र, प्रार्थना सभागृह आणि कमळ तलावाचाही समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यात काय असणार?

या प्रकल्पाचा दुसरा टप्पा जून २०२३ मध्ये पूर्ण होईल आणि त्यासाठी आणखी ३०० कोटी रुपयांचा खर्च येईल, असं अपेक्षित आहे. या टप्प्यात पर्यटन आणि माहिती केंद्रही विकसित केलं जाणार आहे. याशिवाय, छोटा रुद्रसागर तलाव, महाकाल प्रवेशद्वार, पुरातन मार्ग, हरी फाटक पुलाची रुंदी वाढवणे, रेल्वे भुयारीमार्ग इत्यादी गोष्टींचाही समावेश असेल.

महाकालेश्वर पुनर्विकास प्रकल्पावरून राजकारण

चौहान यांनी आरोप केला की, हे काम त्यांच्या मागील सरकारच्या काळात सुरू झालं होतं. मात्र, मध्यंतरीच्या काळात सरकार बदल झाला आणि हे काम थांबलं. २०२० मध्ये या कामाची सविस्तर पाहणी आणि आढावा घेण्यात आला होता. २०१७ मध्ये या प्रकल्पाची किंमत ९५ कोटी रुपये अपेक्षित होती. मात्र, काँग्रेस सरकार २०१८ मध्ये सत्तेत आल्यानंतर हे काम थांबलं.

हेही वाचा : चित्त्यांच्या सरंक्षणासाठी ‘स्निफर डॉग’ करणार तैनात, आयटीबीपीकडून खास प्रशिक्षण सुरू

दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी चौहान यांचे सर्व आरोप फेटाळले. तसेच काँग्रेस सरकारच्या काळात या प्रकल्पाला सरकारने ३०० कोटी रुपयांचा निधी दिल्याचं सांगितलं. तसेच हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी एका समितीचंही गठन केल्याचं नमूद केलं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण: स्त्री पुरुषांच्या वेतनात असमानता किती व कशी असते?

संबंधित बातम्या

विश्लेषण: कापसाला गेल्‍या वर्षीइतके दर मिळतील का?
विश्लेषण : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला इजिप्तच्या अध्यक्षांना निमंत्रण; प्रमुख पाहुण्यांची निवड नेमकी कशी केली जाते? जाणून घ्या
विश्लेषण: 5G मुळे प्रवासी विमानांच्या उड्डाणांमध्ये अडथळे येतात? विमानतळ क्षेत्रात केंद्रीय मंत्रालय काय बदल करणार?
विश्लेषण: मिठी नदीचे विस्तारीकरण, सौंदर्यीकरण…कामे पूर्ण किती? खळखळाट किती?
विश्लेषण : हिमोफिलियाचे आव्हान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“दु:ख हेच आहे की एका माणसाच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागे पडतोय”; मुख्यमंत्री शिंदेंवर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र!
बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?
मंगल प्रभात लोढांकडून शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना शिंदेंच्या बंडाशी; म्हणाले, “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, त्याचप्रमाणे…”
“दाक्षिणात्य चित्रपटांची खिल्ली उडवणारेच आज…” राणा दग्गुबातीचे परखड भाष्य
“दक्षिणेकडील चित्रपट…” बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य वादावर कार्तिक आर्यनची स्पष्ट भूमिका