– संदीप कदम

जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत ट्वेन्टी-२० क्रिकेट लीग अशी ओळख असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) छोटेखानी लिलाव हा २३ डिसेंबरला कोची येथे पार पडेल. आपल्या योग्य संघबांधणीसाठी १० संघ लिलावात खेळाडूंवर बोली लावतील. अनेक दिग्गज खेळाडूंना यंदा संघांनी लिलावापूर्वी मुक्त केले. त्यामुळे हा लिलाव नेमका कसा पार पडेल, याचा घेतलेला हा आढावा.

not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: …आणि रोहित शर्मा पंड्याला म्हणाला, “कोण? मी?”, हार्दिकच्या ‘या’ कृतीवर चाहत्यांचा संताप; पाहा नेमकं काय घडलं मैदानात!
GT Team Captaincy came early Mohammed Shami on Shubman Gill
Gujarat Titans : “त्याला जबाबदारी लवकर मिळाली पण…”, शुबमन गिलच्या कर्णधारपदावर शमीची प्रतिक्रिया

लिलावात एकूण किती खेळाडूंचा सहभाग असेल?

‘आयपीएल’च्या या छोटेखानी लिलावामध्ये सुरुवातीला ९९१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यामधून लिलावात सहभागी होणाऱ्या ४०५ खेळाडूंची अंतिम यादी तयार करण्यात आली. या ४०५ खेळाडूंपैकी २७३ खेळाडू हे भारतीय असून १३२ खेळाडू विदेशी आहेत. ज्यापैकी चार खेळाडू हे सदस्य देशातील आहेत. यामध्ये ११९ कॅप्ड खेळाडू (आपापल्या देशाकडून खेळलेले) असून २८२ अनकॅप्ड (आपल्या देशांकडून न खेळलेले) खेळाडूंचा समावेश आहे. जास्तीत जास्त ८७ जागांसाठी लिलाव पार पडेल. १९ विदेशी खेळाडूंसाठी मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. तर, ११ खेळाडू दीड कोटी मूळ किंमत असलेल्या गटात असतील. तर, एक कोटीची मूळ किंमत असलेल्या गटात २० क्रिकेटपटूंचा समावेश असेल.

कोणत्या संघाकडे किती जागा आणि रक्कम शिल्लक?

सनरायजर्स हैदराबाद संघाकडे सर्वाधिक ४२.२५ कोटी रक्कम असून त्यांना १३ खेळाडूंवर बोली लावता येणार आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स संघाकडे ११ जागा असून ७.०५ कोटी रक्कम आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडे १० जागा शिल्लक असून त्यांच्याकडे लिलावात खर्च करण्यासाठी २३.३५ कोटींची रक्कम आहे. त्याखालोखाल मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (सर्वांकडे ९ जागा शिल्लक) संघ असून त्यांच्याकडे अनुक्रमे २०.५५ कोटी, ३२.२ कोटी आणि १३.२ कोटी इतकी रक्कम आहे. चेन्नई सुपर किंग्ज, गतविजेते गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्याकडे ७ खेळाडूंची जागा आहे. तर, चेन्नई २०.४५ कोटी, गुजरात १९.२५ कोटी आणि ८.७५ कोटी रक्कम लिलावात वापरू शकतात. दिल्ली कॅपिटल्सकडे या लिलावासाठी सर्वात कमी ५ जागा आहेत आणि त्यांच्याकडे १९.४५ कोटींची रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे या लिलावात कोणता संघ बाजी मारेल, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

कोणत्या भारतीय खेळाडूंवर असेल लिलावात सर्वांचे लक्ष?

भारतीय संघाकडून खेळलेल्या खेळाडूंपैकी मयांक अगरवाल आणि मनीष पांडे यांच्यावर लिलावात विशेष लक्ष असेल. या दोन्ही खेळाडूंची मूळ किंमत १ कोटी निश्चित करण्यात आली आहे. अगरवालने २०२२ सत्रात पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व केले, मात्र त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. त्याला ‘आयपीएल’च्या मोठ्या लिलावात १४ कोटी रुपये खर्ची घालून संघात कायम राखण्यात आले. यानंतर पंजाबच्या कर्णधारपदाची सूत्रे शिखर धवनकडे सोपवण्यात आली आणि २३ डिसेंबरच्या लिलावाआधी त्याला संघमुक्त करण्यात आले. अगरवालने २०२१च्या हंगामात पंजाबकडून खेळताना ४४१ धावा केल्या होत्या. त्याचा अनुभव पाहता त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. मनीष पांडेलाही गेल्या लिलावात ४.६० कोटीला लखनऊ सुपर जायंट्स संघाने आपल्याकडे घेतले, मात्र त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र, सय्यद मुश्ताक अली या स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धेत त्याने सात डावांत २४७ धावा केल्या. त्यामुळे पांडेलाही लिलावात पसंती मिळू शकते. विजय हजारे करंडक स्पर्धेत आपल्या आक्रमक फलंदाजीने नारायण जगदीसनने लक्ष वेधले होते. त्याने या स्पर्धेच्या आठ सामन्यांत तब्बल ८३० धावा केल्या. यासह त्याने तमिळनाडूकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध १४१ चेंडूंत २७७ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे लिलावात अनेक संघ त्याच्यावर लक्ष ठेवून असतील.

हेही वाचा : IPL 2023: ‘टॅक्टिकल सबस्टिट्युशन म्हणजे काय रे भाऊ?’ आयपीएलच्या १५व्या हंगामापासून सुरु होणार नवीन नियम

कोणत्या आघाडीच्या विदेशी खेळाडूंना मिळू शकते सर्वाधिक पंसती?

अनेक आघाडी विदेशी खेळाडूंचा समावेश असल्याने लिलावात संघांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळेल. यामध्ये सर्वात आघाडीवर इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आहे. नजीकच्या काळात स्टोक्सने आपल्या नेतृत्वगुण आणि कामगिरीच्या बळावर अनेक निर्णायक स्पर्धा तसेच, मालिकांमध्ये जेतेपद मिळवून दिली. त्यामुळे या लिलावतील सर्वाधिक बोली स्टोक्सवर लागण्याची अधिक शक्यता आहे. सर्वच आघाड्यांवर स्टोक्सने चुणूक दाखवल्याने सर्वच संघ त्याला आपल्याकडे घेण्यास उत्सुक असतील. यानंतर अष्टपैलू सॅम करनवर चांगली बोली लागू शकते. चेन्नई सुपर किंग्सकडून २०२०-२१च्या सत्रात खेळताना फलंदाजी व गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर त्याने चमक दाखवली. यासह इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकवरही सर्वांच्या नजरा असतील. नुकत्याच पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने तीन शतके झळकावली. तसेच, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये तो आपल्या आक्रमक खेळासाठीही ओळखला जातो. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीनवरही संघ लक्ष ठेवून असतील. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ग्रीनने यापूर्वीच आपल्या आक्रमक खेळीने छाप पाडली आहे. वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन आपल्या आक्रमक फटक्यांसाठी ओळखला जातो. गेल्या लिलावात सनरायजर्स हैदराबादने त्याला १०.७५ कोटी रुपयांना संघात घेतले होते. या सत्रात त्याने ३०६ धावा केल्या. नुकत्याच पार पडलेल्या अबू धाबी टी-१० मध्ये त्याने आक्रमक फलंदाजी केली होती. त्यामुळे पूरनला स्थान देण्यासाठी संघांत चुरस पाहायला मिळू शकते.