‘कोडो मिलेट’ खरे कारण की आणखी काही?

मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील दहा मृत हत्तींच्या पोटात शवविच्छेदनादरम्यान ‘कोडो मिलेट’ (एक प्रकारचे भरडधान्य) सापडले. या धान्यामुळेच हत्तींचा मृत्यू झाल्याचा अंदाज मध्य प्रदेशच्या मुख्य वन्यजीव रक्षकांनी वर्तवला आहे, मात्र त्याच वेळी मध्य प्रदेशातील काही वन्यजीव अभ्यासकांनी हत्तीच्या मृत्यूला शिकारीही कारणीभूत असू शकतात, असा संशय व्यक्त केला आहे. काही वन्यजीव अभ्यासकांच्या मते, छत्तीसगडपासून मध्य प्रदेश आणि झारखंडपर्यंतच्या भागातील हत्ती पूर्वीपासूनच कोडो मिलेटचे सेवन करतात. त्यामुळे हे धान्य खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता धूसर आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

बांधवगडमध्ये हत्ती आले कुठून?

मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील १५३६ चौरस किलोमीटर क्षेत्रात बांधवगड राष्ट्रीय उद्यान पसरले आहे. वाघांच्या उच्च घनतेसाठी ते जगभरात प्रसिद्ध आहे. २०१८-१९ मध्ये ओदिशा आणि छत्तीसगडमार्गे सुमारे ४० जंगली हत्तींचा कळप या उद्यानात आला होता. त्यापूर्वी हत्ती मध्य प्रदेशच्या सीमेवर येऊन परत जात. सध्या मध्य प्रदेशात सुमारे १५० हत्ती आहेत आणि त्यापैकी ७० हत्ती बांधवगड राष्ट्रीय उद्यानात आहेत. वाघांची मोठी संख्या आणि बाहेरून आलेले हत्ती यामुळे येथे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. अस्वलांमुळेही संघर्षाच्या अनेक घटना या ठिकाणी घडल्या आहेत. दहा हत्तींच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच हत्तींने तीन जणांना चिरडले. हे हत्ती मृत हत्तींच्या कळपातीलच असल्याचे सांगितले जाते.

who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Donald Trump
विश्लेषण: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची जागतिक समुदायाला धास्ती का वाटते? शांतता, पर्यावरण, आर्थिक मदतीचे मुद्दे बासनात?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
sucide pod controversy
सुसाईड पॉडमध्ये महिलेचा रहस्यमयी मृत्यू? मृत्यूचे कारण आत्महत्या की हत्या? यावरून सुरू झालेला नवा वाद काय?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा >>>विश्लेषण: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची जागतिक समुदायाला धास्ती का वाटते? शांतता, पर्यावरण, आर्थिक मदतीचे मुद्दे बासनात?

हत्ती टास्क फोर्स’ कशासाठी?

बांधवगड आणि इतर वनक्षेत्रांत हत्तींना राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. वनक्षेत्राच्या उत्तम व्यवस्थापनामुळे छत्तीसगड आणि इतर राज्यांतील हत्तींच्या कळपांचा येथे वावर असे. पूर्वी ते आपल्या मूळ अधिवासात परत जात, मात्र आता त्यांनी या क्षेत्राचाच नवा अधिवास म्हणून स्वीकार केल्याचे दिसते. अशा परिस्थितीत हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी शासकीय स्तरावर ‘हत्ती टास्क फोर्स’ तयार करण्याचा निर्णय घेतला जात आहे. कर्नाटक, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने हत्ती आहेत. मध्य प्रदेशचे अधिकारी या राज्यांमध्ये अभ्यासासाठी पाठवले जाणार आहेत. जवळच्या बफर क्षेत्राबाहेरील मैदानी भागातील पिके सौर कुंपण घालून किंवा सौर पॅनेलची लावून संरक्षित केली जातील.

इतर कोणत्या उपाययोजना?

जंगलात एकटे फिरणाऱ्या आणि त्यांच्या समूहापासून वेगळ्या होणाऱ्या हत्तींना ‘रेडिओ ट्रॅकिंग’च्या माध्यमातून शोधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून त्यांचे निरीक्षण केले जाईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी काळजी घेतली जाईल. इतर उपाययोजनांसाठी डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेसह इतरही संस्थांशी विचारविनिमय केला जात आहे. मध्य प्रदेशात हत्तींचा समूह कायमस्वरूपी स्थिरावल्यामुळे सर्वसामान्यांच्या सहकार्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>सुसाईड पॉडमध्ये महिलेचा रहस्यमयी मृत्यू? मृत्यूचे कारण आत्महत्या की हत्या? यावरून सुरू झालेला नवा वाद काय?

हत्तीच्या मृत्यूवरून कोणते राजकारण?

हत्तींच्या मृत्यूनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून काही वनाधिकाऱ्यांना निलंबित केले. मात्र, एकूणच या प्रकरणामुळे मध्य प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. माजी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री व काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि मध्य प्रदेशचे विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी सरकारसह तेथील वनविभागावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला. ‘या दुर्घटनेमुळे बांधवगडमधील हत्तींची संख्या एका झटक्यात दहा टक्क्यांनी कमी झाली आहे. याची सखोल चौकशी करून संरक्षणात्मक उपाय योजले पाहिजेत,’ असे जयराम रमेश म्हणाले. तर उमंग सिंघार यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला गणेशाचे प्रतीक असलेल्या दहा हत्तींचा मृत्यू होणे दु:खद असल्याचे म्हटले. स्थलांतरित हत्तींविषयी वनविभागाने निष्काळजी असल्याची टीका त्यांनी केली.

हत्ती बदला घेतात का?

बांधवगड राष्ट्रीय उद्यानात ज्या दहा हत्तींचा मृत्यू झाला ते १३ हत्तींच्या कळपातील होते. यातील उरलेल्या तीन हत्तींनी गावकऱ्यांना चिरडल्यामुळे त्यांना आता जेरबंद करण्यात आले आहे. याच बांधवगड राष्ट्रीय उद्यानात मृत हत्तीला दफन केले जात असताना इतर हत्ती तिथे पोहोचले होते. हत्ती हा समूहात राहणारा प्राणी असून त्यांची स्मरणशक्ती मजबूत असते. ते बुद्धिमान आणि संवेदनशीलदेखील असतात. समूहातील हत्तीचा मृत्यू झाल्यास ते अस्वस्थ आणि संतप्तदेखील होतात. एकाच वेळी दहा हत्तींच्या मृत्यूमुळे ते विचलित झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Story img Loader