राज्‍यातील ज‍मीन वापराच्‍या आकडेवारीनुसार गेल्‍या दोन दशकांमध्‍ये पिकांखालील निव्‍वळ क्षेत्रात ३० लाख हेक्‍टरने घट झाली आहे, त्‍याविषयी….

जमीन वापराची राज्‍यातील स्थिती काय?

विविध कारणांमुळे शेतकऱ्यांकडे उपलब्‍ध असलेल्‍या शेती क्षेत्रात झपाट्याने घट होत चालली आहे. त्‍यामुळे राज्‍यात अल्‍पभूधारकांचीही संख्‍या वाढत चालली आहे, तर काही भागात भूमिहीन होण्‍याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सन २०२२-२३ च्‍या जमीन वापर आकडेवारीनुसार राज्‍याच्‍या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी पिकांखालील निव्‍वळ क्षेत्र १६४.९० लाख हेक्‍टर (५३.६ टक्‍के) आहे. २००४-०५ च्‍या आकडेवारीनुसार निव्‍वळ पेरणी क्षेत्र १७४.९ लाख हेक्‍टर (५६.८६ टक्‍के) होते. म्‍हणजे गेल्‍या दोन दशकांमध्‍ये पिकांखालील क्षेत्रात तब्‍बल ३० लाख हेक्‍टरने घट झाली आहे. २००४-०५ मध्‍ये राज्‍यात नापीक व मशागतीस अयोग्‍य आणि मशागतयोग्‍य पडीक क्षेत्र ८.५९ टक्‍के, इतर पडीक क्षेत्र ८.२० टक्‍के, गायराने, चराऊ कुरणे व किरकोळ झाडे-झुडुंपाखालील क्षेत्र ४.८८ टक्‍के तर बिगर-शेती वापराखाली आणलेले क्षेत्र ४.५३ टक्‍के होते. २०२२-२३ च्‍या स्थितीनुसार लागवडीसाठी उपलब्‍ध नसलेली जमीन १२ टक्‍के, लागवड न केलेली इतर जमीन ८ टक्‍के, पडीक जमीन ९ टक्‍के इतकी आहे.

independent day2024 Zainab and Buta Singh, tragic love story
Independence day 2024 भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित ‘ही’ प्रेमकथा एवढी लोकप्रिय का?
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Videos of ‘pregnant cars’ go viral in China
चीनमधील ‘प्रेग्नेंट कार’चे Videos व्हायरल; ‘मेड-इन-चायना कार गर्भवती का होत आहेत? नेमकं प्रकरणं काय आहे?
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Bangladesh crisis-Sheikh Hasina
Bangladesh Hindu: बहुसंख्य असलेले हिंदू आज ठरले अल्पसंख्याक; काय आहे बांगलादेशमधील हिंदूंची स्थिती?
Houses in Mumbai are not affordable and their installments are as high as 51 percent compared to monthly income
पुण्यात सर्वाधिक परवडणारी घरे, मुंबईत न परवडणारी घरे..! मासिक उत्पन्नाच्या गृहकर्ज मासिक हप्त्याचे गणित देशभर कसे?
activist manoj jarange slams sharad pawar over maratha reservation
”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”

हेही वाचा >>>Independence Day 2024 जपानवरील विजय म्हणजे काय? त्याचा भारताच्या स्वातंत्र्यदिनाशी काय संबंध?

पिकांखालील जमीन कमी होण्‍याची कारणे?

राज्‍यात सर्वाधिक लोक हे शेती आणि शेतीपूरक व्‍यवसायाशी जोडलेले आहेत. त्‍यामुळे अनेकांच्‍या उदरनिर्वाहाचे साधन शेतीच आहे. मात्र, गेल्‍या काही वर्षांपासून वाढते औद्योगिकीकरण, नवे उद्योग, नवे प्रकल्‍प, रस्‍ते, सिंचन प्रकल्‍प तसेच मानवी वसाहतींसाठी बिगरशेतीकरणाचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. त्‍यामुळे शेती क्षेत्रामध्‍ये घट होत चालली आहे. विभक्‍त कुटुंब पद्धतीत वडिलोपार्जित जमिनीमध्‍ये हिस्‍से पडून शेत जमिनीचे वाटप झाल्‍यानेही शेती विभागली गेली आहे. जमिनीच्‍या छोट्या तुकड्यावर उदरनिर्वाह होत नसल्‍याने अनेक कुटुंबांनी गावाकडील पारंपारिक शेती व्‍यवसाय सोडून अन्‍य व्‍यवसाय किंवा नोकरीसाठी मोठी शहरे गाठली आहेत. त्‍यामुळे शहरातील लोकसंख्‍या वाढली आहे, तर गावे ओस पडू लागली आहेत.

शेती व्‍यवसायातील अडचणी कोणत्‍या?

शेतात मोबदला कमी मिळत असल्याने मजुरांची उणीव, पावसाची अनियमितता, वाढणारी महागाई, त्‍यात बाजारात शेतमालाला योग्‍य दर मिळत नसल्‍याने शेती व्‍यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. दिवसेंदिवस लागवडीखालील क्षेत्र कमी होऊन शेती व्यवसाय हळूहळू कमी होत आहे. जमीन विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याने आणि नव्या पिढीतील सदस्यांची शेती व्यवसायाबद्दल अनास्था निर्माण झाली आहे. अनेक कुटुंबातील सदस्य नोकरी-व्‍यवसायात गुंतल्याने जमिनी पडीक राहण्‍याचे प्रमाण जास्‍त आहे. महागाईमुळे शेतीचा खर्च परवडत नाही. खते, बियाणे, ट्रॅक्टर यांची भाववाढ झाली आहे. शेतीचा खर्च आणि त्‍यातून होणारे उत्‍पन्‍न याचा ताळमेळ जुळत नसल्‍याने अनेक शेतकरी आपल्या जमिनी विकत आहेत.

हेही वाचा >>>‘गरिबांचे कोकेन’ म्हणून ओळखले जाणारे कॅप्टॅगॉन नक्की काय आहे? या गोळ्या चर्चेत येण्याचं कारण काय?

शेतजमीन धारकांची स्थिती काय आहे?

पिकांखालील क्षेत्र कमी होत असतानाच राज्‍यात अल्‍पभूधारक शेतकऱ्यांची संख्‍या वाढत चालली आहे. २०१५-१६ च्‍या कृषी गणनेनुसार महाराष्ट्रातील खातेदार शेतकऱ्यांची संख्‍या १ कोटी ५२ लाख ८५४ इतकी आहे. यातील तब्‍बल १ कोटी २१ लाख ५५ हजार शेतकरी हे अत्‍यल्‍प आणि अल्‍पभूधारक आहेत. १ हेक्‍टरपेक्षा कमी म्‍हणजे अत्‍यल्‍प भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण ५१.१३ टक्‍के, १ ते २ हेक्‍टरपर्यंत अल्‍पभूधारक शेतकऱ्यांचे २८.३८ टक्‍के, २ ते ४ हेक्‍टरपर्यंत अर्ध मध्‍यम भूधारक शेतकऱ्यांचे १५.२२ टक्‍के, ४ ते १० हेक्‍टरपर्यंत मध्‍यम भूधारकांचे ४.८० टक्‍के तर १० हेक्‍टरपेक्षा शेतजमीन असलेल्‍या बहुभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण ०.४५ टक्‍के आहे. २०१५-१६ नंतर कृषी गणना जाहीर झालेली नाही, पण राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (एनएसओ) तसेच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने २०१९ मध्‍ये केलेल्‍या सर्वेक्षणात अल्‍पभूधारक शेतकऱ्यांची संख्‍या वाढल्‍याचेच दिसून आले आहे.

शेती व्‍यवस्‍थेवर परिणाम करणारे घटक?

शेतकऱ्यांच्या जमीन धारण क्षेत्राचे प्रमाण कमी होत असताना भूमिपुत्रांना देशोधडीला लावणाऱ्या समस्येच्या मुळाशी मुख्यतः जमीन तुकडीकरणाची प्रक्रियाच जबाबदार ठरली आहे. शेतकऱ्यांना हवामान बदल आणि सुपीक जमिनीचा कमी होणारा कस यामुळे नेहमीच आव्‍हानांचा सामोरे जावे लागते. नवीन उत्‍पादन तंत्र, आधुनिक अवजारे, बी-बियाणे, कीटकनाशके व जलसिंचन यासारख्‍या बाबींचा योग्‍य वापर करण्‍याइतपत जमीन नसलेल्‍या शेतकऱ्यांची संख्‍या मोठ्या प्रमाणात आहे. उत्‍पादनवाढीच्‍या मर्यादेमुळे शेती आर्थिकदृष्‍ट्या संकटात सापडते, त्‍याचे दूरगामी परिणाम दिसून आले आहेत. नैसर्गिक आणि इतर कारणांमुळे कर्जबाजारीपणा वाढला आहे. अनेक अल्‍पभूधारक शेतकरी भूमिहीन झाले आहेत.

mohan.atalkar@gmail.com