प्रसाद रावकर

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, दिग्गजांच्या सभांनी गाजलेल्या आणि दादरकरांचा (Dadar) मानबिंदू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचा (Shivaji Park) लवकरच कायापालट होणार आहे. मैदानात उडणाऱ्या धुळीमुळे होणाऱ्या त्रासातून रहिवाशांची सुटका करण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वर्षा जल संचयन प्रकल्प (Rain Water harvesting Project) हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असला, तरी मैदानात बांधण्यात येत असलेल्या मातीच्या रस्त्यावरून नवा वाद उभा राहिला आहे. त्यातच मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरून शिवसेना (Shivsena) आणि मनसेमध्ये (MNS) वादाची नवी ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
ST buses
एसटीच्या मार्गात आचारसंहितेचा अडथळा

रहिवासी, पादचाऱ्यांना धुळीचा त्रास

शिवाजी पार्क मैदानात क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी आदी खेळ खेळले जातात. त्याशिवाय मोठ्या संख्येने मल्लखांब आणि जिमनॅस्टिकच्या सरावासाठी मुले-मुली येतात. सकाळी-संध्याकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांचीही वर्दळ असते. वारा, वर्दळ यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळ उडते. या धुळीचा आसपासच्या रहिवाशांना आणि पादचाऱ्यांना त्रास होत असल्याचा तक्रारी सातत्याने येतात. त्यामुळे मैदानातून उडणाऱ्या धुळीवर तोडगा काढावा, अशी मागणी रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत.

धूळमुक्तीचे अयशस्वी प्रयत्न

काही वर्षांपूर्वी मनसेने शिवाजी पार्कवासीयांची धुळीपासून सुटका करण्यासाठी पुढाकार घेतला होता. पालिका दरबारी पाठपुरावा करून मनसेने शिवाजी पार्क मैदानात वर्षा जल संचयन प्रकल्प उभारून मातीवर पाण्याची फवारणी करण्याची व्यवस्था केली होती. त्यासाठी पालिकेच्या तिजोरीतील तब्बल ४० लाख रुपये खर्च झाले. मात्र मैदानाला दररोज लागणारे पुरेसे पाणी या प्रकल्पातून उपलब्ध होऊ शकले नाही. तसेच या प्रकल्पाची देखभालही योग्य पद्धतीने होऊ शकली नाही. अखेर या प्रकल्पाची वाताहात झाली आणि पालिकेचे ४० लाख रुपये पाण्यात गेले.

शिवसेना सरसावली…

आपल्या बालेकिल्ल्यातील मैदानात पुन्हा एकदा व्यापक प्रमाणावर वर्षा जल संयचन प्रकल्प उभारून रहिवाशांना दिलासा देण्यासाठी आता शिवसेना सरसावली आहे. या प्रकल्पांतर्गत मैदानात ३६ कूपनलिका खोदण्यात आल्या. मैदानाला चहुबाजूने उतार देऊन विहिरींमध्ये पावसाचे पाणी साठविण्याची व्यवस्था करण्यात आली. मैदानातील असमतोल भागात माती पसरून भूभाग समतोल करण्यात आला. धुळीचा लवलेशही राहू नये यासाठी मैदानात हिरव्यागार गवताचा गालिचाही तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये अवघे मैदान हिरवेगार होईल आणि कात टाकलेल्या मैदानाचे लोकार्पण होईल.

मैदानावरून राजकीय खेळ

दादर आणि शिवाजी पार्क हा शिवसेना आणि मनसेसाठी अस्मितेचा मुद्दा आहे. शिवाजी पार्कवरील या प्रकल्पाच्या निमित्ताने दादरकरांच्या मनावर आपली छाप उमटविण्याच्या प्रयत्नात शिवसेना-मनसेचे प्रयत्न सुरू आहेत. माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मारक आणि उद्यान गणेश मंदिरादरम्यान मैदानात रस्ता तयार करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या रस्त्याला मनसे आणि काही रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. रस्त्यासाठी डांबर आणि खडीचा वापर करू नये असे त्यांचे म्हणणे आहे.

पालिकेचा दावा

मैदानात खडीचा वापर करून रस्ता बांधणी करण्यात येणार नाही. माती खाली तीन-चार फुटांवर खडीचा थर रचण्यात येत आहे. त्यावर जीओ सिंथेटिक कागद असेल. त्यामुळे पावसाच्या पाण्याने माती वाहून जाणार नाही आणि जलसंचय प्रकल्प यंत्रणेद्वारे पावसाचे पाणी कूपनलिकांना जाऊन मिळेल आणि त्यातील साठ्यात भर पडेल, असा पालिकेचा दावा आहे.

केवळ राजकारण

शिवाजी पार्क मैदानावरून राजकारण रंगू लागले आहे. मनसेने वर्षा जल संचयन प्रकल्प उभारताना शिवसेनेने अप्रत्यक्षपणे विरोध केला होता. आता मनसेही तेच करीत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उभय पक्षांमध्ये मैदानावरून ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.