गौरव मुठे

भांडवली बाजारात बहुप्रतीक्षित अशा आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) समभाग विक्रीकडे भारतासह जगभरातील गुंतवणूदारांचे लक्ष लागले आहे. एलआयसीच्या (LIC) प्रारंभिक समभाग विक्रीच्या यशस्वितेसाठी केंद्र सरकारचे देखील युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारला अजूनही अनेक पातळ्यांवर एलआयसीचा आयपीओ यशस्वी करण्यासाठी झगडावे लागते आहे. लवकरच शेअर बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाल्यावर मार्च महिन्यात एलआयसी प्राथमिक बाजारात धडक देईल. मात्र त्याआधीच बाजारातील काही कंपन्यांच्या शेअरवर एलआयसीच्या आयपीओचे चांगले-वाईट परिणाम दिसू लागले आहेत.

With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…

एलआयसीकडून सर्वाधिक नफावसुली

मुंबई शेअर बाजारात ५,२४९ कंपन्या सूचिबद्ध आहेत, त्यांचे बाजारभांडवल २५५.४ लाख कोटी रुपये आहे. त्यामध्ये एलआयसीचा ३.७ टक्के हिस्सा आहे. म्हणजेच एलआयसीकडे सेन्सेक्समधील टॉपच्या ३० कंपन्यांपैकी २८ कंपन्यांची हिस्सेदारी असून इतरही कंपन्यांमध्ये हिस्सेदारी आहे. त्याचे एकूण मूल्य सुमारे ९.४ लाख कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सर्वाधिक ६.१३ टक्के, त्यापाठोपाठ टीसीएस, इन्फोसिस, स्टेट बँक, आयटीसी, आयसीआयसीआय बँक आणि इतर कंपन्यांमध्ये हिस्सेदारी आहे. एलआयसी भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. २०२० मध्ये शेअर बाजारात मोठी घसरण झाली. त्यावेळी एलआयसीने सर्वाधिक नफावसुली केली. एलआयसीच्या ६५ वर्षांच्या इतिहासात शेअर विक्रीतून सर्वाधिक नफा मिळवला आहे.

एलआयसीच्या आयपीओचा कोणत्या कंपन्यांना फायदा?

इतर विमा कंपन्यांना मात्र एलआयसीचा शेअर बाजारात येण्याचा सर्वाधिक फटका बसला. सुरुवातीला आयुर्विमा क्षेत्रात एलआयसी एकटी कंपनी असल्याने त्या क्षेत्रात एलआयसीची मक्तेदारी होती. मात्र नंतर खासगी क्षेत्रातील कंपन्यांना यात परवानगी मिळल्यानंतर त्यांनी सुमारे ३५ टक्के हिस्सेदारी व्यापली. आता एलआयसी त्याची पुन्हा भरपाई करते आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण एलआयसीचा आयपीओच्या धास्तीने खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. एलआयसीच्या आयपीओचा दृश्य परिणाम आपल्याला इतर कंपन्यांच्या शेअरवर दिसून आला. एक म्हणजे डिपॉझिटरी कंपनी असलेल्या सीडीएसएलवर दिसला आणि मुंबई शेअर बाजार म्हणजेच बीएसईच्या शेअरवर त्याचा परिणाम दिसला. तो असा की, गेल्या काही महिन्यात एलआयसीचा आयपीओ येणार असे ठरल्यानांतर जवळजवळ लाखो नवीन ग्राहक शेअर बाजारात पाऊल ठेवणार आहेत. याचा सीडीएसएलला सर्वाधिक फायदा झाला. सध्या देशात दोनच डिपॉझिटरी आहेत. एक म्हणजे एनएसडीएल आणि दुसरी सीडीएसएल. आता डिपॉझिटरीज् म्हणजे नेमके काय तर आपले शेअर या दोन कंपन्याकडे सुरक्षित असतात. एनएसडीएल या क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. सीडीएसएल दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र एलआयसीच्या आयपीओमुळे असे लाखो लोक ज्यांनी कधीही शेअर बाजारात येण्याचा विचार देखील केला नव्हता ते डिमॅट खाते सुरू करत आहेत. याचाच सर्वाधिक फायदा सीडीएसएलच्या शेअरचा होतोय. त्यामुळे सहा महिन्यात तो शेअर २१.४२ टक्क्यांनी वधारला आहे. याचाच दुसरा परिणाम झालाय तो बीएसईच्या शेअरवर. याची दोन मुख्य करणे आहेत, ती म्हणजे एक तर सीडीएसएलमध्ये सर्वात मोठी भागधारक कंपनी आहे बीएसई. म्हणजेच सीडीएसएलला फायदा म्हणजे अर्थातच बीएसईचा फायदा होणार. दुसरा बीएसईला फायदा म्हणजे लाखो नवीन लोक बाजारात येणार असल्याने बीएसईमधील व्यवहार देखील वाढतील.असा दुहेरी फायदा या कंपन्यांना झाला आहे.

इतर विमा कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण का?

दुसरा एक नकारात्मक परिणाम झाला आहे तो, इतर शेअर बाजारातील आघाडीच्या कंपन्यांच्या शेअरवर आणि विशेषतः शेअर बाजारात सूचिबद्ध म्हणजेच लिस्टेड असलेल्या इतर विमा कंपन्यांच्या शेअरवर. प्रत्येक सूचिबद्ध कंपनीमध्ये कमी-अधिक प्रमाणात प्रवर्तक,परदेशी गुंतवणूकदार, बँक/म्युच्युअल फंड कंपन्या आणि सामान्य गुतंवणूकदार म्हणजेच तुमच्या-आमच्यासारख्या लोकांची हिस्सेदारी असते. आता सामान्य लोक तर एलआयसीच्या आयपीओसाठी नक्कीच अर्ज करणार आहे. मात्र दुसरा एका मोठा गुंतवणूकदार वर्ग आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्यांचा. म्युच्युअल फंड कंपन्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करत असतात, त्यानुसार काही त्यांचे फंडदेखील असतात, म्हणजे उदाहरणार्थ म्युच्युअल फंड कंपन्यांचे विविध प्रकारचे फंड असतात, जसे की, टॉप १०० फंड म्हणजे त्यातील लोकांचा पैसा या शेअर बाजारातील आघाडीच्या १०० कंपन्यांमध्ये गुंतविला जातो किंवा काही थीमॅटीक किंवा सेक्टोरल फंड असतात, ज्यामधील गुंतवणूक फक्त एका क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्येच केली जाते. तेव्हा बहुतांश म्युच्युअल फंड कंपन्यांनी शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ इंश्युरन्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, आयसीआयसीआय लोंबार्ड या विमा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. सध्या चार कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. तर आयिुर्विमा क्षेत्रात २४ कंपन्या कार्यरत आहेत. आयुर्विमा क्षेत्रात एसबीआय लाइफचा ८.७७ टक्के, एचडीएफसी लाइफचा ७.८६ टक्के, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ ४.९१ टक्के, मॅक्स लाइफ २.३६ टक्के आणि बजाज अलियान्झ लाइफचा २.६२ टक्के बाजार हिस्सा आहे. मात्र ‘एलआयसी’ने ६३.३९ टक्के हिश्शासह सर्वाधिक बाजार हिस्सा राखला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली एलआयसी शेअर बाजारात नव्याने पाऊल ठेवणार असल्याने म्युच्युअल फंड कंपन्यांना तिची नक्की दखल घ्यावी लागणार आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांनी शेअर बाजारातील आघाडीच्या कंपन्यांमधून गुंतवणूक कमी करायला सुरुवात केली आहे. विशेषतः इतर विमा कंपन्यांमधील हिस्सेदारी कमी करून म्युच्युअल फंड कंपन्यांनी पैशांची तजवीज सुरू केली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारातील सूचिबद्ध विमा कमान्यांच्या शेअरच्या किमतीवर झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी इतर विमा कंपन्यांच्या शेअरची विक्री सुरू केल्यामुळे त्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. एचडीएफसी लाईफचा शेअर ७५२ रुपये या उच्चांकी पातळीपासून सुमारे १२ टक्क्यांनी खाली येत त्याने ५५१ रुपयांची नीचांकी पातळी गाठली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफच्या शेअरमध्ये उच्चांकी पातळीपासून २२ टक्के, एसबीआय लाईफच्या शेअरमध्ये एका महिन्यात ७ टक्क्यांची तर आयसीआयसीआय लोंबार्डचा शेअर १६७५ या उच्चांकी पातळीपासून सुमारे १३.९२ टक्के खाली आला आहे.

निफ्टी ५० मध्ये समावेश होण्याची शक्यता

शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यावर एलआयसी सर्वाधिक बाजारभांडवल असलेली देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी ठरण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएसनंतर ती तिसरी सर्वात मोठी कंपनी असेल. सर्वाधिक बाजार भांडवल असल्याने कंपनीचा निफ्टी ५० निर्देशांकात देखील लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे. म्हणजेच निर्देशांकामध्ये सर्वाधिक योगदान राखणाऱ्या कंपन्यांमध्ये एलआयसीचा समावेश होणार असल्याने निफ्टी ५० मधील चढ-उतारांमध्ये एलआयसीच्या शेअरमध्ये होणारे चढ-उतार देखील प्रतिबिंबित होतील.