विश्लेषण : 'लाँग कोविड'च्या लक्षणांत कालांतराने होतोय बदल, लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नेमकं काय आहे? | long covid children symptoms changes lancet report know details | Loksatta

विश्लेषण : ‘लाँग कोविड’च्या लक्षणांत कालांतराने होतोय बदल, लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नेमकं काय आहे?

करोना महासाथीचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

विश्लेषण : ‘लाँग कोविड’च्या लक्षणांत कालांतराने होतोय बदल, लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नेमकं काय आहे?
सांकेतिक फोटो

करोना महासाथीमुळे संपूर्ण जग थांबले होते. मात्र सध्या करोना महासाथीचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासाथून नवी आणि आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे. ‘लाँग कोविड’ म्हणजेच दीर्घकालीन कोविडच्या लक्षणांत काळासनुसार बदल होत आहे, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

छोटी मुलं तसेच तरुणांमध्ये लाँग कोविडची लक्षणं कालांतराने बदलू शकतात असे या अभ्यासातून समोर आलेले आहे. या अभ्यासाबाबतचा अहवाल ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ-युरोप’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये ११ ते १७ वयोगटातील मुलांना करोना आणि करोनाच्या लक्षणांबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. पीसीरआर टेस्ट करताना, टेस्ट केल्यानंतर सहा महिने आणि १२ महिने अशा अंतराने सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत हे प्रश्न विचारण्यात आले.

हेही वाचा >>>  विश्लेषण : कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारला अमेरिकेत अटक, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाशी काय आहे संबंध?

संशोधकांनी एकूण ४०८६ मुलांचा अभ्यास केला. यामध्ये एकूण २९०९ मुलांची करोना चाचणी सकारात्मक तर २१७७ जणांची चाचणी नकारात्मक आली होती. अभ्यासकांनी वेगवेगळी २१ लक्षणांची एक यादी केली होती. यापैकी कोणकोणती लक्षणं जाणवली असे या मुलांना तसेच तरुणांना विचारण्यात आले. यामध्ये श्वास घेण्यास अडथळा, थकवा, मानसिक स्वास्थ, थकवा अशा स्वरुपाच्या लक्षणांचा समावेश होता.

अभ्यासातून काय समोर आले?

हेही वाचा >>>  विश्लेषण : काय आहे सिल्व्हर लाईन रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प, केरळमध्ये का होतोय विरोध?

प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार ज्या मुलांची करोना चाचणी सकारात्मक आली होती त्यांना चाचाणीच्या सुरुवातीला, सहा महिने आणि १२ महिन्यानंतरही समान लक्षणं जाणवत होती. अशा मुलांचे प्रमाण १०.९ टक्के होते. तर ज्या मुलांची करोना चाचणी नकारात्मक आलेली होती, त्यांना चाचणीच्या वर्षभरात तिव्ही वेळा समान लक्षणं जाणवण्याचे प्रमाण फक्त १.२ टक्के होते. काही मुलांमध्ये वर्षभराच्या काळात करोनाची लक्षणं बदलल्याचेही या अभ्यासातून समोर आले. तर काही मुलांमध्ये चाचणीच्या सुरुवातीची लक्षणं कमी झाली होती, मात्र त्याऐवजी या मुलांना नवी लक्षणं जाणवत होती.

लाँग कोविड म्हणजे काय?

हेही वाचा >>> विश्लेषण : ४ लाखांत खरेदी ७ हजार कोटींमध्ये विक्री, ‘बिसलरी’ कंपनीचा इतिहास काय? विकण्याचा निर्णय का घेतला?

दरम्यान, लाँग कोविड ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रुग्ण करोनापासून मुक्त झाला तरी त्यात करोनाची लक्षण कायम असतात. ही लक्षणं कालांतराने विकसित होत जातात. करोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर ४ आठवड्यानंतरही शरीरात शक्ती नसणे, भूक न लागणे, वजन न वाढणे, डोकेदुखी असा त्रास होत असेल तर व्यक्तीला लाँग कोविडची लागण झाल्याचे म्हटले जाते. अगोदर लाँग कोविडचा शरीरावर सहा महिन्यांपर्यंत परिणाम कायम असतो असे म्हटले जात होते. मात्र आता लाँग कोविडचे साईडइफेक्ट्स हे १२ महिन्यांपर्यंत राहू शकतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 15:52 IST
Next Story
विश्लेषण: जाळपोळ, डॉक्टरांवर हल्ले ते महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक… ६० लाख सदस्य असलेल्या ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’चा वादग्रस्त इतिहास