World’s Longest Bus Route London to Kolkata: प्रवास हा मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, मग हा प्रवास कुठला का असेना. मग तो बसने केलेला प्रवास असो किंवा विमानाने; त्याचे महत्त्व त्या त्या क्षणांपुरते असतेच. बसचा प्रवास हा अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो, रोजचा प्रवास म्हणा किंवा दूरदेशी जाण्यासाठी बसने केलेला प्रवास असो. परंतु एखाद्या बसने किती लांबचा प्रवास घडू शकतो? फारतर देशांतर्गत किंवा शेजारील देशांपर्यन्त. परंतु जगाच्या इतिहासातील सर्वात लांबचा प्रवास हा भारतातील कलकत्त्यापासून (आताचे कोलकाता) ते लंडन दरम्यानचा आहे.

१९५७ मध्ये सुरू झाली बससेवा

लंडन (इंग्लंड) ते कलकत्ता (भारत) (आता कोलकाता) दरम्यानची बस सेवा जगातील सर्वांत लांबलचक बसमार्ग असेलली सेवा म्हणून ओळखली जात असे. १९५७ मध्ये सुरू झालेल्या या बससेवेचा मार्ग बेल्जियम, युगोस्लाव्हिया आणि वायव्य भारतातून जात असे. या मार्गाला ‘हिप्पी रूट’ असेही म्हटले जात असे. या प्रवासाचे एकमार्गी अंतर १० हजार मैल (१६ हजार किमी) तर परतीसाठी २० हजार ३०० मैल (३२ हजार ७०० किमी) होते. ही सेवा चक्क १९७६ पर्यंत कार्यरत होती.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

अधिक वाचा: Ant Farmers: ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी मानवाने नाही तर ‘या’ कीटकाने केली शेतीला सुरुवात; नवीन संशोधन काय सांगते? 

पहिला प्रवास ५० दिवसांचा

१९५७ साली या एकमार्गी प्रवासाचा खर्च ८५ पाऊंड होता. या रकमेत अन्न, प्रवास आणि निवास यांचा समावेश असे. ही बस सेवा अल्बर्ट ट्रॅव्हलद्वारे चालवली जात असे. पहिला प्रवास १५ एप्रिल १९५७ रोजी लंडनहून सुरू झाला. ही बस सेवा पहिल्यांदा ५ जूनला, म्हणजेच ५० दिवसांनी, कलकत्त्यात पोहोचली. या प्रवासात बस इंग्लंडहून बेल्जियमला गेली, आणि त्यानंतर पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया, युगोस्लाव्हिया, बल्गेरिया, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर-पश्चिम भारतातून भारतात पोहोचली. भारतात प्रवेश केल्यानंतर बस अखेर नवी दिल्ली, आग्रा, इलाहाबाद (प्रयागराज) आणि बनारसमार्गे कलकत्त्यात पोहोचली.

सुविधांनीयुक्त आलिशान लक्झरीटूर

बसमध्ये प्रवाशांसाठी वाचनाची सुविधा होती. प्रत्येक प्रवाशासाठी झोपण्यासाठी वेगळे पलंग, फॅनद्वारे चालणारे हीटर आणि एक स्वयंपाकघर उपलब्ध होते. बसच्या वरच्या मजल्यावर पुढच्या बाजूस एक निरीक्षण कक्ष होता. हा साधा प्रवास नसून एक टूरच होती. बसमध्ये पार्टीसाठी रेडिओ आणि म्युझिक सिस्टिम होती. भारतातील पर्यटन स्थळांवर, जसे की बनारस आणि यमुना काठावरील ताजमहाल येथे वेळ घालण्यासाठी ही बस थांबत असे. तसेच, प्रवाशांना तेहरान, सॉल्झबर्ग, काबूल, इस्तंबूल आणि व्हिएन्ना येथे खरेदी करण्याची परवानगीही दिली जात असे.

व्हायरल फोटो आणि बससेवा

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये लंडनच्या व्हिक्टोरिया कोच स्टेशनवर काही प्रवासी लंडन ते कोलकाता या जगातील सर्वात लांबलचक कोच मार्गाच्या पहिल्या प्रवासासाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो १५ एप्रिल १९५७ साली टिपण्यात आला होता. बसवर लंडन- कलकत्ता- लंडन मार्ग असे लिहिण्यात आले होते. अनेक दशकांपूर्वी कलकत्त्याचे (आताचे कोलकाता) लोक बसने लंडनला गेले आणि परतही आले. १९५० च्या दशकात प्रवाशांना सेवा देण्यासाठी २१ वर्षे वापरण्यात आलेली ऐतिहासिक बस ‘अल्बर्ट’ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतातील हा प्रवास पाच दिवसांचा होता आणि एका तिकिटाची किंमत ८५ पौंड होती. परतीच्या प्रवासाची किंमत ६५ पौंड आहे. आज हेच भाडे एकेरी प्रवासासाठी सुमारे ७,९६३ रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी ६,०८९ रुपये असू शकले असते. (यात चलनवाढ गृहीत धरलेली नाही) भारतातून जाणारा मार्ग दिल्ली, आग्रा, प्रयागराज, बनारस सारख्या शहरांमधून कोलकात्यापर्यंत पोहोचत होता.

अधिक वाचा: Snake Species Named After Leonardo DiCaprio: टायटॅनिकच्या हिरोचं नाव भारतीय सापाला; काय आहे या दोघांमध्ये संबंध?

डबलडेक असलेली आलिशान अल्बर्ट टूर

अल्बर्ट बसमधून प्रवास करताना एखाद्याला लक्झुरीअस प्रवासाचा उत्तम आनंद घेता येत असे. खालच्या डेकमध्ये रीडिंग आणि डायनिंग लाऊंज होते आणि वरच्या डेकमध्ये फॉरवर्ड ऑब्झर्व्हेशन लाऊंज होते. सर्व सोयींनी युक्त स्वयंपाकघर देखील होते. रेडिओ आणि रेकॉर्ड केलेल्या संगीताच्या साह्याने पार्टीची व्यवस्था करण्याची सोय आहे. काही वर्षांनंतर बसचा अपघात झाला आणि ती प्रवासासाठी अयोग्य ठरली. नंतर ब्रिटिश प्रवासी अँडी स्टुअर्ट यांनी ही बस खरेदी केली. त्यांनी या बसला दोन मजली फिरते घर म्हणून परिवर्तित केले. या डबल-डेकर बसला ‘अल्बर्ट’ असे नाव देण्यात आले.

१९७६ साली अखेरची बस सुटली

अल्बर्ट टूर्स ही कंपनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत होती आणि ती लंडन– कलकत्ता– लंडन आणि लंडन– कलकत्ता– सिडनी या मार्गांवर सेवा पुरवत असे. ही बस इराणमार्गे भारतात प्रवेश करत असे आणि नंतर बर्मा, थायलंड आणि मलेशिया मार्गे सिंगापूरला पोहोचत असे. सिंगापूरहून बस जहाजाद्वारे ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे नेली गेली आणि तिथून रस्त्याने सिडनीपर्यंत प्रवास केला. लंडन ते कलकत्ता या प्रवासाचा शुल्क १४५ पौंड होता. या सेवेमध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व आधुनिक सुविधा होत्या. इराणमधील क्रांती आणि पाकिस्तान- भारत दरम्यान वाढलेल्या तणावांमुळे राजकीय परिस्थितीमुळे १९७६ साली ही सेवा बंद करण्यात आली. सेवा बंद होण्यापूर्वी अल्बर्ट टूर्सने कोलकाता ते लंडन आणि लंडन ते सिडनी असे सुमारे १५ प्रवास पूर्ण केले.

Story img Loader