भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून तणाव वाढत आहे. नूपूर शर्मावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. नुकतेच नुपूर शर्मांनाही सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. आता नुपूर शर्मांविरुद्ध कोलकाता येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांनी भाजपच्या माजी प्रवक्त्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. अनेकवेळा समन्स बजावूनही नुपूर अधिकाऱ्यांसमोर हजर झाल्या नाहीत. यानंतर नुपूर शर्माविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. लुक आउट नोटीस म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? आणि आता काय होऊ शकते ते घ्या जाणून.

लुक आउट नोटीस म्हणजे काय
एलओसी (LOC) म्हणजेच लुकआउट सर्कुलरला लुकआउट नोटीस असेही म्हणतात. फौजदारी खटल्यात नाव असलेली व्यक्ती देश सोडून पळून जाऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी जारी केलेले हे परिपत्रक आहे. ही नोटीस जारी केल्यानंतर गुन्हेगाराला देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

लुक आऊट नोटीस कधी जारी केली जाते?
एलओसी तेव्हा जारी केली जाते जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या एखाद्या विशिष्ट प्रकरणात फरार असते आणि ती व्यक्ती देश सोडून पळून जाण्याची भीती असते. इतर काही प्रकरणांमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या देशाबाहेरील हालचालींवर निर्बंध घालण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे जाऊ शकतात. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या प्रकरणात संशयित किंवा दोषी असते आणि अधिकारी तपास प्रक्रियेत सहकार्य करणार नाहीत अशी भीती असते तेव्हा पोलीस हे करतात.

काय होऊ शकते कारवाई?
एलओसी अंतर्गत अनेक कारवाई केल्या जाऊ शकतात. कोणाच्या विरोधात एलओसी जारी करण्यात आला आहे आणि कोण देश सोडून जात आहे याची माहिती सरकारला दिली जाऊ शकते. अधिकारी त्यांची प्रवासाची कागदपत्रे जप्त करून एजन्सीला पाठवू शकतात. दोषी व्यक्तीच्या देशात प्रवेश केल्यावर तपास यंत्रणांना माहिती देणे.

कोण लुकआउट नोटीस देऊ शकतो
अनेक प्रकारचे अधिकारी आणि एजन्सींना लुक नोटीस जारी करण्याचे अधिकार आहेत. तो जारी करणारे प्राधिकरण उपसचिव पदाच्या खाली नसावे हे निश्चित. तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांच्या विविध अधिकाऱ्यांना लुकआउट नोटीस जारी करण्याचा अधिकार आहे. यात डीएम, पोलिस अधीक्षक आणि इंटरपोलचे अधिकारीही सहभागी आहेत.

आरोपी काय करु शकतो?
ज्या व्यक्तीच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे ती व्यक्ती ती जारी करणाऱ्या एजन्सीविरुद्ध न्यायालयात अर्ज दाखल करू शकते. ही नोटीस विनाकारण बजावण्यात आली आहे, असे न्यायालयाला वाटत असेल, तर ती नोटीस रद्दही होऊ शकते.

लुकआउट नोटीसनंतर अटक होते का?
या नोटीसनंतर आरोपींना अटक व्हायलाच हवी असे नाही. एलओसीचे अनेक प्रकार आहेत. अनेकदा हे केवळ आरोपींना देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी असते. याशिवाय स्थानिक पोलीस आरोपीला ताब्यातही घेऊ शकतात आणि अनेक प्रकरणांमध्ये अटकही होऊ शकते.