Maha Kumbh Mela 2025: प्रयागराजमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. सर्वत्र धुकं पसरलंय आणि पावसाची शक्यता देखील आहे. तरीही, आज (सोमवारी, १३ जानेवारी) लाखो लोक शहरात दाखल झाले आहे आणि पहाटेच्या अंधाऱ्या आकाशाखाली गंगेच्या पाण्यात त्यांनी स्नान केलं आहे. या वेळेस प्रयागराज महाकुंभ किंवा १२ वर्षांनी येणारं पूर्णकुंभाचे पर्व आहे. कुंभमेळ्याभोवती अनेक पुराणकथा व मिथकं प्रचलित आहेत. तसेच, त्याच्या नेमक्या उगमाबद्दल अनेक मतंमतांतरं आहेत. काहीजण मानतात की, या उत्सवाचा उल्लेख वेद आणि पुराणांमध्ये सापडतो. तर काहींच्या मते, हा सण केवळ दोन शतकांपूर्वीचा आहे. काहीही असलं तरी हा उत्सव पृथ्वीवरील भक्तांचा सर्वात मोठा मेळावा आहे,यात शंका नाही. त्याच निमित्ताने कुंभ मेळा म्हणजे काय? आणि तो विशिष्ट चार शहरांमध्ये ठराविक कालावधीत का साजरा केला जातो? अर्धकुंभ आणि महाकुंभ म्हणजे काय? या सणाचा उगम काय आहे आणि लाखो लोक यात सहभागी का होतात? हे जाणून घेणं समायोचित ठरावं. हिंदू धर्मातील अनेक प्रश्नांप्रमाणे या प्रश्नांची उत्तरं पुराणकथा, इतिहास आणि प्राचीन लोकांच्या अविरत श्रद्धेच्या मिश्रणात सापडतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा