पॉलिमर जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार मानवी दुधात प्लास्टिकचे कण आढळले आहेत. या नव्या माहितीमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. आईच्या दुधात जर प्लास्टिकचे कण आढळत असतील तर आगाी नवजात बालकांसाठी तसेच आगामी पिढ्यांसाठी हे धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेला हा अभ्यास काय आहे? यावर एक नजर टाकुया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विश्लेषण : गुजरातमधील मोढेरा बनणार सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं गाव; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

जर्नल पॉलिमर एक अभ्यास अहवाल प्रसारित केला आहे. या अहवालानुसार मानवी दुधात ५ मिलिमिटरपेक्षा कमी आकाराचे मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत. हा अभ्यास करण्यासाठी रोममधील एकूण ३४ निरोगी मातांकडून दुधाचे नमुने घेण्यात आले होते. या अभ्यासात आईच्या दुधामध्ये मायक्रोप्लास्टिक असल्याचे आढळले आहे. ही एक चिंतेची बाब असून त्याचा नवजात बालकांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे या अभ्यासात म्हणण्यात आले आहे. ३४ नमुन्यांपैकी एकूण २६ नमुन्यात हे मायक्रोप्लास्टिक आढळले. या मायक्रोप्लास्टिकचा रंग, आकार, रासायनिक रचना याआधारे वर्गीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना ‘त्रिशूळ’ हे पक्षचिन्ह का मिळालं नाही?

संशोधकांना मानवी दुधात पॉलिथीन, पीव्हीसी, पॉलीप्रोपायलीन असे प्लास्टिकचे नमुने आढळले आहेत. प्लास्टिकचे हे सर्व प्रकार पॅकेजिंगसाठी वापरले जातात. या अभ्यासात संशोधक २ मायक्रॉनपेक्षा कमी आकार असलेल्या प्लास्टिकचा शोध घेऊ शकले नाहीत. मात्र २ मायक्रॉनपेक्षा कमी आकार असलेले प्लास्टिकचे कणही आईच्या दुधात असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: चोरीला गेलेला मोबाईल कसा शोधाल? इंटरनेटची गरज नाही; सॅमसंगचे ३ स्मार्ट फीचर्स जाणून घ्या

मायक्रोप्लास्टिक मानवाला किती हानिकारक?

समुद्रापासून ते आपण श्वास घेतलेल्या हवेपर्यंत मायक्रोप्लास्टिकचे अस्तित्व आढळते. त्यांचा आकार आणि वजन अत्यंत कमी असल्यामुळे हवेच्या माध्यमातून ते जवळजवळ प्रत्येक ठिकाणी प्रवास करू शकतात. एवढंच नाही तर मानवी वस्ती नसलेल्या पर्वतीय तसेच ध्रुवीय प्रदेशातही मायक्रोप्लास्टिकचे कण आढळतात. मायक्रोप्लासिकचे कण दूषित हवा, अन्न, पाणी यांच्या माध्यमातून मानवी शरीरात प्रवेश करतात. एका अभ्यासानुसार आपण सेवन करत असलेल्या अन्नाच्या माध्यमातून दरवर्षी साधारण ५२ हजार मायक्रोप्लास्टिकचे कण आपल्या शरीरात जातात. मायक्रोप्लास्टिकमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो.

हेही वाचा >>> विश्लेषण: सौरव गांगुलीच्या पत्नीला चिकनगुनियाची लागण; डासांमुळे होणारा हा आजार कसा टाळाल?

याआधीही मानवी शरीरात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळलेले आहेत. या वर्षी मार्च महिन्यात एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनल जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता. या अभ्यासासाठी एकूण २२ स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. संशोधकांना एकूण नमुन्यांपैकी ८० टक्के नमुन्यांत मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘सरोगेट’ जाहिरात हा काय प्रकार?

दरम्यान, नेदरलँड्समधील व्रिजे युनिव्हर्सिटी अॅमस्टरडॅमधील प्राध्यापक डिक वेथाक यांनी मायक्रोप्लास्टिकचे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर अधिक माहिती दिली आहे. शरीरात मायक्रोप्लास्टिकचे कण सापडणे म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. नॅनोप्लास्टिकचे कण त्यापेक्षा हानिकारक असू शकतात, असे डिक वेथाक म्हणाले आहेत. तर दुसरीकडे नोटारस्टेफानो यांनी ताज्या अभ्यासात आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले असले तरी स्तनपान बंद करू नये, असा सल्ला दिला आहे. आईच्या दुधामुळे बाळाला होणारा फायदा दुधात मायक्रोप्लास्टिक असल्याने होणाऱ्या हानीपेक्षा अधिक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. स्तनपान कमी करू नये तर प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करावी, असेही त्या म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microplastic particles found in human breast milk know detail about new study prd
First published on: 12-10-2022 at 08:55 IST