Analyze the critical role of Military Artificial Intelligence in reshaping the India China Pakistan AI War dynamics: रशिया-युक्रेन संघर्षानंतर जागतिक संरक्षण क्षेत्रात ‘अल्गोरिदम युद्ध’ (Algorithmic Warfare) आता वास्तवात घडते आहे. अशा काळात भारतासमोर चीनची झपाट्याने वाढणारी लष्करी कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षमता आणि पाकिस्तानचे ड्रोन स्वॉर्म्स यांचे मोठे आव्हान असून, देशाच्या सुरक्षेसाठी आता AI मधील संशोधन आणि वेगवान विकास ही एक अनिवार्य गरज ठरली आहे. अशा परिस्थितीत भारतासमोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे या बदलच्या युद्धासाठी आपण किती तयार आहोत?

राष्ट्रीय सुरक्षेसाठी AI

भारताची भौगोलिक स्थिती इतर अनेक देशांपेक्षा अधिक गुंतागुंतीची आहे. एका बाजूला अत्याधुनिक तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करणारा चीन, तर दुसऱ्या बाजूला ड्रोन आणि क्षेपणास्त्र क्षमतांमध्ये सातत्याने वाढ करणारा पाकिस्तान. अशा दुहेरी आव्हानांमुळे भारतीय लष्करासाठी AI ही आता केवळ तंत्रज्ञानाची गोष्ट न राहाता राष्ट्रीय सुरक्षेची गरज ठरली आहे.

चीनची झपाट्याने वाढणारी AI लष्करी क्षमता

चीनने २०१७ मध्ये जाहीर केलेल्या New Generation Artificial Intelligence Development Plan नंतर AI ला राष्ट्रीय धोरणाचा महत्त्वाचा भाग करण्यात आले. त्यानंतर पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने ‘Intelligentized Warfare’ ही संकल्पना पुढे आणली. युद्धातील प्रत्येक स्तरावर माहिती गोळा करणे, निर्णय घेणे, ड्रोन स्वॉर्म, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि सायबर हल्ले या सर्व बाबींसाठी आता AI चा वापर करण्यात येईल. चीनने स्वीकारलेला हा सर्वात मोठा धोरणात्मक बदल होता.

Military Artificial Intelligence technology used in India China Pakistan AI War readiness | Indian army testing high tech Military Artificial Intelligence systems against drone swarms | लष्करी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून भारत चीन पाकिस्तान AI युद्ध रणनीतीची तयारी | भारतीय लष्कराची Military Artificial Intelligence आणि काउंटर ड्रोन यंत्रणा
लष्करी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारत चीन पाकिस्तान AI युद्ध (Image- Gemini)

शत्रूला चीतपट करण्यासाठी…

चीन मोठ्या प्रमाणावर स्वायत्त ड्रोन, मानवरहित नौका (Unmanned Surface Vessels), AI-आधारित उपग्रह विश्लेषण आणि युद्धक्षेत्रातील निर्णय प्रणाली विकसित करत आहे. अनेक संरक्षण विश्लेषकांच्या मते, भविष्यात चीनचा उद्देश युद्धाशी संबंधित सर्व निर्णय अतिशय वेगात घेऊन शत्रूला चीतपट (Decision Advantage) करणे हा आहे.

पाकिस्तानचे बदलते स्वरूप

पाकिस्तानकडे चीनसारखी AI इकोसिस्टम नसली, तरी गेल्या काही वर्षांत त्याने चीन आणि तुर्कीयेकडून मिळालेल्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. नियंत्रण रेषेवर (LoC) ड्रोनद्वारे शस्त्रे, अमली पदार्थ आणि दारूगोळा पोहोचवण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या काळात पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागामध्ये चढवलेल्या हल्ल्यांसाठी चिनी आणि तुर्कीयेच्या ड्रोन्सचा वापर करण्यात आला होता. भविष्यात पाकिस्तानकडून AI-सक्षम ड्रोन, स्वस्त लॉइटरिंग म्युनिशन्स (Loitering Munitions) आणि सायबर हल्ल्यांचा अधिक वापर होवू शकतो. त्यामुळे भारतासाठी पारंपरिक हवाई संरक्षणाबरोबर Counter-Drone AI Systems विकसित करणे अत्यावश्यक आहे.

भारताची तयारी कुठपर्यंत?

भारताने गेल्या काही वर्षांत AI क्षेत्रात पुढील महत्त्वाची पावले उचलली आहेत.

१. DRDO चे AI संशोधन

Defence Research and Development Organisation (DRDO) ने AI, मशीन लर्निंग, स्वायत्त रोबोटिक्स आणि मानवरहीत प्रणालींवर संशोधन सुरू केले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत DAIC (Defence AI Council) आणि DAIO (Defence AI Organisation) यांची स्थापना करण्यात आली आहे.

२. iDEX – स्टार्टअप्सची ताकद

Innovations for Defence Excellence (iDEX) या उपक्रमातून भारतीय स्टार्टअप्सना AI, ड्रोन, स्वॉर्म तंत्रज्ञान, कॉम्प्युटर व्हिजन आणि इलेक्ट्रॉनिक युद्धासाठी नवीन साधने विकसित करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. सध्या अनेक भारतीय स्टार्टअप्स लष्करासाठी AI-आधारित ड्रोन, सीमेवरील टेहळणीसाठी इलेक्ट्रॉनिक प्रणाली, स्वायत्त वाहन आणि शत्रूच्या लक्ष्यनिश्चितीसाठी विविध यंत्रणा विकसित करत आहेत.

३. AI मिशन आणि डिजिटल पायाभूत सुविधा

भारताचे IndiaAI Mission आणि सेमीकंडक्टर उत्पादनावरील भर यामुळे भविष्यात संरक्षण क्षेत्रालाही फायदा होणार आहे. AI विकसित करण्यासाठी संगणकीय क्षमता, डेटा आणि चिप्स हे तीन महत्त्वाचे घटक आहेत. या तिन्ही क्षेत्रांत भारत क्षमता वाढवण्याचा प्रयत्नात आहे.

भारतासमोरील तीन मोठी आव्हाने

  • १. डेटा – AI ची गुणवत्ता डेटावर अवलंबून असते. विविध भौगोलिक परिस्थितीतील उच्च दर्जाचा लष्करी डेटा मोठ्या प्रमाणात तयार करणे भारतासाठी अत्यावश्यक बाब आहे.
  • २. सेमीकंडक्टर- AI प्रणालींसाठी आवश्यक असलेल्या उच्च क्षमतेच्या चिप्समध्ये भारत अद्यापही आयातीवरच अवलंबून आहे. युद्धकाळात पुरवठा खंडित झाल्यास ही मोठीच अडचण ठरू शकते.
  • ३. प्रशिक्षित मनुष्यबळ- AI अभियंते, डेटा सायंटिस्ट आणि संरक्षण तज्ज्ञ यांच्यातील समन्वय वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात जवानांबरोबरच AI अभियंता देखील राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे असतील.
AI warfare 5 major definitions
AI युद्धातील पाच महत्त्वाच्या संज्ञा

Algorithmic Warfare म्हणजे काय?

सध्याच्या युद्धात सर्वात मौल्यवान बाब म्हणजे वेळ. पूर्वी एखादे लक्ष्य शोधणे, त्याची खातरजमा करणे आणि हल्ल्याचा आदेश देण्यासाठी अनेक मिनिटांचा वेळ लागत असे. AI मुळे ही प्रक्रिया अवघ्या काही सेकंदांत पूर्ण होते. यालाच संरक्षण क्षेत्रात Algorithmic Warfare असे म्हटले जाते. म्हणजेच, भविष्यात विजय फक्त अधिक शक्तिशाली शस्त्रांचा नसेल; तर ज्याचे अल्गोरिदम अधिक वेगवान, अधिक अचूक आणि अधिक सुरक्षित असतील तो देश आघाडीवर असेल.

युद्धातील नैतिक पेच

AI मुळे युद्ध अधिक अचूक होईल, असे सामरिक तज्ज्ञांच्या एका गटाला वाटते. परंतु याचबरोबर अनेक प्रश्नही निर्माण होतात.

  • चुकीची लक्ष्यनिश्चिती झाल्यास जबाबदार कोण?
  • AI प्रणाली हॅक झाली तर काय?
  • स्वायत्त शस्त्रांनी नागरी लक्ष्यांवर (नागरिकांची वस्ती) हल्ला केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
  • युद्धातील मानवी नियंत्रण कमी झाले तर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे काय?

संयुक्त राष्ट्रसंघात Lethal Autonomous Weapons Systems (LAWS) संदर्भातील चर्चा अजूनही सुरू आहे. अंतिम निर्णय मानवाकडेच असावा, यावर अनेक देशांचा आग्रह आहे.

भारतासाठी पुढची दिशा काय?

भारताने पुढील दशकात पुढील चार क्षेत्रांवर विशेष भर देणे आवश्यक आहे.

  • AI- क्षमता वाढ म्हणजेच ISR (Intelligence, Surveillance and Reconnaissance)
  • Counter-Drone आणि Anti-Swarm संरक्षण
  • स्वदेशी AI चिप्स आणि उच्च कार्यक्षम संगणक (HPC)
  • संरक्षण मंत्रालय, उद्योग आणि स्टार्टअप्स यांच्यातील सहकार्य

जवानासोबत असतील अल्गोरिदम्स

औद्योगिक क्रांतीने तोफा बदलल्या. अणुयुगाने युद्धाचे संतुलन बदलले. आता कृत्रिम बुद्धिमत्ता युद्धाचा अर्थच बदलत आहे. भविष्यात युद्धभूमीवर उभा असलेला जवान एकटा लढणार नाही. त्याच्यासोबत हजारो सेन्सर्स, उपग्रह, स्वायत्त ड्रोन्स आणि लाखो डेटा पॉइंट्सवर काम करणारे अल्गोरिदम असतील. युद्धातील विजय हा केवळ जवानांच्या शौर्यावर अवलंबून असणार नाही; तर तो माहिती, संगणकीय क्षमता आणि निर्णय घेण्याच्या वेगावरही ठरेल. रशिया-युक्रेन युद्ध हा काही फक्त दोन देशांमधील संघर्ष नाही. तर तो जगाला मिळालेला एक गंभीर इशाराच आहे. युद्धाचे भविष्य कृत्रिम बुद्धिमत्तेच्या हातात वेगाने सरकत आहे. प्रश्न एवढाच आहे की, भारत त्या भविष्यातील युद्धासाठी वेळीच तयार असेल का?

संदर्भसूची

  • Ministry of Defence, Government of India – Artificial Intelligence in Defence
  • DRDO – AI, Robotics and Autonomous Systems Initiatives
  • Innovations for Defence Excellence (iDEX)
  • IndiaAI Mission – Ministry of Electronics & IT
  • NATO Review – Artificial Intelligence and the Future of Warfare
  • NATO Allied Command Transformation – AI Strategy
  • CSIS – Artificial Intelligence and Future Military Competition
  • RAND Corporation – Artificial Intelligence for National Security
  • Center for a New American Security (CNAS) – Battlefield AI
  • China State Council – New Generation Artificial Intelligence Development Plan (2017)
  • Elsa B. Kania – Battlefield Singularity: Artificial Intelligence, Military Revolution and China’s Future Military Power (CNAS)
  • Reuters – Ukraine’s AI-enabled battlefield reports (2024–2026)
  • Royal United Services Institute (RUSI) – The Russian–Ukrainian War: Lessons Learned
  • CSIS – Drone Warfare in Ukraine
  • United Nations Office for Disarmament Affairs – Lethal Autonomous Weapons Systems (LAWS)