मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)ने भारतीय वंशाच्या पीएचडी विद्यार्थ्याला आपल्या कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केले आहे. प्रल्हाद अय्यंगार इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान विभागातील पीएचडीचे विद्यार्थी आहेत. त्यांना जानेवारी २०२६ पर्यंत विद्यापीठातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी गेल्या महिन्यात एका महाविद्यालयीन मासिकासाठी लिहिलेल्या लेखानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आणि त्यांना निलंबित करण्यात आले. या निर्णयाचा विद्यापीठातील विद्यार्थी तीव्र विरोध करताना दिसत आहेत. परंतु, हे नेमके प्रकरण काय? प्रल्हाद अय्यंगार कोण आहेत? निबंधावरून अटक करण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

कोण आहेत प्रल्हाद अय्यंगार?

अय्यंगार हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स विभागाचे पीएचडी स्कॉलर आहेत. ते नॅशनल सायन्स फाऊंडेशन ग्रॅज्युएट रिसर्च फेलोशिपचे प्राप्तकर्ता होते, मात्र आता ही फेलोशिप संस्थेतून निलंबनानंतर संपुष्टात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, पॅलेस्टाईन समर्थक निबंधामुळे त्यांना एमआयटीमधून निलंबित करण्यात आले. एमआयटीने बंदी घातलेल्या स्टुडंट जर्नल ‘रिव्होल्युशन’च्या ऑक्टोबरच्या अंकात प्रकाशित झालेल्या ‘ऑन पॅसिफिझम’ या निबंधानंतर हे निलंबन करण्यात आले आहे. प्रशासनाने असा दावा केला आहे की, निबंधात अशा भाषेचा वापर झाला आहे आणि अशा काही प्रतिमा आहेत, ज्यामध्ये पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन (पीएफएलपी)च्या संदर्भांचा समावेश आहे. याचा अर्थ, यामुळे हिंसक निषेध केला जाऊ शकतो. यूएस स्टेट डिपार्टमेंटने पीएफएलपीला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

mumbai university Late Hall Ticket for m a m com and m sc students caused chaos at exam centers
‘आयडॉल’च्या परीक्षा प्रवेशपत्रावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Foreign Education Concepts Misconceptions Idea of ​​Education Career news
जावे दिगंतरा: परदेशी शिक्षण : समजगैरसमज
Prajna pathshala mandal vai Higher Education in Kashi
तर्कतीर्थ विचार: काशीतील उच्चशिक्षण
Farmers climate smart friend Open source augmented reality headset
मुलाखतींच्या मुलाखत: शेतकऱ्यांचा ‘क्लायमेट स्मार्ट’ मित्र
graduates Phd Mumbai University, Mumbai University,
मुंबई विद्यापीठातून यंदा ४०१ स्नातकांना पी.एचडी, मुंबई विद्यापीठाचा मंगळवारी पदवी प्रदान सोहळा
Why is the establishment of the Higher Education Commission delayed print exp
उच्च शिक्षण आयोगाचे काय झाले? स्थापनेस विलंब का?
Teacher arrested, Mumbai, Teacher indecent act with girl , POCSO , Sexual harassment ,
मुंबई : विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक, आरोपीविरोधात विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा
अय्यंगार हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स विभागाचे पीएचडी स्कॉलर आहेत. (छायाचित्र-एक्स/@Iamthestory)

हेही वाचा : ‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?

‘रिव्होल्युशन’ हे पॅलेस्टाईन समर्थक चळवळीवर लक्ष केंद्रित करणारे बहुविद्याशाखीय विद्यार्थी प्रकाशन आहे, ज्यांनी अय्यंगार यांचा निबंध प्रकाशित केला. या मासिकावर आता एमआयटीने बंदी घातली आहे. एमआयटीचे स्टुडंट लाइफचे डीन डेव्हिड रँडल यांनी एका पत्रात प्रकाशनावरील बंदी जाहीर करताना लिहिले, “तुम्हाला एमआयटीच्या कॅम्पसमध्ये ‘रिव्होल्युशन’चा हा अंक यापुढे वितरित करू नये असे निर्देश दिले आहेत. तुम्हाला एमआयटीचे किंवा कोणत्याही एमआयटी मान्यताप्राप्त संस्थेचे नाव वापरून ते इतरत्र वितरित करण्यासदेखील मनाई आहे.” उल्लेखनीय म्हणजे, अय्यंगार यांनी अमेरिकन कॅम्पसमध्ये भाषण स्वातंत्र्याच्या दडपशाहीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी संपूर्ण विद्यापीठात झालेल्या पॅलेस्टिनी समर्थक निषेधाशी संबंधित अशाच कारवाईनंतर एमआयटीमधून निलंबनाची ही दुसरी घटना आहे. त्याचे वकील एरिक ली यांनी ‘एक्स’वर शेअर केलेल्या निवेदनात अय्यंगार म्हणाले, “प्रशासन माझ्यावर ‘दहशतवादाला’ पाठिंबा देत असल्याचा आरोप करत आहे, कारण माझा लेख ज्या आवृत्तीत दिसतो, त्यात पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशनच्या पोस्टर्सच्या प्रतिमा आणि हिंसक प्रतिमांचा समावेश आहे.”

‘द कम्युन मॅगझिन’च्या मते, अय्यंगार यांनी आपल्या निबंधात असा युक्तिवाद केला की, पॅलेस्टाईनसाठी शांततावादी रणनीती सर्वात प्रभावी दृष्टिकोन असू शकत नाही, मात्र त्यांनी हिंसक प्रतिकाराचे स्पष्टपणे समर्थन करण्याचे टाळले. त्यांनी आपल्या निलंबनाचे वर्णन ‘असामान्य कारवाई” असे केले. एका निवेदनात ते म्हणाले, “या लेखाचा परिणाम म्हणून मला बाहेर काढणे आणि ‘रिव्होल्युशन’वर बंदी घालणे हे संपूर्ण विद्यार्थी संघटना आणि प्राध्यापकांच्या हक्कांवर हल्ला आहे. एमआयटीने स्थापित केलेल्या उदाहरणाचा विचार करावा.” ते पुढे म्हणाले, “देशभरात, गाझामधील नरसंहाराला विरोध करणाऱ्यांचे भाषणस्वातंत्र्य दडपण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाद्वारे प्रयत्न केले जात आहेत. ते पुढे म्हणाले, ” मी एमआयटीमधील सर्व विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकांना सांगू इच्छितो की, आपल्या भाषणस्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवण्याची परवानगी प्रशासनाला देऊ नका. विद्यार्थ्यांनी चालवल्या जाणाऱ्या प्रकाशनांवर सेन्सॉर करा,” असे ते पुढे म्हणाले.

एमआयटीच्या निर्णयाचा निषेध

संस्थेतील आपल्या शैक्षणिक कारकिर्दीचे रक्षण करण्यासाठी म्हणून अय्यंगार या आठवड्यात कुलपतींकडे एमआयटीच्या निर्णयाविरोधात अपील करत आहेत. एमआयटीमध्ये कृतींविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. ‘एक्स’वरील एका निवेदनात निषेध करणाऱ्या गटाने लिहिले, “पॅलेस्टाईन समर्थक चळवळीबद्दलच्या लेखामुळे प्रल्हाद यांच्या निलंबनाचा विरोध केल्यानंतर एमआयटीने अशाच आणखी एका प्रकरणात त्यांचे नाव जोडले. त्यांच्या भाषण स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याबद्दल सार्वजनिक टीका झाल्यानंतर अचानक प्रकरण दोन भागात विभागले गेले.” ते पुढे म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांचे गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी एमआयटी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. आम्ही सर्व संस्थांना एमआयटीच्या दडपशाहीविरोधात उभे राहण्याचे आवाहन करतो.”

एमआयटी ग्रॅज्युएट स्टुडंट युनियनचे अध्यक्ष सोफी कॉपीटर्स टी वॉलेंट यांनी विद्यापीठाच्या कृतीवर टीका केली आहे. ‘द बोस्टन ग्लोब’च्या म्हणण्यानुसार, “विद्यार्थी जे बोलत आहेत आणि विरोध करत आहेत त्याच्याशी मी सहमत नाही. एमआयटी विद्यार्थ्यांची उपजीविका आणि करिअर धोक्यात आणण्याचे निवडत आहे, हे तथ्य अस्वीकार्य आहे,” असे वॉलेंट म्हणाले. ९ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या एका गटाने केंब्रिज सिटी हिल येथे अय्यंगार यांच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन केले होते.

हेही वाचा : सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या?

अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या वादाला उत्तर देताना अय्यंगार यांना पाठिंबा दर्शवला. एका वापरकर्त्याने लिहिले, “म्हणून एमआयटी ही मुळात लॉकहीड मार्टिन लॅब आहे आणि जो कोणी या व्यवस्थेला विरोध करतो त्याला बाहेर काढले जाते.” आणखी एका वापरकर्त्याने पोस्ट केले, “हे खूप अन्यायकारक आहे. त्याला लवकरात लवकर विद्यापीठात परत घेतले पाहिजे.” मात्र, काही वापरकर्त्यांनी त्यांच्यावर टीकाही केली. काही वापरकर्त्यांनी त्यांच्या विचारसरणीचा निषेध केला आणि त्यांना निलंबित करण्याच्या एमआयटीच्या निर्णयाची बाजू घेतली. एका वापरकर्त्याने लिहिले की, भारतीय वंशाचा विद्यार्थी, मुस्लिमांद्वारे सर्वाधिक अत्याचार झालेल्या जातीचा आणि हमास या दहशतवादी संघटनेची वकिली करत आहे.” एकाने लिहिले, “त्याला हाकलून दिले पाहिजे. सुसंस्कृत समाजात दहशतवादाला स्थान नाही. तो गाझा किंवा सीरियाला जाण्यास मोकळा आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ” कृपया त्याला अटक करा आणि तुरुंगात टाका, गुड जॉब एमआयटी!”

Story img Loader