'नेकेड रेझिग्नेशन' हा ट्रेंड चीनमधून आता संपूर्ण जगभरात पसरत आहे. चीनमध्ये ९, ९, ६ अशी कामाची पद्धत आहे. मात्र, चिनी नोकरदारवर्ग या पद्धतीला विरोध करीत आहे. 'बिझनेस इनसायडर'च्या माहितीनुसार चीनमधील तरुणांमध्ये 'नेकेड रेझिग्नेशन' देण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. हा ट्रेंड आठवड्यातून सहा दिवस सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत काम करण्याच्या विरोधात सुरू करण्यात आला आहे. काय आहे हा ट्रेंड? याला 'नेकेड रेझिग्नेशन' असेच नाव का देण्यात आले? तरुण मोठ्या संख्येने नोकर्या का सोडत आहेत? याचा काय परिणाम होणार? याविषयी सविस्तर जाणून घेऊ. 'नेकेड रेझिग्नेशन'चा वाढता ट्रेंड 'एनडीटीव्ही'नुसार, 'नेकेड रेझिग्नेशन' हा चीनमधील कामाच्या ठिकाणी सुरू झालेला नवीन ट्रेंड आहे. नोकरी करणारे तरुण कुठल्याही बॅकअपशिवाय म्हणजेच कुठली दुसरी नोकरी हातात असल्याशिवाय नोकरीचा राजीनामा देत आहेत. त्यामुळेच याला 'नेकेड रेझिग्नेशन' असे नाव देण्यात आले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुणांमध्ये वाढत चाललेला ताण या ट्रेंडद्वारे स्पष्ट दिसून येतो. चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेबो, ट्विटर व झिआनहाँगश्यूवर हा ट्रेंड अधिक लोकप्रिय ठरत आहे. हेही वाचा : भारतीय पोस्ट खात्याच्या नावे लोकांची आर्थिक फसवणूक; काय आहे हा घोटाळा? कशी टाळता येईल फसवणूक? एशियानेटच्या मते, कामाच्या तणावापासून सुटका मिळावी म्हणून तरुण मोठ्या संख्येने नोकर्या सोडत आहेत. कामाच्या तणावात असणार्या लोकांची संख्या अधिक असल्याने, या ट्रेंडचा प्रभाव जास्तीत जास्त लोकांवर पडत आहे. या ट्रेंडद्वारे लोक राजीनामा देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. ज्या तरुणांकडून कंपन्यांनी कामाच्या कालावधीपेक्षा जास्त काम करून घेतले, असा तरुण वर्ग सोशल मीडियावरून राजीनामा आणि देश सोडून जाण्यासंबंधीची आपली माहिती देत आहे. काय परिणाम होणार? कॉर्पोरेट क्षेत्रातील तणावग्रस्त कामापासून स्वत:ला मुक्त करणे, नवीन संधी शोधणे, नवीन कौशल्ये निवडणे व प्रवास करणे ही 'नेकेड रेझिग्नेशन'ची मुख्य उद्दिष्टे आहेत. या विचारसरणीमुळे महामारी आणि आर्थिक मंदीची शक्यता निर्माण होऊ शकते. अनेक तरुणांनी त्यांच्या नोकरीच्या मार्गांचा पुनर्विचार केला आहे आणि ते आपल्या जीवनात नवीन उद्देश शोधत आहेत. परंतु, यामुळे त्यांना आर्थिक अस्थिरता, पुन्हा नोकरी मिळण्यात अडचणी व रोजगाराच्या कमी संधी यांसारख्या अनेक बाबींच्या अडथळ्यांचा त्रास होऊ शकतो. नोकरीच्या शर्यतीतून बाहेर पडत परिपूर्ण जीवन शोधणाऱ्या तरुण कामगारांमध्ये 'नेकेड रेझिग्नेशन'चा ट्रेंड अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. हेही वाचा : शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह चर्चेत कशा आल्या? त्यांच्यावरील अश्लील शेरेबाजीचा वाद काय? 'नेकेड रेझिग्नेशन'चा ट्रेंड अवलंबण्यापूर्वी दिले जाणारे सल्ले बजेटिंग : जेव्हा तुमच्याकडे कोणतीही नोकरी नसते म्हणजेच जेव्हा तुम्ही बेरोजगार असता तेव्हा बचतच तुमच्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी बचत असणे आवश्यक आहे. नेटवर्किंग : लोकांच्या संपर्कात राहणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. एखादी व्यक्ती व्यावसायिकांशी संपर्क, व्यावसायिक कार्यक्रमांना जाणे यांद्वारे संभाव्य संधींबद्दल जागरूक असू शकते. नोकरी हाती असतानाच नवी संधी शोधणे : असे केल्यास दोन नोकऱ्यांत जास्त अंतर राहणार नाही आणि चालू उत्पन्नातही अडथळा निर्माण होणार नाही. विचारविनिमयाने निर्णय : भविष्यातीलल फायद्यांचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे.