राज्यात सध्या एकनाथ शिंदेंची बंडखोरी आणि त्यापाठोपाठ राज्यसरकार अल्पमतात येण्याची निर्माण झालेली शक्यता याची जोरदार चर्चा आहे. सगळीकडे याच मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असताना नवी मुंबईमध्ये मात्र इथल्या विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा डोकं वर काढू लागला आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी सिडकोला लिहिलेल्या एका पत्रानंतर या संदर्भातला वाद वाढला आणि परिस्थिती तणावपूर्ण झाली. स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढून राज्य सरकारच्या प्रस्तावाचा निषेध केला. रायगडमधील दिवंगत लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं, अशी मागणी जोरकसपणे केली गेली. नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून यासाठी हजारोंच्या संख्येनं आंदोलकांनी मोर्चे काढले.

नुकताच सिडकोच्या नवी मुंबईतील बेलापूरच्या मुख्यालयावर याच मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येनं आंदोलक मुख्यालयावर जाऊन धडकले होते. राज्यात सत्तेचा सारीपाट ऐन रंगात आलेला असताना देखील नवी मुंबईत मात्र स्थानिकांसाठी विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा मुद्दा महत्त्वाचा का वाटला? नेमकं आत्तापर्यंत घडलंय काय? सविस्तर जाणून घेऊया…

Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी
Pimpri mnc cut trees
धक्कादायक : पिंपरी महापालिका करणार १४२ झाडांची कत्तल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

एकनाथ शिंदेंचं ‘ते’ पत्र!

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी हे विमानतळ बांधलं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं, असा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आला. डिसेंबर २०२०मध्ये राज्याचे नगरविकास मंत्री आणि सध्या राज्यात सुरू असलेल्या बंडाळीच्या केंद्रस्थानी असणारे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीच सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात CIDCO ला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात यावं, असा प्रस्ताव पाठवण्याची सूचना करण्यात आली होती.

विश्लेषण : नरहरी झिरवळ यांच्या विरोधातील अविश्वास ठरावासाठी गणसंख्येची अट? विधिमंडळ संकेत, कायदे काय सांगतात?

मागण्या मान्य न झाल्यास काम थांबवणार!

पण स्थानिकांच्या मते, या विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव देण्यावर सर्वच राजकीय पक्षांची अगदी सुरुवातीपासून सहमती होती. महाविकास आघाडीलाही हे मान्य होतं. पण अचानक सरकारने स्थानिकांना विश्वासातही न घेता या विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय जाहीर केला. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई ऑल पार्टी अॅक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली. मागण्या पूर्ण न झाल्यास विमानतळाचं काम थांबवण्याचा इशारा या कमिटीनं दिला आहे.

कोण होते दि. बा. पाटील?

दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील यांचा जन्म रायगडच्या उरण तालुक्यातल्या जसई गावात झाला. एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या दि. बा. पाटील यांनी १९५१मध्ये वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर ते राजकारणात सक्रीय झाले. पीझंट्स वर्कर्स पार्टीशी ते संबंधित होते. १९५७ ते १९८० या काळात ते पाच वेळी पनवेलमधून आमदार म्हणून निवडून गेले होते. १९७७ ते १९८४ या काळात ते खासदार देखील होते. १९७२ ते १९७७ आणि १९८२-८३ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना अटक देखील झाली होती.

विश्लेषण : सरकार पाडण्यासाठी सुरु असलेला रिसॉर्ट पॉलिटिक्सचा खेळ कुठून सुरू झाला?

दि. बा. पाटील यांचा संघर्ष!

पाटील यांनी त्यांच्या आयुष्यात पनवेलमधील शेतकरी आणि जमीन मालकांसाठी असंख्य लढे दिले. विशेषत: ७० आणि ८०च्या दशकात सिडकोनं मोठ्या संख्येनं केलेल्या जमीन अधिग्रहणाविरोधात त्यांनी लढा दिला. १९८४च्या अशाच एका मोठ्या आंदोलनात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यानंतर राज्य सरकारला आंदोलकांसमोर नमतं घ्यावं लागलं. उरणमधील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात JNPT साठी जमीन अधिग्रहीत झालेल्या गावकऱ्यांसाठी देखील पाटील यांनी मोठा लढा दिला. अगदी वयाच्या ८६व्या वर्षी ते आजारी अवस्थेत असताना देखील त्यांचं आंदोलन सुरूच होतं. २०१२मध्ये ८७व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

दि. बा. पाटील यांच्याविषयी बोलताना नवी मुंबई एअरपोर्ट ऑल पार्टी अॅक्शन कमिटीचे सध्याचे अध्यक्ष दशरथ पाटील सांगतात, “जेव्हा कधी शेतकरी, कामगार किंवा जमीनमालक अडचणीत यायचे, तेव्हा पाटील त्यांच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरायचे. त्यांच्यामुळेच हजारो जमीन मालक आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. लोकांचं भलं करणं ही त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब होती. या भागातले शेतकरी, कामगार, जमीनमालक आणि इतर समाजवर्गांसाठी लढा देण्यात त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यामुळे ज्या जागेवर हे विमानतळ उभारलं जात आहे, त्या भागासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या व्यक्तीचं नाव या विमानतळाला देणंच योग्य आहे.”

विश्लेषण : कोण आहेत तीस्ता सेटलवाड? गुजरात दंगलीशी त्यांचा काय संबंध? सविस्तर जाणून घ्या

शेतकरी आणि जमीन मालकांशिवाय दि. बा. पाटील यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी देखील लढा दिला होता. पनवेलमधील भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर सांगतात, “या परिसरात आत्तापर्यंत अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत. मात्र, इथल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटलेल्या दि. बा. पाटील यांचं नाव आत्तापर्यंत इथल्या एकाही प्रकल्पाला देण्यात आलेलं नाही. बाळासाहेब ठाकरेंचं नाव आधीच समृद्धी महामार्गाला देण्यात आलं आहे. त्यामुळे या विमानतळाला पाटील यांचंच नाव देणं जास्त संयुक्तिक ठरेल. सरकारने स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये.”