Hippocratic Oath vs Maharshi Charak shapath: मदुराई वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना संस्कृतमध्ये चरक शपथ देण्यात आल्यामुळे वाद उद्भवल्यानंतर या महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना रविवारी पदावरून हटवण्यात आले.राज्याचे अर्थमंत्री पलानीवेल त्यागराजन आणि वाणिज्य कर मंत्री पी. मूर्ती यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे इंग्रजीमध्ये हिप्पोक्रॅटिक शपथेऐवजी संस्कृतमध्ये शपथ देण्यात आल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता ए. रत्नावेल यांना हटवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला. त्यांना यापुढील नियुक्तीचा आदेश न देता प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले असल्याचे त्यांना बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे. मात्र ही चरक शपथ किंवा हिप्पोक्रॅटिक शपथ नेमकी आहे का यावर नजर टाकूयात..

नेमकं घडलं काय?
तामिळनाडू सरकारने रविवारी मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ए. रत्नावेल पदावरुन हवटलं. नव्या विद्यार्थ्यांनी महर्षि चरक शपथ संस्कृतमधून घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. सामान्यपणे डॉक्टरांना इंग्रजीमधून दिली जाणारी शपथ (हिप्पोक्रॅटीक शपथ) न घेता त्यांनी चरक शपथ घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी चरक शपथ घेतल्यानेच अधिष्ठातांवर कारवाई करण्यात आलीय असं बोललं जातंय. आधीच भाषेसंदर्भातील विषयावरुन राज्य विरुद्ध केंद्र असा वाद सुरु असतानाच आता या नव्या वादामुळे राज्य आणि केंद्रातील मतभेद अधिक वाढण्याची शक्यता आहे. संस्कृतमधून शपथ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारने अधिष्ठाता ए. रत्नावेल यांना पदावरुन हटवलं आहे. भविष्यात त्यांची इतर ठिकाणी नियुक्ती केली जाईल असं स्पष्टीकरण राज्य सरकारने दिलं आहे.

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?

अधिष्ठाता ए. रत्नावेल यांनी काय म्हटलं…
तामिळनाडूचे कायमच हिंदी आणि संस्कृत भाषा लादण्याच्या मुद्द्यावरुन केंद्रासोबत खटके उडत असतात. या सर्व प्रकरणासंदर्भात बोलताना प्राचर्य रथिनवली यांनी विद्यार्थ्यांनीच चरक शपथ घेण्याचं ठरवलं. त्यांनी एनएमसीच्या वेबसाईटवरुन रोमन भाषेत उपलब्ध असणारी हि संस्कृत शपथ मिळवली. मात्र रत्नावेल यांच्या वरिष्ठांनी त्यांचं स्पष्टीकरण न स्वीकारता त्यांना पदावरुन काढून टाकलंय.

आरोग्यमंत्री काय म्हणाले?
तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम यांनी या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे आतापर्यंत चालत आलेली धोरणं आणि नियमांचं उल्लंघन झालेल नाही ना याची चौकशी केली जाणार आहे. “आम्ही राज्यांमधील सर्व वैद्यकीय विद्यालयांना विद्यार्थ्यांनी हिप्पोक्रॅटीक शपथ घ्यावी यासंदर्भात लेखी निर्देश दिलेत. हे सरकार नियम मोडू देणार नाही,” असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

केंद्राची भूमिका काय?
देशातील वैद्यकीय शिक्षणावर देखरेख ठेवणाऱ्या मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाची जागा राष्ट्रीय वैद्यकीय कमिशनने (एनएमसी) घेतली आहे. एनएमसीने नुकत्याच जारी केलेल्या निर्देशांमध्ये हिप्पोक्रॅटीक शपथ देण्याऐवजी संस्था त्यांच्या विद्यार्थ्यांना चरक शपथ देऊ शकतात असं म्हटलं होतं. यामुळे नवीन वाद निर्माण झालाय. भाजपाची सत्ता असणाऱ्या सरकारमार्फत हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यासाठी हे करण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय.

केंद्रीय आरोग्यमंत्री काय म्हणालेले?
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी चरक शपथ ही पर्यायी आहे. कोणत्याही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला यासाठी बळजबरी केली जाणार नाही असं केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणालेले. मात्र त्याचवेळी त्यांनी सर्व विद्यालयांना चरक शपथसाठी वापरला जाणारा संस्कृत मजकूर देण्यात आला आहे, असंही केंद्रीय मंत्री म्हणाले होते.

हिप्पोक्रॅटिक शपथ म्हणजे काय?
सध्या भारतामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जी शपथ दिली जाते ती हिप्पोक्रॅटिक शपथ असते. ही शपथ ग्रीक वैद्यकीय तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर हिप्पोक्रॅट्स यांच्या नावाने आहे. त्यांना वैद्यकीय क्षेत्राचे जनक म्हणून जगभरामध्ये ओळखलं जातं. ही शपथ विद्यार्थ्यांना व्हाइट कोट सेरिमनीदरम्यान दिली जाते. अनेक वर्षांपासून जगभरामधील वेगवगेळ्या देशांमध्ये विद्यार्थ्यांना हीच शपथ दिली जाते.

चरक शपथ म्हणजे काय?
सध्या ज्या शपथेवरुन वाद निर्माण झालाय ती महर्षि चरक यांच्या नावाने आहे. महर्षि चरक हे भारतीय ऋषी होते. त्यांना आयुर्वेद शास्त्राचे जनक मानलं जातं. त्यांनीच ही चरक शपथ नावाने ओळखली जाणारी शपथ लिहिली होती. ही शपथ संस्कृतमध्ये आहे. दोन्ही शपथी पाहिल्यास त्यांचा अर्थ सारखाच आहे. मात्र दोन्हींची भाषा आणि रचनाकार वेगवेगळे आहेत.