रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील संघर्ष वाढतच चालला आहे. दोन वर्षांहून अधिक काळ ओलांडूनदेखील हा देश निर्णायक आघाडी घेऊ शकलेला नाही. आता उत्तर कोरियादेखील या युद्धात उतरत असल्याची माहिती आहे. युक्रेनियन सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीने जारी केलेल्या व्हिडीओत उत्तर कोरियाच्या सैनिकांची उपस्थिती असल्याचा पुरावा आहे, असे सांगण्यात येत आहे. दक्षिण कोरियाच्या संस्थांनीही हा दावा केला आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले, उत्तर कोरिया रशियाची युद्धात मदत करत आहे, हे ज्या देशांना मान्य आहे, त्यांनी यावर कठोर भूमिका घ्यावी. ते पुढे म्हणाले की, प्योंगयांगचा सहभाग प्रत्येकासाठी हानिकारक असू शकतो. रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाचा सहभाग किती मोठा आहे? त्याचा काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.

उत्तर कोरियाचे सैन्य रशियन युद्धात सामील होणार?

रशियातील प्रशिक्षण मैदानावर उत्तर कोरियाचे सैनिक गणवेश आणि शस्त्र घेऊन असल्याचे अलीकडील व्हिडीओत समोर आले आहे. ‘सीएनएन’ने वृत्त दिले आहे की, सैन्याला एक फोरम भरण्यास सांगितला होता; ज्यात त्यांच्या गणवेशापासून तर जोड्यांपर्यंत, सर्वांची साइज देण्यास सांगण्यात आले होते. याच फॉर्मची प्रत ‘सीएनएन’कडे आली. हा फॉर्म रशियन भाषेत असून त्याला कोरियन भाषेतील पर्यायही देण्यात आले असल्याचे ‘सीएनएन’ने नमूद केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये उत्तर कोरियाचे सैनिक रशियन-चिनी सीमेजवळ असलेल्या सर्गेव्हका ट्रेनिंग ग्राउंडवर पोहोचल्याचे दिसत आहे.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
China is aggressive again after Taiwans war drills What are chances of war
तैवानच्या युद्धसरावाने चीन पुन्हा आक्रमक? युद्धाची शक्यता किती?
Eknath Shinde Group , Pratap Sarnaik,
स्बळाच्या नाऱ्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टिकेचे बाण
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान

हेही वाचा : ‘या’ देशात १० वर्षांच्या मुलांना तुरुंगवासाची शिक्षा; कारण काय? यावरून सुरू असलेला वाद काय आहे?

उत्तर कोरियाच्या सैनिकांचे रशियात प्रशिक्षण

हे सर्व व्हिडीओ दक्षिण कोरिया आणि युक्रेनने केलेल्या पूर्वीच्या दाव्याला पुष्टी देतात. ८ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री किम योंग-ह्यून यांनी संसदेत सांगितले की, उत्तर कोरिया सैन्य पाठवून युक्रेनमध्ये रशियाच्या युद्धाला पाठिंबा देऊ शकतो. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर सेवेने सांगितले की, रशियाच्या नौदलाने ८ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबरदरम्यान सुमारे १५०० उत्तर कोरियाच्या सैनिकांना व्लादिवोस्तोक येथे नेले होते. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीदेखील उत्तर कोरियाच्या सैन्याच्या थेट सहभागाबद्दल इशारा दिला आहे की, गेल्या आठवड्यात नाटोच्या मेळाव्यात सांगितले की, हजारो उत्तर कोरियाचे सैन्य रशियाकडे जात आहेत.

युक्रेनियन सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीने जारी केलेल्या व्हिडीओत उत्तर कोरियाच्या सैनिकांची उपस्थिती असल्याचा पुरावा आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

रविवारी (२० ऑक्टोबर) झेलेन्स्की यांनी एका व्हिडीओ संबोधनात पुन्हा उत्तर कोरियाच्या सैन्याचा मुद्दा उपस्थित केला. युक्रेनच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचे प्रमुख इहोर सोलोवे यांच्या म्हणण्यानुसार हे व्हिडीओ उत्तर कोरिया युद्धात उतरल्याचा पुरावा आहेत. “युक्रेनसाठी हा व्हिडीओ महत्त्वाचा आहे, कारण हा पहिला व्हिडीओ पुरावा आहे, ज्यात उत्तर कोरिया रशियाच्या बाजूने युद्धात भाग घेत असल्याचे दिसून येत आहे,” असे इहोर सोलोवे म्हणाले. युक्रेनच्या संरक्षण वर्तुळातील अनेकांनी हेदेखील नमूद केले आहे की, उत्तर कोरियाचे सैन्य लवकरच रशियाकडून चालू युद्धात लढणार आहेत. युक्रेनियन डिफेन्स इंटेलिजेंस डायरेक्टरेट (GUR) लेफ्टनंट जनरल किरिलो बुडानोव्ह यांनी ‘द वॉर झोन’ला सांगितले की, युक्रेनमध्ये लढण्यासाठी पूर्व रशियामध्ये सुमारे ११ हजार उत्तर कोरियाचे सैनिक प्रशिक्षण घेत आहेत.

रशियाची प्रतिक्रिया काय?

युक्रेन आणि दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाचे सैन्य युद्धात उतरणार असल्याचे सांगितले आहे, मात्र रशियाने हे दावे फेटाळले आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ही आणखी एक खोटी बातमी असल्याचे म्हटले आहे. परंतु, रशियाने हे दावे नाकारले असले तरीही इतर संरक्षणतज्ज्ञ म्हणतात की, रशियाच्या वापरासाठी उत्तर कोरियाचे सैन्य तैनात केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑक्सफर्ड विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे व्याख्याते एडवर्ड हॉवेल यांनी ‘अल जझीरा’ला सांगितले, “आपण ही शक्यता नाकारू शकत नाही, कारण ही वस्तुस्थिती आहे की रशियाला मनुष्यबळाची गरज आहे.”

हेही वाचा : बॉम्बच्या खोट्या धमक्यांनी विमान कंपन्यांना किती आर्थिक नुकसान होतं?

उत्तर कोरियाने मॉस्कोला शस्त्रे पुरवली आहेत का?

युद्ध सुरू असताना किम जोंग-उनच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाने रशियाला शस्त्रे आणि दारूगोळा पुरवल्याचा दावा कीव, सोल आणि वॉशिंग्टन यांनी केला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये अमेरिकेने उत्तर कोरियावर रशियाला शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला होता. हे दावे दक्षिण कोरियानेही केले आहेत. दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री शिन वोंसिक यांनी ‘ब्लूमबर्ग न्यूज’ला सांगितले की, सोलने किमान १० हजार शिपिंग कंटेनर्स उत्तर कोरियाकडून रशियाला पाठवल्याचे आढळले आहेत, ज्यात ४.८ दशलक्ष तोफखाना आहेत. एप्रिलमध्ये यूएन मॉनिटर्सनी सुरक्षा परिषदेला सांगितले की, जानेवारीमध्ये युक्रेनच्या खार्किव शहरावर केलेल्या हल्ल्यात प्योंगयांगच्या ह्वासोंग -११ क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आल्याचे आढळून आले आहे. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी जानेवारीत सांगितले की, व्लादिमीर पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशियाने ३० डिसेंबर २०२३ रोजी उत्तर कोरियाने पुरविलेले किमान एक शस्त्र युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात वापरल्याची विश्वसनीय गुप्तचरांची माहिती आहे.

Story img Loader