One year of Russia-Ukraine war: रशियाने युक्रेनवर हल्ला करुन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या युद्धात आतापर्यंत ८,००६ नागरिक ठार झाले असून सुमारे १३,२८७ नागरिक जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार सांख्यिकीवरुन मिळत आहे. युक्रेनने वर्षभर खूप काही सहन केले आहे. मागच्यावर्षी २४ फेब्रुवारी २०२२ ते आतापर्यंत काय काय झालं? एका वर्षातील प्रमुख घटना आि प्रत्येक महिन्याला काय काय घडलं? यावर एक नजर टाकू.

२४ फेब्रुवारी २०२२: रशियाने उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडून युक्रेनवर आक्रमण केले. पुढील काही दिवसांत कीव आणि खार्किव्ह सारख्या दोन मोठ्या शहरांवर तीव्र हल्ला आणि क्षेपणास्त्र डागण्यात आली.

Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Hamas Israel conflict
१३००० बालकांसह ३४५०० नागरिक मृत्यू,लाखो बेघर, संपूर्ण प्रदेश बेचिराख; गाझा युद्धाचे रक्तलांच्छित सहा महिने!
bengaluru water crisis similar to Cape town
Water Crisis: बंगळुरूमध्ये केपटाऊनपेक्षाही भीषण जलसंकट? कारणीभूत कोण?

मार्च: रशियाने खेरसन प्रांत ताब्यात घेतला आणि क्रिमिया ते डोनबास आणि लुहान्सक पर्यंत पूल बांधण्याचा प्रयत्न केला. मार्च २०२२ या महिन्यात सर्वाधिक नागरिक मारले गेले.

एप्रिल: रशियन सैन्याने किवमधून माघार घ्यायला सुरुवात केली. याठिकाणी नरसंहार झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. युक्रेनने उत्तरेकडील गमावलेला प्रांत परत घेण्यास सुरुवात केली.

मे: रशियाच्या तीव्र हल्ल्यामुळे आणि बॉम्बच्या भडीमारामुळे युक्रेनने प्रतिकार करुनही मे महिन्यात मारिओपोल शहर अखेर रशियाच्या ताब्यात आले. याकाळात अझोव्स्टल स्टील प्लँटमध्ये केवळ भग्नावशेष बाकी राहिले. रशियाने काळ्या समुद्रातील ओडेसा बंदर वगळता बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतला.

जून: युक्रेनने काळ्या समुद्रातील ओडेसाजवळ असलेले स्नॅक बेट परत ताब्यात घेतले. रशियाने युद्धाच्या पहिल्याच दिवशी या बेटावर वर्चस्व मिळवले होते. हे बेट परत घेतल्यामुळे युक्रेनने रशियन नौदलावर मोठा पराक्रम गाजविला. हा विजय युक्रेनचे मनोबल वाढविणारा ठरला.

जुलै: अमेरिकेच्या HIMARS (दूरवर क्षेपणास्त्र डागू शकणारी ट्रक) ला युक्रेनमध्ये तैनात केल्यानंतर युद्धाचा नूर पालटला. युद्धात थोडासा विराम आला. मात्र झापोरिझ्झिया प्रांतातील अणु प्रकल्पाभोवती भीतीचे वातावरण निर्माण झाले.

ऑगस्ट: युक्रेनने खेरसनमध्ये पाश्चिमात्य राष्ट्रांनी पुरविलेले शस्त्रात्रे वापरून मोठा संघर्ष सुरु केला. क्रिमियाच्या रशियन हवाई तळावर हल्ला चढविण्यात आला.

सप्टेंबर: प्रतिहल्ल्याची तीव्रता वाढल्यामुळे युक्रेनने खार्किव्हचा बराचसा भाग परत घेतला. त्यामुळे रशियाच्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले. नॉर्ड स्ट्रिम येथील पाण्याखाली असेलल्या पाईपलाईनची तोडफोड करण्यात आली.

ऑक्टोबर: रशिया आणि क्रिमिया यांना जोडणारा केर्च येथील समुद्रावरील पूल स्फोट घडवून उडविण्यात आला. रशियाने युक्रेनच्या ऊर्जा क्षेत्राला धक्का देण्याचा प्रयत्न केला.

नोव्हेंबर – डिसेंबर: रशियाने खेरसन शहरातून पूर्वेकडे माघार घेतली. दोन्ही बाजूंना कोणताही मोठा फायदा न होता युद्ध पुढे सरकत राहिले. युक्रेनने ड्रोनच्या माध्यमातून रशियामधील लष्करी तळांवर हल्ला केला.

जानेवारी-फेब्रुवारी: युक्रेनने डोनेस्तकमधील रशियन सैन्याच्या इमारतीला धडक दिली. मॉस्कोने म्हटले की, या हल्ल्यात ८९ सैनिक मरण पावले. अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीमधून युक्रेनला रणगाडे पाठविणार असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी किवच्या भेटीदरम्यान केले.