इंग्लंड फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी जर्मनीचे थॉमस टुकेल यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे बराच वाद निर्माण झाला आहे. फुटबॉलविश्वात आणि अन्यत्रही इंग्लंड व जर्मनी यांच्यातील शत्रुत्व पारंपरिक मानले जाते. मात्र, त्यानंतरही इंग्लंडच्या फुटबॉल संघटनेने टुकेल यांना इंग्लंडच्या प्रशिक्षकपदी नेमण्याचे धाडस दाखवले. त्यांना विरोध दर्शवताना अनेकजण थेट नाझी युगाचा दाखला देतात. तो का?

नवीन प्रशिक्षक कशासाठी?

यंदा जुलैमध्ये झालेल्या युरो अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंग्लंडला स्पेनकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर गॅरेथ साऊथगेट यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. मग नव्या प्रशिक्षकांचा शोध सुरू झाला. एडी हाओ, ग्रॅहम पॉटर यांसारख्या इंग्लिश प्रशिक्षकांची नाव सुरुवातीला चर्चेत होती. ली कार्सली यांची अंतरिम प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. मात्र, त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडला नेशन्स लीगमध्ये ग्रीसकडून हार पत्करावी लागल्यानंतर नवे प्रशिक्षक नेमण्याच्या प्रक्रियेने गती घेतली. अशात अचानक जर्मनीचे टुकेल यांचे नाव समोर आले. इंग्लंडमध्ये त्यांच्या पुरुष फुटबॉल संघाला परदेशी प्रशिक्षक देण्यास विरोध आहे. आपल्या देशातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी देशात चांगला प्रशिक्षक सापडत नाही ही लाजिरवाणी गोष्ट असल्याची भावना इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळेच टुकेल यांची नियुक्ती झाल्यावर इंग्लंडमधील एका नामांकित वृत्तपत्राने ‘डार्क डे’ अशा मथळ्याने वृत्त दिले होते.

silver coins
विश्लेषण: इंग्लंडमध्ये सापडला आजवरचा सर्वांत मौल्यवान गुप्त खजिना…१००० वर्षांपूर्वीची २५०० चांदीची नाणी… किंमत अवघी ५६ लाख डॉलर!
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
israel mosquito protocol targeting palestian
इस्रायली सैन्य पॅलेस्टिनी नागरिकांना ढाल म्हणून कसे वापरत आहे? काय आहे ‘मॉस्किटो प्रोटोकॉल’?
israel, airstrikes across iran
विश्लेषण : इस्रायलचा अखेर इराणवर हल्ला! पश्चिम आशियात पुन्हा युद्धभडका?
turkistan surgical strike on iraq
विश्लेषण: तुर्कस्तानकडून इराक, सीरियावर ‘सर्जिकल स्ट्राइक’! तुर्कस्तानातील दहशतवादी हल्ल्यामागे कुर्दिश बंडखोर? त्यांची मागणी काय आहे?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

हे ही वाचा… Digital condom: डिजिटल कंडोमची सोशल मीडियावर चर्चा, काय आहे हा प्रकार?

परदेशी प्रशिक्षक लाभत नाही?

परदेशी प्रशिक्षक विश्वचषक जिंकून देत नाही असा एक समज इंग्लंडमध्ये रूढ आहे. पहिल्या १९३०च्या विश्वचषकापासून विजेत्या संघाचे प्रशिक्षक हे त्या देशांचेच राहिले आहेत. दुसरे म्हणजे भाषेशी आणि नव्या संस्कृतीशी जुळवून घेण्याची अडचण हेसुद्धा कारण पुढे येते. अर्थात, टुकेल हे काही इंग्लंडचे पहिले परदेशी प्रशिक्षक नाहीत. यापूर्वी स्वीडनचे स्वेन-गोरान एरिकसन (२००१-२००६) आणि इटलीचे फॅबिओ कपेलो (२००८-२०१२) हे इंग्लंडचे प्रशिक्षक राहिले होते. विशेष म्हणजे चार वेळचे विश्वविजेते असलेल्या जर्मनीनेही कधी परदेशी प्रशिक्षकाचा विचार केलेला नाही. मात्र, आता जर्मन व्यक्ती इंग्लंडची प्रशिक्षक होत आहे ही सर्वांत मोठी खदखद आहे. सध्या फिफा क्रमवारीतील पहिल्या नऊ संघांपैकी केवळ चार देशांचे प्रशिक्षक परदेशी आहेत.

टुकेल यांना पसंती का?

टुकेल यांना इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यामागील सर्वांत मोठे कारण म्हणजे त्यांना इंग्लंडमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. टुकेल यांनी १८ महिने इंग्लंडमधील नामांकित चेल्सी क्लबचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. या कालावधीत त्यांनी प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स लीगचे जेतेपदही मिळवले होते. तसेच टुकेल इंग्रजी उत्तम बोलत असल्याने त्यांना इंग्लंडच्या खेळाडूंची जुळवून घेण्यात अडचण येणार नाही असे इंग्लिश फुटबॉल संघटना अर्थात ‘एफए’ला वाटते. टुकेल यांनी जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड आणि बायर्न म्युनिक, तसेच फ्रान्समधील पॅरिस सेंट-जर्मेन यांसारख्या तगड्या क्लबनाही मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील संघ बाद फेरीत दमदार कामगिरी करत असल्याचे मानले जाते. इंग्लंडचा संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीतच अडखळताना दिसत आहे. त्यामुळे टुकेल इंग्लंडला हा अडथळा पार करून देऊ शकतील असा ‘एफए’ला विश्वास आहे. टुकेल यांचा करार केवळ १८ महिन्यांसाठीच आहे. टुकेल यांना एकाही राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही.

हे ही वाचा… Israel used Smart bomb: लेबनॉनमधील इमारती जमिनदोस्त करण्यासाठी इस्रायलने वापरला स्मार्ट बॉम्ब; नक्की काय आहे स्मार्ट बॉम्ब?

कट्टर शत्रुत्वाला नाझी युगाची पार्श्वभूमी…

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीविरुद्ध इंग्लंडची घनघोर लढाई झाली. इंग्लंड, अमेरिका आणि रशिया या दोस्त राष्ट्रांच्या विरोधात जर्मनी, इटली आणि जपान या देशांची फळी होती. जर्मनीने इंग्लंडवर बेछुट बॉम्बवर्षाव करून लंडनसारखी प्रमुख शहरे बेचिराख केली होती. तरीही इंग्लंड बधले नाही. पण त्या हल्ल्याचा राग इंग्लिश जनमानसात खोलवर वसला आहे. फुटबॉलच्या मैदानावरही हे शत्रुत्व अनेकदा प्रकटते. फुटबॉलमध्ये इंग्लंडपेक्षा जर्मनी बलाढ्य गणला जायचा. तरीदेखील १९६६च्या विश्वचषक अंतिम फेरीत इंग्लंडने जर्मनीचा पराभव करून आजवरचे एकमेव जगज्जेतेपद पटकावले. मात्र त्यानंतर या स्पर्धेत बहुतेकदा जर्मनीचीच सरशी झालेली दिसते. त्यामुळे त्या देशाच्या फुटबॉल संघाच्या विरोधात रागमिश्रित भीती आणि असूया इंग्लिश फुटबॉलरसिकांच्या मनात आजही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी जर्मन व्यक्तीच्या नावाला विरोध झाला.

Story img Loader