दक्षिण आफ्रिकेचा सुवर्णपदक विजेता अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियसची तुरुंगातून सुटका करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या पॅरोल बोर्डाने शुक्रवारी (दि. ३१ मार्च) विरोध केला. दोन्ही पायांनी अधू असलेला ऑस्कर ‘ब्लेड रनर’ या नावाने प्रसिद्ध आहे. २०१२ च्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऑस्करने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र त्यानंतर पुढच्याच वर्षात त्याच्याहातून प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हीचा खून झाला आणि ऑस्करची कारकिर्द संपुष्टात आली. ऑस्करला ट्रॅकवर धावताना पाहून अनेक क्रीडापटूंना प्रेरणा मिळाली होती. गुडघ्याच्या खाली दोन्ही पाय नसलेल्या ऑस्करने कृत्रिम अवयवाचा वापर करून धावपट्टीवर वाऱ्याशी स्पर्धा केली. २०१३ साली ऑस्करकडून नेमका गुन्हा कसा घडला? आणि दक्षिण आफ्रिकेच्या पॅरोल बोर्डाने त्याच्या सुटकेला विरोध का केला? याबाबत घेतलेला हा आढावा.

खुनाचा गुन्हा करण्याच्या काही महिने आधीच २०१२ साली लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ऑस्करने भाग घेतला होता. दोन्ही पाय नसलेला आणि कृत्रिम अवयव लावून धावणारा ऑस्कर हा जगातील पहिला धावपटू होता. त्यानंतर त्याला ब्लेड रनर या नावाने ओळखले गेले. जगभरातील आघाडीच्या दैनिकांनी त्याचे धावतानाचे छायाचित्र छापून त्याच्यावर रकानेच्या रकाने खरडले होते.

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: ‘आरसीबी’ विकून मोकळे व्हा; हैदराबादसमोरील सुमार कामगिरीनंतर महेश भूपतीची उद्विग्न प्रतिक्रिया
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
Ayesha Khan, Bigg Boss Fame, Cheers For MS Dhoni During
DC Vs CSK: ‘माही’ला चिअर करणारी ही अभिनेत्री चर्चेत, चेन्नईने सामना गमावला तरीही जिंकली मनं

प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हीच्या खुनाच्या गुन्ह्यात ऑस्करला १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून अर्धी शिक्षा त्याने भोगली आहे. मात्र तरीही त्याला पॅरोलसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या कायद्यानुसार कोणत्याही गुन्हेगाराला पॅरोल मिळण्यासाठी शिक्षेचा ठराविक काळ पूर्ण करावा लागतो. त्याशिवाय त्याला पॅरोल देता येत नाही.

व्हॅलेंटाइन डे, प्रेयसीचे सरप्राईज गिफ्ट आणि खून

२०१३ सालच्या ‘व्हलेंटाईन डे’च्या दिवशी प्रिटोरिया येथील आपल्या आलिशान घरात ऑस्करने बाथरूममध्ये प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पवर गोळ्या झाडल्या. त्यादिवशी रिव्हा ऑस्करला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या घरात बाथरूममध्ये लपून बसली होती. मात्र आपल्या घरात घुसखोर आल्याचा संशय येऊन ऑस्करने गोळ्या झाडल्या. बाथरुमचा दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये रिव्हा असल्याचे कळले. २९ वर्षीय रिव्हा स्टीनकॅम्प त्यावेळी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती.

ऑस्कर पिस्टोरियसवरील खटला तब्बल पाच महिने चालला. या काळात दक्षिण आफ्रिका आणि जगभरात महिलांवरील अत्याचार, वांशिक भेदभाव यावर अनेक चर्चा झाल्या.

ऑस्करने संतापाच्या भरात रिव्हावर गोळ्या झाडल्या, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोघांच्याही मेसेजेसवरून त्यांच्या नात्यात सर्वकाही ठिक नव्हते, याचाही प्रत्यय येत होता. ऑस्कर हा संशयखोर आणि ईर्ष्या असलेला व्यक्ती आहे, असा आरोप रिव्हाने खून होण्याआधी केला होता. तसेच खून होण्याच्या एक आठवडा आधी तिने केलेल्या एका मेसेजमध्ये ऑस्करची तिला भीती वाटत असल्याचे म्हटले होते. ऑस्कर कधी कधी तिच्या अंगावर धावून जात असल्याचेही तिने म्हटले होते.

ऑस्कर पिस्टोरियसला खालच्या न्यायालयात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरण्यात आले. त्याच्यावर हत्येचा दोष सिद्ध झाला नाही. त्यानंतर सरकारी वकिलांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी वरच्या न्यायालयात आव्हान दिले. सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र नंतर वरच्या न्यायालयाने ऑस्करवर पुर्वनियोजित नसलेली हत्या असे नवे दोषारोप लावून त्याला १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

ऑस्करचा पॅरोल का नाकारण्यात आला?

रिव्हा स्टीनकॅम्पच्या कुटुंबाला ऑस्करने सांगितलेल्या घटनाक्रमावर विश्वास बसलेला नाही. त्यासाठी त्यांनी त्याच्या पॅरोलला विरोध केला. स्टीनकॅम्प कुटुंबियांचे वकील तानिया कोएन म्हणाल्या की, ऑस्करने सत्य सांगितलेले नाही. जोपर्यंत तो सत्य सांगत नाही, तोपर्यंत त्याला पुनर्वसनाची गरज आहे, असे आम्हाला वाटत नाही. स्टीनकॅम्पची आई जून यांनी देखील ऑस्करच्या पॅरोलला विरोध केला.

पॅरोल बोर्डानेही ऑस्करने आतापर्यंत कारावासात व्यतीत केलेल्या अवधीवरून त्याचा पॅरोल नाकारला. जुलै २०१६ रोजी ऑस्करला कारावासात जावे लागले होते. त्यामुळे ऑगस्ट २०२४ नंतरच त्याच्या पॅरोलवर विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेच्या करेक्शन विभागाचे प्रवक्ते सिंगाबाखो यांनी दिली. रिव्हाचा मृत्यू आपल्या हातून झाल्याबद्दल ऑस्करने पश्चाताप व्यक्त केलेला आहे. ऑस्करने मागच्यावर्षी स्टीनकॅम्पचे वडील बॅरी यांची तुरुंगात भेट घेऊन पश्चाताप व्यक्त केला होता. पण बॅरी यांना ऑस्करच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. ऑस्कर अजूनही त्यादिवशी काय झाले? याबद्दल सत्य सांगत नाही, असा दावा बॅरी यांनी केला.