आर्थिक आणि राजकीय स्तरावर गोंधळाचं वातावरण असणारा शेजारी देश पाकिस्तान एका नव्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांचा केनियातील नैरोबीमध्ये पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. हा प्रकार गोळीबाराचा नसून हत्येचा असल्याचा दावा पाकिस्ताकडून करण्यात येत आहे. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरलं असून अर्शद शरीफ यांच्या या कथित ‘हत्ये’चं गूढ आता वाढू लागलं आहे. एकीकडे पाकिस्तानने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली असताना दुसरीकडे पाकिस्तानमधून अर्शद शरीफ नैरोबीत कसे पोहोचले? हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

कोण होते अर्शद शरीफ?

अर्शद शरीफ हे पाकिस्तानमधील नावाजलेले टीव्ही पत्रकार होते. आर्य वृत्तवाहिनीसाठी ते टॉक शो करत होते. मध्यंतरीच्या काळात आर्य वृत्तवाहिनीशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. अर्शद शरीफ हे इम्रान खान यांचे समर्थक मानले जातात. पाकिस्तानी लष्करावर त्यांनी अनेकदा त्यांच्या टॉक शोमधून उघडपणे टीकाही केली होती. त्यामुळे या प्रकरणात पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. नुकताच अर्शद शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये त्यांच्या जीविताला धोका असल्याचा दावा केला होता. पाकिस्तानचे पंतप्रदान शेहबाज शरीफ यांनी २४ ऑक्टोबर रोजी केलेल्या ट्वीटमध्ये यासंदर्भात केनियाचे पंतप्रधान विल्यम रुटो यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, अर्शद शरीफ कधीकाळी पाकिस्तानी लष्काचे समर्थक होते. मात्र, कालांतराने त्यांनी लष्कराच्या धोरणांवर टीका करायला सुरुवात केली. अर्शद शरीफ यांच्या टॉक शोमुळेच आर्य वृत्तवाहिनीचं प्रसारण काही काळासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. या शोच्या माध्यमातून लष्करविरोधी भावना भडकवण्याचं काम होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. इम्रान खान यांचे सहकारी डॉ. शाहबाज गिल यांची एक वादग्रस्त मुलाखत घेतल्याप्रकरणी पोलिसांनी अर्शद शरीफ, त्या शोचे निर्माते आणि इतर काही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल केला होता.

विश्लेषण: अमेरिकेचं ग्रीनकार्ड ते ब्रेडचा वाद, ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक अनेकदा अडकले वादाच्या भोवऱ्यात

या सगळ्या प्रकारानंतर आर्य वृत्तवाहिनीने अर्शद शरीफ यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार आठ वर्ष आर्य न्यूजसोबत काम केल्यानंतर अर्शद शरीफ यांनी नुकताच राजीनामा दिला.

“ही तर ठरवून केलेली हत्या”

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि सध्या टीकेच्या केंद्रस्थानी असणारे इम्रान खान यांनी हा सगळा प्रकार म्हणजे ठरवून केलेली हत्या असल्याचा दावा केला आहे. ‘शरीफ यांनी सत्य बोलण्याची मोठी किंमत चुकवली आहे. सत्तेत असणाऱ्या कुणावरही टीका करण्याची किंवा त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत करणाऱ्यांची हत्या करण्याचे प्रकार शरीफ यांच्या हत्येमुळे अधिकच ठळकपणे समोर आले आहेत’, असं इम्रान खान यांनी त्यांच्या ट्वीटमध्य म्हटलं आहे.

केनियामध्ये नेमकं घडलं काय?

केनियातील ‘द स्टार’ वृत्तसंस्थेनं दिलल्या वृत्तानुसार, अर्शद शरीफ हे मगदी शहरात होते. नैरोबीच्या दक्षिणेकडे हे शहर आहे. पोलिसांनी शहरात रस्ते बंद केले असताना अर्शद शरीफ असणारी कार थांबली नाही. त्यामुळे पोलिसांनी कारवर गोळीबार सुरू केला. स्थानिक पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलाच्या अपहरणाच्या एका प्रकरणात पोलीस त्याच प्रकारच्या एका कारचा शोध घेत होते. अर्शद शरीफ यांची कार न थांबल्यामुळे पोलिसांनी संशयातून त्या कारवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये अर्शद शरीफ यांचा मृत्यू झाला. यावेळी ५० वर्षीय अर्शद शरीफ यांच्यासह कारमध्ये त्यांचे बंधू खुर्रम अहमद हे देखील होते.

अर्शद शरीफ केनियाला का गेले होते?

मुळात अर्शद शरीफ केनियाला का गेले होते? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. सामान्यपणे ते दुबई किंवा लंडन येथे सुट्टी काळात जाणं पसंत करायचे. यावेली मात्र त्यांनी केनियाची निवड का केली? याबाबत गूढ निर्माण झालं आहे.

विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका, पण पोटॅशियम आयोडाईड गोळ्यांची मागणी का वाढली?

आता पुढे नेमकं काय होणार?

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाहून जारी केलेल्या व्हिडीओ संदेशात अर्शद शरीफ यांच्या मूत्यू प्रकरणाची न्यायालयीन समितीमार्फत चौकशी केली जाईल, असं सांगितलं आहे. ही समिती पारदर्शी आणि गुन्ह्याचा छडा लावण्याच्या हेतूनेच काम करेल, असंही शरीफ यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानी लष्करानेही अर्शद शरीफ यांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

“पाकिस्तानी लष्करावर अशा प्रकारचे आरोप होणं हे दुर्दैवी आहे. मला वाटतं या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतरच सत्य समोर येऊ शकेल. शिवाय, फक्त अर्शद शरीफ यांच्या मृत्यूचीच नव्हे, तर त्यांना पाकिस्तान का सोडावं लागलं याचीही चौकशी केली जावी”, अशी मागणी पाकिस्तान लष्करातील मेजर जनरल बाबर इफ्तिकार यांनी केली आहे.