पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले. ही इमारत संसदेच्या जुन्या इमारतीच्या तुलनेत भव्यदिव्य असून यामध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. विशेष म्हणजे पर्यावरण, आगामी काळात संसदेचा वाढणारा व्याप लक्षात घेऊन या इमारतीची रचना आणि निर्मिती करण्यात आली आहे. देशभरात या इमारतीच्या स्थापत्यकलेची चर्चा होत आहे. असे असले तरी जगातील अनेक देशांमध्ये अशाच प्रकारे संसदेच्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या भव्य इमारती आहेत. या इमारती कोणत्या आहेत? या इमारतींची विशेषता काय आहे? हे जाणून घेऊ या…

इमारतीच्या उद्घाटनादरम्यान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इमारतीतील लोकसभा भवनातून भारतीयांना संबोधित केले. या वेळी त्यांनी भारतीय लोकशाही आणि देशाचा समृद्ध वारसा याचा उल्लेख केला. यासह त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाबद्दलही भाष्य केले. “पंचायत भवनापासून ते संसद भवनापर्यंत लोकांचा, देशाचा विकास करणे हा आमचा एकच उद्देश आहे. आज संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होत असताना मागील नऊ वर्षांत या देशातील ४ कोटी गरीब लोकांसाठी घरे तसेच ११ कोटी शौचालये बांधल्याचा मला आनंद होत आहे,” असे मोदी म्हणाले. केंद्र सरकारने २६ मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीची पहिली झलक प्रसिद्ध केली होती. या वेळी मोदी यांनी खास ट्वीट केले होते. “संसदेच्या नव्या इमारतीकडे पाहून प्रत्येकालाच अभिमान वाटेल,” अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या होत्या.

News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
maharashtra cabinet expansion before nagpur session
मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, ११ किंवा १२ तारखेला शक्यता
Traffic changes due to flyover work at Katraj Chowk Confusion among people due to having to take alternative route
कात्रज चौकाची ‘कोंडी’… वाहतुकीचा बोजवारा
Mallikarjun Kharge
“मी पवित्र १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक”, मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने खळबळ; भाजपाकडून टीका!
sambhal mosque asi files response in court seeks control management of mughal era structure
संभलमधील मशिदीचे व्यवस्थापन सोपवा; पुरातत्त्व खात्याचा न्यायालयात युक्तिवाद
A 2,000-Year-Old Roman Road, Trod by Emperors, Is Found Beneath London
History of Watling Street: २००० वर्षांनंतर लंडनमध्ये उलगडले रोमन रस्त्याचे रहस्य; वॉटलिंग स्ट्रीटचा शोध नेमकं काय सांगतो?

हेही वाचा >> जनुकीय सुधारीत अन्न हा शाश्वत अन्न उत्पादनाचा उत्तम मार्ग? जीएम बियाणे किती सुरक्षित?

हेगमधील बिन्नेनहॉफ भवन

नेंदरलॅण्ड देशातील हेग येथील संसदेच्या इमारतीला ‘बिन्नेनहॉफ’ म्हणून ओळखले जाते. १३ व्या शतकात या इमारतीची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हा ही इमारत ‘काउंट्स ऑफ हॉलंड’चे निवासस्थान होते. बिन्नेनहॉफमध्ये अनेक इमारती आहेत. यामध्ये रिड्डेरझाल (किंग्ज हॉल) ही इमारत सर्वांत देखणी आणि लोकप्रिय आहे. १५८५ मध्ये डच प्रजासत्ताकच्या केंद्र सरकार, स्टेट जनरल तसेच अन्य महत्त्वाच्या संस्थांचा कारभार या इमारतींमधून होऊ लागला. त्यामुळे या इमारतीकडे तेव्हा डच प्रजासत्ताकचे प्रतीक म्हणून पाहिले जायचे. आज या इमारतीत नेदरलॅण्डमधील स्टेट्स जनरल, सामान्य प्रशासन, तसेच पंतप्रधानांचे कार्यालय आहे.

हेगमधील बिन्नेनहॉफ भवन (Photo: Wikimedia Commons)

ढाकामधील नॅशनल पार्लमेंट हाऊस

बांगलादेशमधील संसदेची इमारत प्रसिद्ध वास्तुविशारद लुईस कहन यांनी बांधलेली आहे. ही इमारत जगातील सर्वांत मोठ्या संसद इमारतींपैकी ही एक आहे. या इमारतीचे बांधकाम साधारण दोन दशके चालले. या इमारतीच्या बांधकामासाठी १९६२ साली परवानगी देण्यात आली होती. स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीसाठी झालेल्या युद्धामुळे १९७१ च्या दरम्यान या इमारतीचे बांधकाम काही काळासाठी थांबवण्यात आले होते. या नॅशनल पार्लमेंट हाऊसकडे लोकशाहीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. याच कारणामुळे या इमारतीसंदर्भात बांगलादेशच्या नागरिकांच्या मनात आदराचे स्थान आहे. या पार्लमेंट हाऊसमध्ये चुनखडी आणि क्राँक्रीटचे एकूण नऊ ब्लॉक आहेत. या अष्टकोनी इमारतीमध्ये प्रार्थना हॉल, पॅसेजवे आहेत.

ढाकामधील नॅशनल पार्लमेंट हाऊस (Photo: Wikimedia Commons)

हेही वाचा >> विश्लेषण: अमेरिकेतील कर्ज तुमची समस्या वाढवणार, सोन्याच्या भावावर परिणाम होणार

वॉशिंग्टन डीसीमधील ‘द कॅपिटॉल’

वॉशिंग्टन डीसीमधील ‘द कॅपिटॉल’ या इमारतीकडे अमेरिकेच्या लोकशाहीचे निदर्शक म्हणून पाहिले जाते. या इमारतीमध्ये अमेरिकन काँग्रेस जमतात. साधारण १.५ दशलक्ष स्क्वेअर फूट परिसरात ही इमारत पसरलेली आहे. या इमारतीत एकूण ६०० खोल्या आहेत. या इमारतीचा कालानुसार अनेक वेळा विस्तार करण्यात आलेला आहे. ‘द कॅपिटॉल’ इमारतीवर दिसणारा पांढऱ्या रंगाचा घुमट १८५५ ते १८६६ या कालावधीत बांधण्यात आलेला आहे. या घुमटाची एकूण उंची ८८ मीटर आहे. या घुमटावर गेल्यानंतर संपूर्ण वॉशिंग्टन शहर दिसते.

वॉशिंग्टन डीसीमधील ‘द कॅपिटॉल’ (Photo: Wikimedia Commons)

बिजिंगमधील ‘द ग्रेट हॉल ऑफ द पीपल’

१९५८ साली चीनमधील संसद अर्थात ‘द ग्रेट हॉल ऑफ द पीपल’ ही इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणजेच चीनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त कम्युनिस्ट पक्षाने एकूण दहा भव्य इमारती उभारण्याची घोषणा केली होती. ३० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या इमारती उभारण्याचे काम केले. यामध्ये साधारण सात हजार टेक्निशियन्स होते. या कामगारांनी अथक परिश्रम घेऊन ‘द ग्रेट हॉल ऑफ द पीपल’ नावाने ओळखली जाणारी ही इमारत अवघ्या दहा महिन्यांत बांधून पूर्ण केली होती. पुढे सप्टेंबर १९५९ मध्ये या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. ही इमारत तियानमेन स्क्वेअरच्या पश्चिमेस आहे. या इमारतीमध्ये एकाच वेळी पाच हजार लोक जेवण करू शकतात. इमारतीतील सभागृहात दहा हजार लोक बसू शकतात. यासह या इमारतीत पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीचे कार्यालयही आहे.

बिजिंगमधील ‘द ग्रेट हॉल ऑफ द पीपल’ (Photo: Wikimedia Commons)

हेही वाचा >> विश्लेषण: शेअर बाजारात लागू झालेल्या ‘टी+१’ व्यवहार प्रणालीचे फायदे काय?

अबुजा येथील द नॅशनल असेंब्ली कॉम्प्लेक्स

नायजेरियाचे संसद भवन साधारण ४० हजार स्क्वेअर मीटरच्या परिसरात पसरलेले आहे. या इमारतीच्या उभारणीला १९९९ साली सुरुवात झाली होती. साधारण ३० महिने इमारत उभारणीचे काम सुरू होते. या इमारतीत वेगवेगळ्या समारंभांसाठी जागा आहे. तसेच हिरव्या रंगाचा घुमट असलेल्या दोन मोठ्या खोल्या आहेत. नायजेरियामधील ग्रॅनाइट तसेच अन्य वस्तूंच्या मदतीने ही इमारत उभारण्यात आली आहे.

अबुजा येथील द नॅशनल असेंब्ली कॉम्प्लेक्स (Photo: Wikimedia Commons)

रोमानिया देशाचे ‘द पॅलेस ऑफ पार्लमेंट’

रोमानिया देशाचे संसद भवनही तेवढेच आकर्षक आणि भव्यदिव्य आहे. या इमारतीचे बांधकाम १९८४ ते १९९७ या कालावधीत झाले. जगातील सर्वाधिक मोठ्या आणि वजनाने जड असलेल्या इमारतींमध्ये या इमारतीचेही नाव घेतले जाते. मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत साधारण २७६ फूट उंच असून तिचे वजन ४.१० दशलक्ष टन आहे. कम्युनिस्ट हुकूमशाहा निकोले चाऊसेस्कू याच्या काळात या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. आन्का पेट्रेस्कू यांच्या नेतृत्वाखाली साधारण ७०० वास्तुविशारदांनी ही इमारत उभी केली होती. या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली तेव्हा पेट्रेस्कू हे फक्त ३२ वर्षांचे होते.

रोमानिया देशाचे ‘द पॅलेस ऑफ पार्लमेंट’ (Photo: Wikimedia Commons)

हेही वाचा >> विश्लेषण : काँग्रेस की भाजपा! लिंगायत समाजाची मतं नेमकी कोणाला? कर्नाटकच्या राजकारणात १७ टक्के मतदारांचे महत्त्व काय?

या इमारतीच्या बांधकामासाठी राजकीय कैदी, स्वयंसेवक, सैनिक यांच्यासह साधारण २० हजार ते १ लाख लोकांना कामाला लावण्यात आले होते. या इमारतीतमध्ये सिनेट आणि चेम्बर ऑफ डेप्युटीज अशी दोन्य भव्य दालने आहेत. यासह येथे संग्रहालये, कॉन्फरन्स सेंटर्स, अशा खोल्या आहेत. हुकूमशहा चाऊसेस्कू याला अणुयुद्ध होईल अशी भीती होती. त्यामुळे त्याने या इमारतीच्या खाली किरणोत्सारविरोधी बंकर्स निर्माण केले होते. हे बंकर २० किलोमीटर बोगद्याच्या माध्यमातून तेथील महत्त्वाच्या अन्य कार्यालयांशी जोडण्यात आले होते.

बर्लिनमधील ‘द रिचस्टॅग’ इमारत (Photo: Wikimedia Commons)

बर्लिनमधील ‘द रिचस्टॅग’ इमारत

जर्मनी देशाची संसद बर्लिन शहरात आहे. या इमारतीला ‘द रिचस्टॅग’ म्हणतात. १९८४ साली या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. ही इमारत तेव्हा वाइमर गणराज्याचे (१९१९-३३) मुख्यालय होते. मात्र हुकूमशहा अडॉल्फ हिटलरने जर्मनीचा चान्सलर म्हणून शपथ घेतल्यानंतर लवकरच या इमारतीचे १९३३ मध्ये नुकसान झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशियाने बर्लिनवर हल्ला केला होता. तेव्हा १९४५ सालीदेखील या इमारतीचे नुकसान झाले होते. १९६० साल या इमारतीचे आधुनिकीकरण तर १९९० साली नूतनीकरण करण्यात आले. त्यानंतर ही इमारत जर्मनीची संसद भवन बनली. नूतनीकरणादरम्यान या इमारतीवर ऑप्टिक स्टील आणि काचेचे घुमट लावण्यात आले.

Story img Loader