संसदेच्या नव्या इमारतीचे येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. विरोधकांनी मात्र नव्या इमारतीचे मोदी यांच्या हस्ते नव्हे तर राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन करावे, अशी मागणी केली आहे. याच मागणीला घेऊन त्यांनी या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. विरोधकांच्या भूमिकेसह संसदेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आणखी एका कारणामुळे चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमादरम्यान सेंगोल (राजदंड) लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला स्थापित केला जाणार आहे. त्यामुळे हा सेंगोल काय आहे? असे विचारले जात आहे. यासह सेंगोलचा इतिहास काय आहे? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर सेंगोलचा इतिहास, त्याची खासियत यासह त्याची निर्मिती करणाऱ्या वुम्मीदी बंगारू चेट्टी परिवाराविषयी जाणून घेऊ या…

सेंगोलची स्थापना संसदेच्या नव्या इमारतीत केली जाणार

बंगारू चेट्टी हे मुळचे चेन्नईमधील प्रसिद्ध ज्वेलर्स आहेत. चेट्टी परिवाराच्या पुर्वजांनी सेंगोलची निर्मिती केलेली आहे. हा सेंगोल नावाचा ऐतिहासिक राजदंड भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन यांनी १९४७ साली पंडित नेहरू यांना सोपवला होता. हाच सेंगोल आता संसदेत विधानसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला स्थापित केला जाणार आहे. या सेंगोलला ऐतिहासिक महत्त्व आहे. या सेंगोलकडे प्रतिकात्मकतेने सत्तेचे हस्तांतरण म्हणून पाहिले जाते. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेंगोलची संसदेत प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?

हेही वाचा >> विश्लेषण : स्पॅनिश फुटबॉलमध्ये वर्णद्वेष का ठरतोय कळीचा मुद्दा? व्हिनिशियसप्रकरणी काय प्रतिक्रिया उमटल्या?

वुम्मीदी परिवारालाही दिले आमंत्रण

वुम्मीदी बंगारू चेट्टी ज्वेलर्सच्या वुम्मीदी इथिराजुलू आणि वुम्मीदी सुधाकर या दोन व्यक्तींनी सेंगोलची निर्मिती केली. मात्र सध्याच्या वुम्मीदी परिवाराला याबाबत कसलीही कल्पना नव्हती. २०१८ एका मासिकाच्या लेखात वुम्मीदी परिवारातील पूर्वजांचा उल्लेख झाल्यानंतर त्यांना याबाबत समजले. दरम्यान आता सेंगोलच्या स्थापनेदरम्यान या परिवारालाही केंद्र सरकारने आमंत्रित केलेले आहे. याबाबत बोलताना वुम्मीदी बंगारू चेट्टी यांचे पणतू वुम्मीदी बालाजी यांनी आनंद व्यक्त केला आहे. “आमचे पुर्वज इतिहासाचा भाग होते, याचा आम्हाला अभिमान आहे. ही भावना खूपच आनंददायी आहे. आता संसदेतील समारंभाच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा आम्हाला मान मिळतो आहे,” असे बालाजी वुम्मीदी म्हणाले आहेत.

वुम्मीदी परिवाराचा इतिहास काय?

वुम्मीदी बंगारू परिवार हा चेन्नईमधील नामांकित ज्वेलर्सपैकी एक आहे. या परिवारातील वुम्मीदी बंगारू चेट्टी यांनी १९०० सालात दागिने विकण्याचा व्यवसाय सुरू केला. ते मुळचे वेल्लोरे जिल्ह्यातील रहिवासी होते. अगोदर ते पाल्लिकोंडा या त्यांच्या मूळ गावी दागिने घडवायचे आणि ते एका बॉक्समध्ये टाकून विकायला न्यायचे. पुढे वुम्मीदी बंगारू चेट्टी यांचा या व्यवसायात चांगला जम बसला. त्यानंतर या परिवाराने चेन्नई येथील गोविंदपाडा नायकेन स्ट्रीटवर पहिले दागिन्यांचे दुकान उघडले. या परिवाराने त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. सध्या या परिवाराचे चेन्नई, बंगळुरू येथे अनेक दुकान आहेत.

हेही वाचा >> जंतर-मंतरवरील कुस्तीगीर नार्को चाचणी करण्यास तयार; पण ही चाचणी कशी केली जाते? कायदा काय सांगतो? 

वुम्मीदी बंगारू चेट्टी आणि सेंगोल यांचा संबंध कसा आला?

सेंगोल आणि वुम्मीदी बंगारू चेट्टी यांच्यातील परस्परसंबंधाची कथा मोठी रंजक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळणार होते. ब्रिटिशांकडून भारतीयांकडे अधिकृतपणे सत्तेचे हस्तांतरण होणार होते. मात्र यासाठी एखादा प्रतिकात्मक कार्यक्रम असावा, असे लॉर्ड माऊंटबॅटन यांना वाटत होते. याबाबत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नेहरू यांनी ही बाब स्वातंत्र्यसैनिक सी राजगोपालचारी यांना सांगितली. चोल, पांड्या या राजघराण्यांच्या काळात राजदंडाच्या माध्यमातून राज्याची सत्ता एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सोपवली जायची. अगदी तशाच पद्धतीने राजदंडाच्या माध्यमातून ब्रिटिशांनी प्रतिकात्मक पद्धतीने भारतीयांना सत्ता सोपवावी, असे राजगोपालचारी यांना वाटले. ही बाब तत्कालीन भारतीय नेत्यांनी स्वीकारली. त्यानंतर राजगोपालचारी यांनी तामिळनाडू राज्यातील तंजोर जिल्ह्यामधील ‘थिरूवादुथुराई अथिनाम’ मठात जाऊन याबाबत विचारणा केली. या राजदंडाची निर्मिती करण्याची जबाबदारी वुम्मीदी बंगारू चेट्टी यांच्यावर सोपवण्यात आली.

हेही वाचा >> विश्लेषण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या राजदंडावर नंदीसोबत लक्ष्मी कशासाठी? 

सध्या सेंगोलची किंमत ७० ते ७५ लाख रुपये

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार वुम्मीदी इथिराजुलू आणि वुम्मीदी सुधाकर या दोन व्यक्तींनी या राजदंडाची १९४७ साली निर्मिती केली. हा सेंगोल चांदीचा असून त्याला सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. सेंगोलवरची कलाकुसर ही वेगवेगळ्या सोनारांनी केलेली आहे. सेंगोलच्या निर्मितीसाठी साधारण १० ते १५ दिवस लागले होते. वुम्मीदी परिवारातील चौथ्या पिढीतील अमरेंद्रन वुम्मीदी यांनी सेंगोलबाबत अधिक माहिती दिली आहे. सध्याच्या बाजारमुल्यानुसार सेंगोलची किंमत ही ७० ते ७५ लाख रुपये आहे. सध्या या राजदंडाची निर्मिती करण्यासाठी कमीतकमी तीस दिवस लागले असते. तसेच त्यासाठी पाच ते आठ माणसांची गरज भासली असती. या सेंगोलच्या वरच्या बाजूला नंदी आहे. तसेच सेंगोलवर तमिळ भाषेत काही लिहिलेले आहे,” असे अमरेंद्रन यांनी सांगितले.

हेही वाचा >> नव्या संसदेत स्थापित केल्या जाणाऱ्या ‘सेंगोल’ राजदंडाला एवढे महत्त्व का? पंडित नेहरूंशी काय संबंध? जाणून घ्या ऐतिहासिक संदर्भ

वुम्मीदी परिवाराला सेंगोलबद्दल कसलीही कल्पना नव्हती

विशेष म्हणजे सेंगोलच्या निर्मितीमध्ये आमच्या पूर्वजांचा सहभाग आहे, याची कल्पनाच सध्याच्या वुम्मीदी परिवाराला नव्हती. २०१८ साली एका मासिकात त्यांच्या परिवाराचे नाव छापून आल्यानंतर त्यांना याबाबत समजले. पुढे २०१९ साली ज्वेलर्स मार्केटिंग हेड असलेले अरुण कुमार यांनी सेंगोल या राजदंडाला शोधून काढले. हा राजदंड अलाहबाद येथील वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आला होता. या राजदंडाला पाहिल्यानंतर तो सेंगोल असल्याचे अरुण कुमार यांना लगेच समजले. पुढे वुम्मीदी परिवाराने पत्रकार परिषद घेऊन सेंगोल तसेच सेंगोल आणि सत्तेचे हस्तांतरण याबाबत माहिती देण्याचे ठरवले. पण करोना महासाथीमुळे याबाबतची माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही. सेंगोलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी यासाठी वुम्मीदी परिवाराने एक व्हिडीओ केला. हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर मोदी यांनी सेंगोलबद्दल अधिक माहिती मिळवण्याची सूचना केली.

हेही वाचा >> संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन अन् काँग्रेस-भाजपा वाद! नेमके प्रकरण काय? जाणून घ्या इंदिरा गांधी, राजीव गांधींचा संदर्भ 

१४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री नेहरुंनी राजदंड स्वीकारला

नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सेंगोलचीही लोकसभेत स्थापना केली जाणार आहे. या राजदंडाकडे भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून पाहिले जाणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळताना हा राजदंड लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित नेहरू यांच्याकडे सोपवला होता. १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी नेहरू यांनी हा राजदंड तामिळनाडूच्या लोकांकडून स्वीकारला होता. हा राजदंड भारतीय विविधता तसेच भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. हा राजदंड १९४७ सालापासून अलाहाबाद येथील वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आला होता. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनादरम्यान मोदी हा राजदंड तामिळनाडूच्या लोकांकडून स्वीकारतील. त्यानंतर हा राजदंड संसदभवनात स्थापित केला जाईल.