पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (३ सप्टेंबर) ब्रुनेई दारुसलामची राजधानी बंदर सेरी बेगवान येथे त्यांच्या अधिकृत भेटीसाठी दाखल झाले. ब्रुनेई दारुसलाम या आग्नेय आशियाई राष्ट्राला भेट देणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. भारत आणि ब्रुनेई यांनी अधिकृतपणे राजनैतिक संबंध प्रस्थापित करून ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे ही भेट विशेष मानली जात आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणे हा मोदींच्या दौर्‍याचा उद्देश आहे. पंतप्रधानांनी ब्रुनेई येथे दाखल होताच भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन चान्सरीचे उद्घाटन केले आणि ओमर अली सैफुद्दीन मशिदीलाही भेट दिली आहे. या देशाची लोकसंख्या, भारतासाठी त्याचे धोरणात्मक महत्त्व काय? एकूणच भारत आणि ब्रुनेईचे संबंध कसे आहेत? याविषयी जाणून घेऊ.

१. ब्रुनेईची लोकसंख्या आणि परदेशस्थ भारतीय

२०२३ च्या अधिकृत अंदाजानुसार, ब्रुनेईची एकूण लोकसंख्या ४,५०,५०० आहे. त्यात ब्रुनेईच्या नागरिकांची लोकसंख्या सुमारे ७६ टक्के आहे. उर्वरित तात्पुरते रहिवासी आहेत. ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोक मलय किंवा चिनी आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, ब्रुनेईमध्ये भारतीयांच्या आगमनाचा पहिला टप्पा १९२० साली तेलाच्या शोधापासून सुरू झाला. “सध्या ब्रुनेईमध्ये अंदाजे १४ हजार भारतीय राहतात. ब्रुनेईच्या आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्राच्या वाढ व विकासात भारतीय डॉक्टर आणि शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण आहे,” असे त्यात पुढे सांगण्यात आले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj and the Sacking of Surat Historical Context and Impact in Marathi
Chhatrapati Shivaji Maharaj: सूरत लुटीचे ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
The site of the dockyard at Lothal, Gujarat, during the Indus Valley Civilisation. (Wikimedia Commons)
Indus Valley Civilization: हडप्पाकालीन लोथल बंदराच्या अस्तित्त्वाचे नवे पुरावे सापडले; काय सांगते नवीन संशोधन?
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
rashtriya swayamsevak sangha baithak
आरएसएसची ‘जुलै बैठक’ काय असते?
The flight from Kathmandu to Delhi was hijacked on December 24, 1999.
IC814 Hijacking Case: पाकिस्तानला कॉल आणि ठाकरेंच्या ‘मातोश्री’ला लक्ष्य करण्याची योजना: मुंबई पोलिसांनी IC814 अपहरण प्रकरणाचा शोध नेमका घेतला कसा?
ब्रुनेईमध्ये अंदाजे १४ हजार भारतीय राहतात. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : महिला सुरक्षेसाठी सरकारने लाँच केलेलं ‘SHE-Box Portal’ काय आहे? महिलांना याची कशी मदत होईल?

२. ब्रुनेईचे सामरिक महत्त्व

ब्रुनेई हा भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाचा आणि इंडो-पॅसिफिक व्हिजनचा एक भाग आहे. १९९० च्या दशकात सुरू झालेल्या ‘लूक ईस्ट’ धोरणाची पुढची पायरी म्हणून ‘ॲक्ट ईस्ट’ धोरण तयार करण्यात आले होते. भारताचे जवळचे ऐतिहासिक संबंध असलेल्या युनियन ऑफ सोविएत सोशलिस्ट रिपब्लिक (यूएसएसआर)चा भाग नसलेल्या आग्नेय आशियातील इतर देशांबरोबर आपले संबंध अधिक दृढ करण्याचा भारताचा प्रयत्न म्हणून या धोरणाकडे पाहिले जाते. आग्नेय आशियाशी जवळीक असल्यामुळे ईशान्य भारतीय राज्ये यामध्ये महत्त्वाची ठरणार होती.

२०१४ मध्ये या धोरणाला पुन्हा ‘ॲक्ट ईस्ट’ असे नाव देण्यात आले. पंतप्रधान मोदी म्हणाले, आसियान (असोसिएशन ऑफ आग्नेय आशियाई राष्ट्रे) हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. ब्रुनेईदेखील ‘आसियान’चा सदस्य आहे. आसियान ही आग्नेय आशियामधील १० स्वतंत्र देशांची एक आर्थिक संघटना आहे. अनेक आग्नेय आशियाई देशांनी गेल्या काही दशकांमध्ये लक्षणीय आर्थिक वाढ पाहिली आहे. ब्रुनेई हा आग्नेय आशियाई प्रदेशातील सर्वांत मोठा तेल आणि वायू उत्पादक देश आहे.

ब्रुनेई हा भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाचा आणि इंडो-पॅसिफिक व्हिजनचा एक भाग आहे. (छायाचित्र-पीटीआय)

अलीकडच्या वर्षांत जागतिक घडामोडींमध्ये चीनचा वाढता प्रभाव बघता, आग्नेय आशिया आणि इंडो-पॅसिफिकवर लक्ष केंद्रित करणेदेखील महत्त्वाचे आहे. राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने अधिक हुकूमशाही वळण घेतले आहे. चीनच्या आर्थिक स्थितीमुळे या प्रदेशात अनेक प्रकल्पांना निधी देणे आणि इतर देशांना कर्ज देण्याचे काम चीन करतो. दक्षिण चिनी समुद्रातील (साऊथ चायना सी) त्याच्या अनेक कृतींमुळे चीनने इतरांना प्रवृत्त केले आहे. त्यामुळे भारत चीनच्या प्रभावाला तोंड देऊ शकतो.

३. जगातील सर्वांत जास्त काळ राज्य करणारा राजा

१४ व्या आणि १६ व्या शतकादरम्यान ब्रुनेई दारुसलाम हा एक शक्तिशाली प्रदेश होता. सध्याचा ब्रुनेई दारुसलामचे सुलतान हे जगातील सर्वांत जुन्या दीर्घकाळ राज्य करणाऱ्या राजवंशांपैकी एक आहेत. ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांचा १ ऑगस्ट १९६८ साली ब्रुनेईचा २९ वा सुलतान म्हणून राज्याभिषेक करण्यात आला; ज्यामुळे ते सध्या जगातील सर्वांत जास्त काळ राज्य करणारे राजा ठरले आहेत. सुलतान हाजी हसनल आपल्या अफाट संपत्तीसाठीही तितकेच प्रसिद्ध आहेत.

ब्रुनेई दारुसलाम या आग्नेय आशियाई राष्ट्राला भेट देणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : आरएसएसची ‘जुलै बैठक’ काय असते?

२०१५ च्या ‘टाइम मॅगझिन’च्या लेखात असे सांगण्यात आले आहे की, त्यांच्याकडे ६०० हून अधिक ‘रोल्स रॉइस’ आहेत आणि त्यांचे निवासस्थान ‘इस्ताना नुरूल इमान’ हा जगातील सर्वांत मोठा राजवाडा आहे. त्याची किंमत ३५० डॉलर्स पेक्षाही अधिक आहे. ‘बीबीसी’मधील एका लेखानुसार, ते जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या प्रजेमध्ये त्यांची खरी लोकप्रियता आहे, असे दिसते. परंतु, अलीकडेच देशात इस्लामिक शरिया कायदा लागू केल्याबद्दल त्यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे.